औद्योगिक वसाहती अन् काम करणारा मजूर वर्ग..!
औद्योगिक वसाहतीत काम करणारा मजूरवर्ग अन् माझे नाते मला नेहमीच खूप जवळचे वाटत आले आहे,
का असे..?
याला उत्तर आपसूकच माहित नाही हे येतं..!
अलीकडे औद्योगिक वसाहतीत कंत्राटी पद्धतीने काम करायला म्हणून नोकरी शोधायला म्हणून येणाऱ्या तरुण मुलांच्या टोळक्या बघितल्या की,माझी नजर नेहमीप्रमाणे त्या माझ्या प्रत्येक जवळच्या मजूर मित्रांना शोधत असते.कारण त्या प्रत्येक मित्राच्या आयुष्यामागे प्रत्येकाची एक वेगळी कथा असते..!
त्यांचं जीवन न अनुभवतासुद्धा फक्त आपल्यात पारखायची कुवत असलेली नजर असली की आपण त्यांच्या या जीवनाशी संवाद करू लागतो..!
माझ्या परिस्थितीने मला ही पारखण्याची नजर लवकरच दिली किंवा त्या काबिल बनवलं,त्यामुळं औद्योगिक वसाहतीत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या मित्रांच्या जगण्याची व्यथा,त्यांच्या जगण्यात असलेला संघर्ष माझ्या डोळ्यांना सहज दिसून येतो,त्यांच्या चेहऱ्यावरील ते भाव खूप सहज त्यांची आतून झालेली वाईट अवस्था मला कळून चुकते..!
औद्योगिक वसाहतीत काही ठराविक वेळेला वेळेला गेलं की,कावर्याबावर्या करत फिरणाऱ्या तरुणांच्या नजरा तुम्हाला दिसतील.यात कुणी अर्धवट शिक्षण झालेला अन् अलीकडे तर बऱ्यापैकी सुशिक्षित असलेला तरुणही यात असतो.कंत्राटी पद्धतीने कुठल्यातरी कंपनीत आपलं काम होईल म्हणून तो या कंपनीच्या गेटवरून त्या कंपनीच्या गेटवर भटकंती करत असतो..!
गेटवर सेक्युरिटी गार्डला विचारपूस केली की त्यांची ठरलेली तीच तीच उत्तरे पण पर्याय नसतो अन् सोबत एक अशीही आशा असते की कुठेतरी आपली दखल घेतली जाईल,आपले कागदपत्र तपासले जाईल अन् सहा महिने का होईना पण कंत्राटी पद्धतीने कामगार म्हणून आपल्याला त्या कंपनीत काम करता येईल.हा विचार करून भटकत असतात ही तरुण मुलं रोजगाराच्या संधी शोधत...
पर्याय नाहीये कारण उपलब्ध नसलेला रोजगार अन् दरवर्षी शिक्षण पूर्ण करून जॉबसाठी तयार होणाऱ्या मुलांच्या नवीन बॅचेस,कुठलाही नसलेला ताळमेळ.अनुभवी मुलांना असलेलं प्राधान्य अन् यामुळे फ्रेशर असलेल्या सुशिक्षत मुलांची नौकरीसाठी होत असलेली घुसमट,फजिती अन् त्यांचं हवालदिल होणं.हे सर्व खूप चिंता करायला लावणारं आहे..!
शेतीतून न झालेली आर्थिक प्रगती,आलेल्या नैसर्गिक आपत्ती,शेतमालाला न मिळणारा योग्य भाव,दिवसेंदिवस लोकसंख्या वाढ अन् शेतीचे कमी झालेलं क्षेत्र हे,शहराकडे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल या आशेने शहराकडे वळणारा तरुण वर्ग आणि त्यामुळंच वाढलेली बेकारी अन् असे अनेक इतर कारणे यामुळे आपल्या पोटापाण्यासाठी पुन्हा एकदा शहराकडे वळलेला तरुण वर्ग..!
आज जेव्हा केव्हा औद्योगिक वसाहतीत नोकरीसाठी जाणं होतं,तेव्हा विविध कंपनीच्या गेटवर कंपनीत कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने भरती होण्यासाठी आलेला सुशिक्षित,अशिक्षित,अनुभवी,अनुभव नसलेला मजूर वर्ग बघितला की अनेक प्रश्न पडून जातात,आजच्या या तरुण पिढीचे भवितव्य किती अंधकारमय आहे..? त्याला कारणीभुत कोण..? याला पर्याय काय असेल..?
कंपनीत कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर का असेना काम मिळावे म्हणून चालू असलेला संघर्ष बघितला की जुने दिवस आठवतात,अजूनही काही बदलले नाहीये,तेव्हा अश्या वेळेला होणारी अवस्था खूप वाईट असते.दिवसभर काम भेटेल या आशेनं या कंपनीच्या गेटवरून त्या कंपनीच्या गेटवर फिरत राहणे,मिळाले तर सहा महिने काम नाही तर पदरी पडलेली निराशा...
अनेकदा कंपनीत काम भेटले तरी मिळणारी तुटपुंजी हजेरी अन् यातून न होणारा उदरनिर्वाह.पुन्हा गावाकडे असलेल्या आई वडिलांना असलेली काळजी,त्यांना यातून पाठवता येईल तितके पैसे पाठवणे अन् कित्येकदा कंपनीत एक वेळचे जेवण भेटते म्हणून त्या एक वेळच्या जेवणावर राहून एक वेळ चहा बिस्कीटवर जगणारी मित्रसुद्धा बघितले.अश्यावेळी आपण काही करू शकत नाही ही जाणीव खूप त्रास देणारी असते....
या व्यथा न संपणाऱ्या आहे त्यामुळं यावर कितीही लिहले तरी कमीच असेल,पण पर्याय म्हणून रोजगार निर्मितीची नवीन साधनं सुद्धा उपलब्ध व्हायला हवी आहे असे वाटते..!
Written by,
Bharat Sonwane.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा