सायंकाळ झाली दीड-दोन वर्षाची मृगा अंगणात असलेल्या लाल मातीत खेळण्यात रमली होती.तिच्या बाजुला तिच्यावर लक्ष ठेवायला तीचा आज्जा खाटेवर बिड्या फुकीत बसला होता....
गल्लीत पिंपळाच्या झाडाखाली मृगाचा बा चिंतेत डोक्याला हात लावून मावळत्या सुर्याला पाहात होता,सांज सरेनाशी झाली होती त्याला दुपारपासुन उपाशी होता,एक-एक तास त्याला एक दिवसा सारखा वाटत होता....
अधुन-मधुन बायकोला कळा येत असल्या की याच्या जीवाला धडकी भरायची,गावच्याला दावखाणा नसल्यानं बाळंतपण गावच्या म्हाताऱ्या बायकाच करत असायच्या,दिवस मावळतीला आला चहुकडे अंधार पसरला होता.
तश्या सुमीच्या वेदना वाढल्या होत्या कळा,तीव्र झाल्या होत्या अन् आता तिला राहवत नव्हतं,अतोनात हाल अपेष्टा सहन करत ती वेळ आली अन् सुमी बाळंत झाली.अन् तिने सुटकेचा निःश्वास सोडला होता...
घरात बाळ रडण्याचा आवाज आला,अन् मृगाच्या बा च्या डोळ्यांतुन अश्रुंचा दांड वाहु लागला. आजी नातवाला घेऊन तिच्या लेकाकडे आली, मृगाचा बा त्या लाल मासाच्या गोळ्याकडं बघत राहिला.व आसवांचे टिपुस गाळत बसला सर्विकडे आनंद झाला होता....
सुमी निपचित पडुन होती,आता तिच्या बाजुला तिचा लेक तिच्या जवळ होता,सासूबाईंची नातवाची दृष्ट काढायची हौस चालू होती.मृगाचा बा गावभर पोरगं झाला या आनंदात साखर वाटत होता...
या सर्वात मृगाचा विसर सर्वांना पडला होता,परक्याची लक्ष्मी आताच परकीच झाली होती.दीड-दोन वर्षांच्या या लेकराला कुणी जेवायला पण बोलत नव्हतं,ते मात्र लाल मातीत खुश होतं कारण त्याला या मातीत खेळायला ती खायला आज अडवणार कुणी नव्हतं...
मृगाचा आजा नातू झाल्याच्या आनंदात गावच्या बाजुला असलेल्या वस्तीत गेला होता,गावरान दारू प्यायला.आज त्याला अडवायला लेक पण नव्हता,त्याचा आनंद तर गगनात मावेनासा झाला होता...
जसा जसा अंधार पडत गेला मृगाचे डोळे लागत गेले,शेवट कंटाळुन मृगा घरात आली.आजीना दिलेला फिका वरण-भात खाऊन,तिच्या माय जवळ येऊन झोपुन राहीली शांत.तिला नको होती कुठली गोष्ट अन् नको बाहुली सोबत झोपायला....
दिवसभर खेळून खेळून दमलेली मृगा शांत झोपली होती,तिची माय मात्र जागेपणी लेकाचे स्वप्न रंगवत त्याच्या स्वप्नात रंगली होती.यात तीलापण थोडा का होईना मृगाचा विसर पडला होता....
#जगण्यातुन_हरवलेली_लेक_मृगा...
Written by:Bharat Sonwane...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा