मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जानेवारी, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

औद्योगिक वसाहतीत भेटलेला अवलिया..!

औद्योगिक वसाहतीत भेटलेला अवलिया..! आयुष्याला घेऊन आपण कधीतरी खूप छोट्या छोट्या गोष्टींना घेऊन समाधानी असतो तर कधीतरी आपण आपलं आयुष्य गुंतागुंतीचे करून घेतो अन् त्यातून मिळणारा सर्वोच्च कोटीचा जो आनंद आहे त्यात आपण खुश होत असतो. अलिकडे आयुष्याला घेऊन जेव्हा विचार करतो तेव्हा हा विषय येतो अन् याबाबतीत खूप खोलवर विचार केला जातो तेव्हा आयुष्यात आपण आतापर्यंत एकतर खूप काही गमावलं किंवा येथून पुढे सर्वच अलबेल असले तर खूप काही मिळवू शकू याची प्रचिती येते..! साधारण बाविशित असेल तेव्हा अाेद्योगिक वसाहतीत पहिल्यांदा कामाला गेलो कामाच्या अन् पगाराच्या बाबतीत सतत उंचीचा आलेख बघत असल्यानं,काही गोष्टी मला गौण वाटायच्या.साहजिक आहे त्यासाठी तितकी मेहनत करत असायचो,आयुष्याला,आयुष्यात आलेल्या क्षणांना तितके पिळून काढायला आवडायचं,मेहनत करायला आवडायचं..! नेहमीप्रमाणे असेच एक दिवस दुसऱ्या शिफ्टमधले काम करून सुट्टी झाली अन् घरी परतायची वेळ झाली.साधारण पावणे बारा वाजलेले होते,कंपनीच्या गेट बाहेर आलो अन् थंडीचे दिवस असल्यानं हुडहुडी भरून आली.वर म्हंटल्याप्रमाणे नशिबाने खूप गोष्टी मला माझ्या आयुष्या

अनोखा मुसाफिर..!

अनोखा मुसाफिर..! दोन-तीन दिवसांपूर्वी औरंगाबाद गेलो असतांना रात्री नात्यातील एका भावाच्या फ्लॅटवर थांबलो होतो.मी थांबलो त्याच संध्याकाळी त्याचा दुसरा मित्र जो हरियाणा राज्यातील रोहतक जिल्ह्यातील आहे,तो ही ट्रेनने औरंगाबाद येथे येत होता..! जो की संपूर्ण देशभरात त्याच्या स्वतःच्या व्यवसायनिमित्त मार्केटिंग अन् सोबतच त्याच्या प्रॉडक्टचे सेल करण्यासाठी फिरत असतो..! तो स्टेशनवर आल्याचे त्याने आम्हाला कळवले अन् त्याला भाऊ म्हंटला की स्टेशनवर तुला घ्यायला येतो,तर तो नाही बोलला अन् तो स्वतःच भावाच्या फ्लॅटवर आला,इथे तो पहिल्यांदाच येत होता..! तो आला त्याची माझी यापूर्वी कधी भेट नव्हती,की कधी बोलणे तो माझ्यासाठी संपूर्ण नवा होता...! मला नवीन माणसांबद्दल नेहमीच जाणून घेण्याची इच्छा असते,त्यामुळं मग त्यांच्या दोघांच्या गप्पात विषेश लक्ष देत मी ही सर्व ऐकत होतो,त्याच्याशी बोलतही होतो,तोही बोलत होता..! रात्रीचे जेवण झाले अन् आम्ही पुन्हा एकदा गप्पा मारायला लागलो.त्याच्या बोलण्यातून त्याची ओळख होवू लागली होती.चाळीशीत असणारा तो साधारण मित्र त्याच्या आजोबांच्या बाबतीत सांगत होता,ते मूळचे प

बौद्ध धम्माचे एक जागतिक कीर्तीचे मार्गदर्शक हरपले..!

बौद्ध धम्माचे एक जागतिक कीर्तीचे मार्गदर्शक हरपले..! २२ जानेवारी २०२२. बौद्ध धम्माचे एक जागतिक कीर्तीचे मार्गदर्शक हरपले. महान बौद्ध विचारक अन् बौद्ध धर्माचा सर्व जगभरात प्रसार करणारे तसेच जगामध्ये 'सोशली एंगेज बुद्धिजम' च्या माध्यमातून क्रांती आणणारे महान बौद्ध भिक्खू "तिक न्यात हन्ह" यांचे दि.२२ जानेवारी २०२२ रोजी वयाच्या ९५ व्या वर्षी निर्वाण..! "तिक न्यात हन्ह" यांचा जन्म ११ ऑक्टोबर १९२६ ला "व्हिएतनाम" येथे झाला.वयाच्या १६व्या वर्षी झेंन मॉनेस्ट्रीमध्ये ते सहभागी झाले.१९४९ मध्ये त्यांनी आपल्याला पूर्णतः बौद्ध भिक्खू जीवनामध्ये सामील केले.जागतिक स्तरावर त्यांना "तिक न्यात हन्ह" म्हणून ओळखले जाते,"तिक" या शब्दाचा अर्थ म्हणजे ते शाक्य कुळाचा एक भाग आहेत..! "तिक न्यात हन्ह" व्हिएतनाम येथील प्रसिद्ध बौद्ध विचारक,आध्यात्मिक गुरू,कवी,लेखक होते.ज्यांच्या विचारांना जगभरात वाचल्या,समजून घेतल्या गेले.त्यांनी अनेक पुस्तके लिहले जे जीवन जगण्यासाठी आपल्याला प्रेरणा देणारे होते. भारत देशातसुद्धा हे लोकप्रिय लेखक होते.

तुळशी माळ गळ्यात घातलेले एकनाथ बाबा..!

तुळशी माळ गळ्यात घातलेले एकनाथ बाबा..! सुर्य मावळतीला होता,गाव,रानावर सर्वदूर तांबड पसरलं होतं अन् एकनाथ बाबांना रानातून घराकडे जायची ओढ लागली,तसं ते सांजेची कामे बिगीबिगी आवरते करू लागले.गोठ्यातील गुरे हौदावर पाणी पाजून,त्यांना वैरण टाकून,गायीचे दूध क्यानीत काढून त्यांनी सपराला असलेल्या पत्राला कडीकोंडा घालून कुलूप घातलं..! उटळं कंबराच्या कर्धोड्यात अडकुन ते सपराला लागून असलेल्या न्हाणीघरात घुसले,हातपाय धुवून वावरातले कापडं बदलून एकनाथ बाबा घराच्या वाटेनं निघाले होते..! अंगात असलेला सदरा घालून घालून पार विरून गेला होता,चार ठीकाणी ठीगळं दिलेलं धोतर घालून,वाटेनं चालत आपल्या आयुष्याचे उरे दिवस ते पुरे करत होते.वाहनाला चिंदकाने बांधुन एकएक दिवस काढीत होते,त्यांना नको होतं अंगाला सुटर की वाजली नाही कधी थंडी त्यांना या कडाक्याच्या हिवाळ्यातही..! अलीकडच्या सालाभरात त्यांना दिसायला कमी झालं होतं,म्हणुन त्यांच्या लेकानं शहरातल्या सरकारी दावखाण्यातून त्यांना एक जाड भिंगाचा चष्मा आणला होता.एकनाथ बाबा त्या जाड भिंगाच्या चष्म्याला जीवापाड जपत असायचे,आयुष्यभर गळ्यात तुळशीमाळ अन् आता या

एमआयडीसी अन् बंद पडलेलं वर्तमान..!

एमआयडीसी अन् बंद पडलेलं वर्तमान..! मला जर कुणी म्हंटले चलतो मॉलमध्ये फिरायला जाऊ तर मला ते आवडत नाही,मी एमआयडीसीमध्ये फिरायला जातो नेहमी, रिकामा असलोकी तिकडच भटकत असतो.प्रत्येक कंपनीचे बाहेरून निरीक्षण करत  फिरत असतो जे करायला मला खुप आवडते... नेहमी प्रमाणे तो दिवस पेपर झाला,घरी जायला खुप वेळ होता म्हणुन मी काहीतरी नवीन माहिती भेटल म्हणुन एमआयडीसी एरियात फिरायला गेलो साधारण तीन महीन्यांपुर्वीची ही गोष्ट असेल... मी रस्त्याने भटकत होतो इकडेतिकडे कावरी-बावरी नजर टाकत,आजू-बाजूला चालू असलेले संवाद ऐकत.आज का कुणास ठाऊक पण मला इथे खुप भयाण शांतशांत वाटत होते.... जिथे नेहमी वरदळ असते कंपन्यांमधला यंत्रांचा आवाज,भोंग्यांचा आवाजही आज ऐकु येत नव्हता.मी चालत-चालत बराच पुढे आलो,तशी ती शांतता अजुन वाढत गेली,पुढे रस्त्याने एक चिटपाखरू सुद्धा दिसेनासे झाले.... नेहमी आवडणारे दृश्य आता मला भीतीदायक वाटु लागले होते,उंचउंच इमारती त्यांना कांग्रेसच्या जंगलाने वेढले होते‌.आतमध्ये पूर्ण काळोख नजरेस पडत होता.कंपनीचा मरलेल्या माणसाचा जसा सापळा व्हावा तसा भास होत होता.... ज्या कंपनीत हजारो माणसे काम

आयुष्याची वाटचाल..!

आयुष्याची वाटचाल..! आयुष्याला घेऊन जेव्हा विचार करतो तेव्हा मला खूप स्पष्ट अशी एकच गोष्ट वाटते की,जिथं कुठल्याही शक्यता,उद्याचा विचार केला जात नसेल म्हणजे हे फक्त माझ्या नजरेतून.आयुष्यात आयुष्याच्या उत्तरार्धात किंवा आयुष्यभर तुला काय करायला आवडेल..? असा प्रश्न मला कुणी विचारला की मी खूप सहज सांगून जातो की मला फक्त चालत रहायला आवडेल..! होय मला फक्त चालायला आवडेल,मग त्या चालण्यासाठी नसेल कुठला उद्देश किंवा काहीतरी साध्य करायचं आहे म्हणून माझं चालणं.कारण फक्त मिळेल त्या रस्त्यानं भटकण्यात अन् रोज आपल्याच विश्वात आपल्याला नव्याने बघायला भेटणाऱ्या ठिकाणांना,निसर्गाला अनुभवण्यात जे सुख आहे ते आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनात नाही..! आजही ठरवून माझं ओळखीच्या प्रदेशात पाच सात किमी रोजचं चालणं होतं पण रोजचा हा ओळखीचा प्रदेशसुद्धा मला नियमित रोज नव्याने भेटत असतो.निसर्गाला आपण जवळ केलं अन् निसर्गाच्या सान्निध्यात राहून रोजच रोजच्याप्रमाणे त्यात होणारे छोटे छोटे बदल बघितले की आयुष्याला घेऊन आपण काही अपेक्षांसाठी खूप काही मिस करतोय असं वाटायला लागतं..! खूपवेळा निसर्गाच्या सान्निध्यात

आयुष्य_Cricket..!

 आयुष्य_Cricket..! माझ्या अस्वस्थतेच्या काळात काही सकाळ मला उगाच प्रसन्न वाटतात अन् दिवसाची झालेली प्रसन्न सकाळ पुन्हा एकदा आठवांचे दिवस घेऊन आठवणीला येतात.आज खूप दिवसांनी म्हणजे तब्बल काही वर्षांनी पहाटेच तालुक्याच्या क्रीडा संकुलाला भेट दिली अन् क्रिकेटसाठी असलेलं लहानपणीचे वेड त्यासाठी पहाटेच मित्रांसमवेत हातात बॅट,बॉल घेऊन क्रीडा संकुलाकडे होत असणाऱ्या धावा आठवल्या..! लहानपणी करिअर म्हणून किंवा भविष्यात आपल्याला काय करायचं आहे हे अनेकांना माहीत नसते,त्यातलाच मी एक मग अश्यावेळी जे आवडेल ते करायचं.त्यातच उत्तुंग यश संपादन करायचं अन् यशाच्या सर्वात उंचाच्या शिखरावर जाऊन बसायचं,मग त्यासाठी खूप मेहनत घ्यायची.हेच क्रिकेटच्या बाबतीत पण हे खूळ काही वर्षांसाठीच मनावर स्वार झालेलं,पुढे जसे प्रत्येक आवडीनिवडीला वेळ असताच पूर्णविराम दिला,त्यातील ही सुद्धा एक आवड अन्  भविष्यात काय करायचं..? या प्रश्नाला काही वर्षांसाठी मिळालेलं उत्तर होतं..! आयुष्याला घेऊन लहानपणी आपण खूप विचार करत असतो,प्रत्येक नव्या गोष्टीत आपल्याला कुतूहल वाटत असते,त्या प्रत्येक गोष्टीचा खोलात जावून आपण विचार करत

Dreams..!

Dreams..! कल्पनेतल्या स्वप्नांमागे पळून पळून थकलो आहे आता, किरण एक आशेची कुठेतरी आयुष्यात माझ्या  वास्तवात स्वप्न उतरताना पुन्हा एकदा दिसू देत आता..! हल्ली अलिकडे मीच मला कोसतो पडलेल्या प्रश्नांची मनास न पटणारी खरी उत्तरे, मीच माझ्या मनास मग खोटी करुनी ती पुन्हा पुन्हा देतो..! किती आत उरली माझ्या अजुन आशेची विझू की मिनमिनू करणारी वात ती आता, जगावे मी प्रश्नांना घेऊन मार्ग सापडत नाही तोवर की, हेच स्वप्नसुद्धा पुन्हा एकदा जगून घ्यावे कल्पनेत आता..! खुडल्या गेल्या कळ्या जश्या उमलण्या आधीच झाडांच्या, तितकाच मीच माझ्या आत संपत जात आहे, जसा सारखा फुलून गेल्यावर सुखून गेल्या फुलांसारखा आता..! तसबीरित कित्येक स्वप्न जुळून आले, कुण्या एका घटकेस घात एकदा पुन्हा झाला अन्  जुळून आलेल्या तसबीरी खळकन पडल्या जसे, तसबीरी आड केले कुण्या पुन्हा एकदा आता..! मृतम्याच्या त्या वेड्यावाकड्या भेकाड तसबीरि माझ्यापरी मग सुखी मला भासता आता...! Written by, Bharat Sonwane.

कॅनव्हास तुझ्या संगतीने..!

कॅनव्हास तुझ्या संगतीने..! कुंचल्यात कुंचल्यास तू रंगावत राहिली, झाली जेव्हा एक कुंचल्याची प्रतिमा पूर्ण, तेव्हा मात्र बदनाम मी झालो..! कुणाला कसली ओढ तर कुणाला कसली,कुणाला वेळ साधायला आवडते तर कुणाला वेळेनुसार आपलं बदलणं.सांजेचा सूर्य अस्ताला जाण्याच्या काही दहा-पंधरा मिनिटांची ती घटिका अन् ती वेळ तुला साधायला आवडायची... अस्ताला जाणाऱ्या सूर्याच्या किरणांनी जसे-जसे मावळतीला जावं,तसं त्या काही मिनिटांत तुझं स्केच बोर्डवर तयार होणारं ते चित्र मी बघत राहावं... आयुष्यातलं सर्वात सुंदर दृष्य कुठलं असावं तर हेच,तू तुझ्या डोळ्यांवर येणाऱ्या बटांना ब्रश हातात धरलेल्या हातांनी अलगत सावरावं जसं अस्ताला जाणाऱ्या सूर्याने प्रकाशातील सर्व वस्तूंना सावरत आपल्या कवेत घ्यावं... चित्रात तुझं तल्लीन होणं,लीलया अलवारपणे स्केच बोर्डवर फिरणारा तुझा हात,कल्पनेतील रंगात माखलेला तुझा चेहरा हे सर्व खूप सुंदर आहे...बाहेर अस्ताला जाणारा सूर्य त्याची विविध रूपे दाखवत असतो सोबतीला अस्ताला जाणाऱ्या सूर्याबरोबर क्षणाक्षणाला तयार होणारं तुझं हे स्केच... तुझी दुनिया न्यारीच होती,तुला नको होता कुणी जवळचा ह

गाव रहाटीचं जगणं..!

गाव रहाटीचं जगणं..! आज पुन्हा एकदा, दै."सकाळ" वृत्तपत्रात "मैफल" या सदरात माझी "गाव रहाटीचं जगणं" ही कथा संपूर्ण "मराठवाडा विभाग" आवृत्तीमध्ये प्रसिद्ध झाली आहे. अवघ्या महाराष्ट्रातुन प्रसिद्ध होणाऱ्या वृत्तपत्रात जेव्हा आपला लेख प्रसिद्ध होतो आणि दिवसभर आपल्यावर होणारा फोनचा वर्षाव खास करून (ग्रामीण भाग) हे खूप सुखद आहे.आज संपूर्ण  "मराठवाडा विभागातुन" बरेच फोन आलेत.अन् कुठेतरी अजूनही वृत्तपत्र हे आपण माणसे आणि वाचन यामधील एक महत्त्वाचा दुवा आहे हे दिसून आलं... मनस्वी खूप धन्यवाद, Vikas Deshmukh   Sir..! Sakal Media Group,Aurangabad..! गाव रहाटीचं जगणं..! भर दुपारची वेळ,उन्हं डोईवर आलेली होती.घामाचे ओघळ घरंगळत पाठीच्या लवणातून मोहम्मदचाच्या शरीराला चिटकलेल्या सद्र्याला समीप होवून,एखाद्या वाऱ्याच्या झोकाने सुकून बुंदक्याच्या पांढऱ्या सद्र्यावर कुत्रे मुतल्यागत ओघळणाऱ्या ओघळासारखे दिसून येत होते..! नदी ओलांडून मोहम्मदचाच्या आपल्या बकऱ्या घेऊन नदीच्या थडीथडीने,तापलेल्या वाळूत टाचेवर आपले पाय रोवत,एका हातात असलेल्या उपरण्याने च

धोंडाई..!

धोंडाई..! आज दै."सकाळ" वृत्तपत्रात "मैफल" या सदरात माझा "धोंडाई" हा ललित लेख "औरंगाबाद शहर" आवृत्तीमध्ये प्रसिद्ध झाला आहे. अवघ्या महाराष्ट्रातुन प्रसिद्ध होणाऱ्या वृत्तपत्रात जेव्हा आपला लेख प्रसिद्ध होतो आणि दिवसभर आपल्यावर होणारा फोनचा वर्षाव खास करून (ग्रामीण भाग) हे खूप सुखद आहे.आज संपूर्ण औरंगाबाद जिल्ह्यातून बरेच फोन आलेत अन् कुठेतरी अजूनही वृत्तपत्र वाचन आवडीने करतात याची पुन्हा एकदा जाणीव झाली... मनस्वी खूप धन्यवाद, Vikas Deshmukh  Sir..! Sakal Media Group,Aurangabad..! सुर्य सांजेकडे कलायला लागला तसं रानातल्या लोकांनी घराच्या वाटा धरल्या,जसजसा सुर्य अस्ताला जातो आहे तसतसा पायांचा वेग वाढत आहे.घराची लागलेली ओढ अन् घरी गेल्यावर कधी एकदा कोरा काळा चहा पिऊन पाठ घंटाभर ओसरीला लांब करू असे धोंड्याईला वाटत होतं... उतरत्या वयात वावरातले बैठे काम आता तिला सहन होत नव्हते पण आले दिवस कसेतरी ढकलायचे अन् चालू शरीराला घास कुटका खाऊन तगते जगते ठेवायचं. इतकचं काय धोंडाईच्या रोजच्या जगण्यातील दिनक्रम होता... धोंडाईने रानाचा रस्ता मागं टाकला

बंदिस्त आयुष्याची कविता..!

बंदिस्त आयुष्याची कविता..! स्वप्नांशीच मी बांधील राहिलो, कल्पनेतले सत्यात ते कितपत उतरले स्वप्न, कल्पनेतल्या स्वप्नांना सत्यात उत्रविण्या, मग मी झुरतच राहिलो..! बंदिस्त खोलीत मी माझ्याच राहिलो, खोलीत उतरले ते कितपत किरणं, कावड फटीतून येणाऱ्या आशेच्या तिरीपेस, मग मात्र मी बघतच राहिलो..! उन्हं कावडा पल्याडची अन्  सावलीस मी सहवत राहिलो, कुणी वार केला मग कावडावर, त्या भीतीनं मात्र मी कडी-कोंड्याच्या आत  मलाच मग बंदिस्त करत राहिलो..! ठेचकाळल्या चौकटीवरील बिजागिरी जश्या, असे वाटते की, घाव माझ्यावरीच झाले ते दगडांचे, अन् मग काय, माझ्याच आयुष्याला घेऊन मीच मला, बरबाद होतांना बघत राहिलो..! रक्ताळलेल्या हातांकडे माझ्या मी बघत राहिलो, हातांनी हातांशीच तो मागण्याचा करार केला, जेव्हा वार झाले,तेव्हा सावरले किती, तेव्हा हाताकडे बघुनच मग मी, माझ्या आयुष्याचीच गोळा बेरीज करत राहिलो अन् मग पुन्हा पुन्हा उद्याच्या उज्वल भविष्यासाठी मी भिकच मागत राहिलो..! Written by, Bharat Sonwane.

The Untold stories..!

