हल्ली तुझं माझं हे अव्यक्त नात कुठेतरी एकमेकांशी व्यक्त करण्यासाठी दोघांमध्ये प्रयत्न चालु आहे की काय असे वाटत असते.म्हणजे मला इतक्या दिवस असे वाटायचं की मी एकटाच हा प्रयत्न करत असावा....
पण असे नाही अलीकडे तुही एक पाऊल पुढे टाकले आहे,माझ्या पुढे एक स्टेप गेलीय कुठेतरी मनातच मी माझ्या मनाला शाबासकी दिली की अखेर जाणीव झाली आहे...
खरच सांगु हे अव्यक्त नात आहेना तेच भावतं मला,म्हणजे इथे काय होते तुझ्याबद्दल नाही माहीत पण मी खुप काळजी करत असतो तुझी तुझ्याबद्दल कायम विचार करत असतो अन् तुझ्यासाठी कीत्येकदा मी स्वतःला हरवत असतो प्रत्येकवेळा आयुष्यात...
अलीकडे कुठेतरी यात बदल झाला आहे तेव्हा एकच सांगेल,जितका वेळ हे अव्यक्त नात समजुन घ्यायला घेतला आहेना तितकाच accept करायला घेईल तु पण विचार कर अन् तुझा निर्णय घे....
कारण वेळ खुप कमी आहे अन् कदाचित काही निर्णय तुला वेळेला निभावुन नेण्यासाठी माझ्या व्यतिरिक्तही घ्यायला लागल,जिथे मी नसतांना तू खुश असेल तर मला चालेल....
फक्त स्पष्टपणे तसे व्यक्त करत चल अन् हे अव्यक्त नात व्यक्त करायचं आहे त्यासाठी एक भेट तर होणारच आहे त्या वळणावर,पण त्या वेळा उत्तरात हा नकार नसेल...
हवे तर आयुष्यभर एक छान मित्र अन् मैत्रीण बनुन राहू नेहमी,म्हणजे तुझा वेळ अन् तु ठरवून भेटत जाऊ फक्त कधीतरी तो तू दिलेला माझा हक्काचा वेळ असत जाईल माझ्यासाठी...
या वेळेला आपल्या सोबत कुठलेही नाते असणार नाही फक्त तू अन् मी सोबत तुझ्या अव्यक्त नात्यातील अन् आता व्यक्त होऊ पाहत असणाऱ्या माहीत नसलेल्या नात्यांची वीण असेल....
सोबत असेल माझा आवडीच्या कॉफी सोबत जी अलीकडे तुझी सुद्धा आवडती झाली आहे,ऐकलंय की तु तुझ्या मनातल्या माझ्या बद्दलच्या गोष्टी या कॉफीशी शेअर करत असतेस हे खुप आवडले आहे....
#गोष्टी_अव्यक्त_नात्याच्या_पलिकडची_व्यक्त_होऊ_पाहणारी....
bharat.sonawane.374
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा