मुख्य सामग्रीवर वगळा

हल्ली मी पण शाळेत जातो

हल्ली शेताच्या कामामुळे तालुक्याच्या घरापासून आमच्या गावाच्या रस्त्याने बरेचदा ये जा होत असते...

सकाळ झाली की माझी तिकडे जाण्याची गरबड चालु होऊन जाते,मी सकाळी शाळेत मुले जातात त्या वेळेला घरून निघतो....

रस्त्याने अनेक मुलं अनवाणी चालत असता कुणी मक्काच्या पिशवीचे केलेले ते दप्तर घेऊन,तर कोणी चांगले दप्तर घेऊन. सकाळी रस्त्याने हे मुले खुप छान भासत असता,अगदी रस्त्याने बागडणारी एक रंगाची फुलपाखरेच जणू ....

मी पण त्यांच्या शाळेत जाण्याचा एक हिस्सा व्हावं म्हणून बसवुन घेतो दररोज दोन जणांना शाळेपर्यंत पोचविण्यासाठी. अलीकडे या मुलांची अन् माझी चांगलीच मैत्री झाली आहे,ते लांबूनच दिसले की दादा मला...दादा मला...
असे ओरडतात मग मी सगळ्यांना तर नाही घेऊन जाऊ शकत पण दोघांना घेऊन जात असतो....

या त्यांच्या सोबतच्या प्रवासासोबत एक प्रश्न मला पडतो मी कॉलेजला जातो,तिथे मुलांना सिटी मधुन घेऊन जायला-सोडवायला कॉलेजच्या बस आहेत....

तश्या या जिल्हा परिषदेच्या शाळेला असाव्या असे वाटते,कारण गरीबाची पोर या गरीब सरकारच्या गरीब शाळेत जातात.माहीत नाही शिक्षणाची किती ओढ त्यांना असते पण घरुन पिशवीत घेतलेला डब्बा त्यांचा नेहमी रिकामा असतो,जो घरी येतांना शाळेतील भेटणाऱ्या खिचडीनं भरलेला असतो....

सरकार खुप काही करत आहे फक्त या मुलांची ये-जा करण्यासाठी काहीतरी करावं थंडीत मुलं खुप दूरदूर वरून वस्त्यांवरून येत असतात अनवाणी पायांनी....

हल्ली ते चित्र पण बघायला भेटत नाही एक पेन्सिल वर एक मुलगी अन् एक मुलगा बसलेला आहे अन् म्हणत आहे स्कूल चले हम....

ती पेन्सिल तरी घेऊन आलीय या गरीब मुलांना शाळेपर्यंत पण त्यांचा प्रवास हा अजुन संपला नाहीये....

#हल्ली_मी_पण_मुलांसोबत_शाळेत_जातो....

Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...