The Untold stories..! पहाटेची थंडी आता दिवसेंदिवस वाढत आहे.जसजशी पहाट होते तसतशी पहाटेची साखर झोप आधिकच गडद होत जाते पण पहाटेच्या साखर झोपेसोबत सवयीच्या झालेल्या काही आवाजाने मात्र मन सभोवतालच्या वातावरणातील बदल अन् कानावर पडणारे सगळेच आवाज गोधडीत पडूनही कितीवेळ ऐकत बसलेलो असतो..! पूर्वेच्या दिशेने खिडकीच्या फटीतून येणारी सूर्याची कोवळी किरणं,पहाटेच्या कोवळ्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात रस्त्यावर निपचित पडलेली कुत्रे,पहाटेच उठून त्यांच्या पिलांची सुरू झालेली ओरडायची स्पर्धा.तारेवर भरलेली असंख्य पक्षांची शाळा,त्यांचं एक लईत ओरडत आसमंताला साद घालणं,बैलगाडीचा इतक्या पहाटे शेताकडे जातांना चाकाला लावलेल्या गुंघराचा येणारा आवाज..! मंदिरात उत्तरार्धकडे वळालेला काकडा,शेवटचा अभंग,शेवटची गवळण,शेवटची आरती,पसायदान,घंटेचा नाद,कपुरचा सुगंध,कपाळी लावलेला बुक्का,अष्टगंध,चंदन गंध,म्हाताऱ्या आजोबांचे पांढरे धोतर त्याला येणारा कस्तुरीचा सुगंध,अन् आजोबांच्या चेहऱ्यावर असलेले भक्तिभाव..! आजोबांच्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत हरी भक्तित त्यांचं रमून जाणे अन् त्यांची ती इच्छा..! झाला शे

संगमेश्वराचं देऊळ..!

संगमेश्वराचं देऊळ..!  संगेश्वराचं देऊळ..! गावाला आलं की मी कुठे जावो न जावो या देऊळात न चुकता जातो म्हणजे जातो.ज्याप्रमाणे प्रत्येक गावाच्या एकांताला,एकांगाला महादेवाचं देऊळ असते अगदी त्याच पद्धतीनं हे ही देऊळ माझ्या गावाच्या अगदी एकांगाला,एकांतात आहे..! तसं माझं,आमचं गाव सोडून आम्हाला बरीच वर्ष झाली,एखाद-दोन वर्षांचा असेल मी तेव्हा बाबांनी गाव सोडले अन् आमच्या शिक्षणाला म्हणून आम्ही तालुक्याच्या गावाला रहायला आलो,ते तालुक्यातच स्थिर झालो..! परंतु गावाशी जोडलेली नाळ काही केल्या तुटली नाही,सनवार,लग्न,इतर कार्यक्रम,शेतीचे कामे असले की गावाला येणं होतं.गावाला शेती अन् धूळखात पडलेल जुन्या पद्धतीचं आमचं घर अजूनही आहे,जे शेवटच्या घटका मोजत आहे.जिथं माझं बालपण,वडिलांचं उभे आयुष्य याच्या जिवंतखुणा अजूनही दिसतात,त्यामुळे त्याचं नुतनीकरण करण्यास मन कधी धजावले नाही..! घराच्या समोर असलेला वाहत्या शिवनामायचा परिसर,संत सावता माळ्याचे भव्यदिव्य मंदिर,हनुमानाचे कळसावर गरुड विराजमान असलेलं मंदिर,पुढे एकांगाला असलेलं संगेश्वराचं देऊळ अन् आयुष्याला शेवटचं वळण भेटलं की

माई एक पर्व..! 💙

माई एक पर्व..! 💙 साधारण दुसऱ्या लॉकडाऊनमधील ही गोष्ट असावी,माझं ऑनलाईन कॉलेज चालू होते अन् या काळात मी जॉब सोडला होता तसा अजूनही सोडलाच आहे.नेहमीप्रमाणे दुपारचे जेवण झाले,अभ्यास झाला अन् मी आणि आई टीव्ही बघत बसलो होतो..! टीव्हीवर चॅनल बदलत असतांना आईला "सिंधूताई सपकाळ" यांच्या भूमिकेतील अभिनेत्री "तेजस्विनी पंडित" बघितली अन् आईने मला ते चॅनल पुन्हा लावायला सांगितले, लावलं अन् त्या चॅनलवर "मी सिंधूताई सपकाळ" हा चित्रपट चालू होता. एरवी सध्या घरी फक्त मी अन् आईच असल्यामुळे आम्ही रोज सायंकाळी जेवण झाले की यु-ट्यूबवर भजन,कीर्तन,कविता,व्याख्यान ऐकत बसलेलो असतो..! अलिकडे आईला त्या एक विचारसरणी असलेल्या टीव्हीवरील सिरियल बघायला आवडत नाही,म्हणून मग आम्ही सायंकाळी ठरलेल्या वेळेत मोबाईलवर वरील सर्व गोष्टी बघत,ऐकत असतो..! एक दिवस सहज यु-ट्यूबवर स्क्रोल करतांना आईनं "सिंधूताई सपकाळ" (माई) यांचा जीवनसंघर्ष,स्मशानात प्रेतावर भाजलेली भाकर अन् तो सर्व खडतर प्रवास बघितला.त्यापूर्वी आई माईबद्दल जाणून होती पण आईच्या आयुष्यात गेले काही वर्ष सोडले तर तिला

त्या दोघी..!

त्या दोघी..! सर्वत्र रात्रीचा काळोख पसरला आहे,रात्रीची थंडी अंगावर येते आहे अन्  एकाकीच साडेबाराच्या ठोक्याला तिचा आवाज कानी पडतो अन् त्या दोघींची भांडणे चालू असेल का..? की दोघी दारू प्यायला असतील म्हणून इतक्या मोठ्या आवाजात शिव्या देत त्या कचाकच भांडत आहेत,असतील. अलीकडे म्हणजे बहुत दिवसांपूर्वी कळलं त्या जगण्यासाठी कुठल्याही हद्दीला जावू शकता,दिवसभर त्या मिळेल ते काम करत असतात.शेजारच्या परिसरात प्लॅस्टिकच्या बाटल्या जमा करून त्या भंगारवाल्याला विकून त्याचा पैसा करता अन् काहीतरी आणून खातात.त्यांच्या झोपडीची चूल कधीच मला विस्तवाने जळताना दिसली नाही,कधीतरी काही हाती लागलं नाही की शेजारीच असलेल्या नाल्यात एक फाटकी साडी त्यांनी मासे पकडायच्या जाळ्याप्रमाणे लावून दिलेली आहे,वेळोवळी त्या जाळ्यात जे काही मासे,पानकोंबड्या,खेकडे येतात पहाटीच धुंडाळून त्या ते आणून भाजून खावून घेतात..! कधीतरी अंघोळ करावी वाटली तर त्या पाण्यातच तीही करून घेता,एकांगाला असल्यानं तिकडं कुणी भटकतही नाही पण त्यांचा असा आवाज आला की काळीज चिरत जाते.कारण मग त्या दारू प्यायलेल्या अवस्थेत एकमेकांना मारताही तर कध

आयुष्य आणि वळणं..!

आयुष्य आणि वळणं..! सकाळ सरून दुपारचं आभाळ विंडोग्रीलला असलेल्या पडद्याआडून घराच्या आत येतं अन् त्याच्या बरोबर एक अनामिक हुरहुर घराच्या आत येऊन जाते की काय असा भास व्हायला लागतो.भूतकाळ आठवणींचा होतो,वर्तमान काळ भविष्यकाळातील चिंताना घेऊन आणि विंडोग्रीलच्या पल्ल्याड असलेल्या भूतकाळातील आठवणींना मग मन उजाळा देऊ लागते..! ऑफिसच्या आठवणी,आठवांचा तो काळ धूसर होवून आठवू लागतो.सध्यास्थितीत जगत असलेल्या आयुष्याला घेऊन मग कारणे शोधली जातात अन् आयुष्यात वेळोवेळी आलेलं रिकामपण किती खायला उठतं याचा प्रत्यय येतो.दिवसभरातून कित्येकदा आयुष्याची गणितं जुळवून बघितली जातात,कित्येकदा तारुण्याच्या उंबरठ्यावर वयाला हुलकावणी देऊन जाणारे क्षण आठवून मग टिपूस गाळणं होतं..! कारण जेव्हा तारुण्याच्या उंबरठ्यावर आपलं वय आपल्याला हुलकावणी द्यायला लागतं,तेव्हा आयुष्यात सर्व गोष्टींना घेऊन स्थिर होणे या अवस्थेचा अर्थ आपल्याला कळायला लागतो..! अन् जेव्हा हा अर्थ अन् त्याच्या बरोबरीने आपल्या आयुष्याची गणितं आपण जुळवू बघत असतो तेव्हा आपल्या आयुष्याला घेऊन आपल्या हाताने किंवा काही इतर कारणास्तव विस्कळीत केलेला भ

आक्काच्या सुमीच बाळंतपण..!

आक्काच्या सुमीचं बाळंतपण..! कालच्या दै."सकाळ" वृत्तपत्रात संपूर्ण मराठवाडा आवृत्तीमध्ये "मैफल" या सदरात माझी "आक्काच्या सूमीचं बाळंतपण" ही कथा प्रसिद्ध झाली आहे..! मनस्वी खूप खूप धन्यवाद..! Vikas Deshmukh सर, दै.सकाळ मिडिया समुह,औरंगाबाद..! शीर्षक:आक्काच्या सुमीचं बाळंतपण..! थंडीचे दिवस सुरू होवून महिना-दोन महिने उलटले होते आणि आता कडाक्याची थंडी रातच्याला जाणवायला लागली होती.गावात सांच्याला जागोजागी शेकोट्या पेटवल्या जात होत्या,सांज सरायला लागली की थंडीचे शरीराला बोचण्याचे काम सुरू होत असायचं.... दिवसभर राखोळीला असलेल्या गावातल्या बकऱ्यांना वळून-वळून मी दमून गेलो होतो.सांच्याला बकऱ्या दावणीला बांधून,मोरीत म्या हातपाय धुतले अन् एकाकीच थंडीमुळे मला हुडहुडी भरून आली.मायना चुल्हीवर कोरा चहा उकळायला ठेवला होता,अंगात हुडहुडी भरून आल्यानं मी चुल्हीपाशी जावून तिच्या लालबुंध झालेल्या निखाऱ्याला ताटलीनं अलिकडं ओढून शेकत बसलो होतो..! कडाक्याच्या थंडीमुळे चुल्हीजवळ छान वाटत होत,मायच्या भाकरी थापून झाल्या होत्या,पिठलं चुल्हीच्या एकांगाला रटारट आळत होतं,चहा

गावरहाटी..!

गावरहाटी..! नेहमीप्रमाणे खूप दिवसांनी पहाटेच्या गारव्यात बापाचं गाव जवळ करायचं,रोजची शहराची झालेली सवय आणि क्युबिकल्सच्या दूनियेपासून काही तासांची सुटका किंवा मनाला पडलेल्या असंख्य प्रश्नांना उत्तरे शोधायची आहे म्हणून मग बापाच्या गावाला जवळ करणं होतं..! गावाला आलं की मनसोक्त भटकणं होतं,गावाची ओढ अलीकडे फारशी जाणवत नाही पण आठ-दहा दिवस झाले की शिवनामायची आठवण येते.तिच्या तिरावर असलेल्या हेमाडपंती संगमेश्र्वर बोलावतो आहे असे भास होतात.मग कधी एकदा जावून त्याच्या प्रांगणात मला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं सोडवतो असे होते,कारण काही प्रश्नांची उत्तरे हेमाडपंती संगमेश्र्वराच्या प्रांगणात ध्यानस्थ बसले की मगच सुटतात..! पहाटे आठच्या सुमाराला गावाला आलं की मग नदीच्या तीरावर चालत राहायचं,थंडीचे दिवस असल्यानं शिवनामायच्या वाहत्या पाण्यावर वाफ तरंगत असताना डोळ्यांना नजरी पडत आहे.रात्रीच्या सोसाट्याच्या वाऱ्याने वाटेवर गुलमोहराच्या फुलांचा पडलेला सडा अन् डोईवर गुलमोहराचा मंडप,नदीच्या तीरावर बोडक्या झालेल्या बाभळी हिरवाईने नटलेल्या आहे,पिवळ्या फुलांचा होत असलेला डोईवर वर्षाव,रानमोगऱ्याचा वाट

औद्योगिक वसाहती अन् काम करणारा मजूर वर्ग..!

औद्योगिक वसाहती अन् काम करणारा मजूर वर्ग..! औद्योगिक वसाहतीत काम करणारा मजूरवर्ग अन् माझे नाते मला नेहमीच खूप जवळचे वाटत आले आहे, का असे..? याला उत्तर आपसूकच माहित नाही हे येतं..! अलीकडे औद्योगिक वसाहतीत कंत्राटी पद्धतीने काम करायला म्हणून नोकरी शोधायला म्हणून येणाऱ्या तरुण मुलांच्या टोळक्या बघितल्या की,माझी नजर नेहमीप्रमाणे त्या माझ्या प्रत्येक जवळच्या मजूर मित्रांना शोधत असते.कारण त्या प्रत्येक मित्राच्या आयुष्यामागे प्रत्येकाची एक वेगळी कथा असते..! त्यांचं जीवन न अनुभवतासुद्धा फक्त आपल्यात पारखायची कुवत असलेली नजर असली की आपण त्यांच्या या जीवनाशी संवाद करू लागतो..! माझ्या परिस्थितीने मला ही पारखण्याची नजर लवकरच दिली किंवा त्या काबिल बनवलं,त्यामुळं औद्योगिक वसाहतीत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या मित्रांच्या जगण्याची व्यथा,त्यांच्या जगण्यात असलेला संघर्ष माझ्या डोळ्यांना सहज दिसून येतो,त्यांच्या चेहऱ्यावरील ते भाव खूप सहज त्यांची आतून झालेली वाईट अवस्था मला कळून चुकते..! औद्योगिक वसाहतीत काही ठराविक वेळेला वेळेला गेलं की,कावर्याबावर्या करत फिरणाऱ्या तरुणांच्या नजरा तुम्हाल