मुख्य सामग्रीवर वगळा

औद्योगिक वसाहतीत भेटलेला अवलिया..!

औद्योगिक वसाहतीत भेटलेला अवलिया..!

आयुष्याला घेऊन आपण कधीतरी खूप छोट्या छोट्या गोष्टींना घेऊन समाधानी असतो तर कधीतरी आपण आपलं आयुष्य गुंतागुंतीचे करून घेतो अन् त्यातून मिळणारा सर्वोच्च कोटीचा जो आनंद आहे त्यात आपण खुश होत असतो.

अलिकडे आयुष्याला घेऊन जेव्हा विचार करतो तेव्हा हा विषय येतो अन् याबाबतीत खूप खोलवर विचार केला जातो तेव्हा आयुष्यात आपण आतापर्यंत एकतर खूप काही गमावलं किंवा येथून पुढे सर्वच अलबेल असले तर खूप काही मिळवू शकू याची प्रचिती येते..!

साधारण बाविशित असेल तेव्हा अाेद्योगिक वसाहतीत पहिल्यांदा कामाला गेलो कामाच्या अन् पगाराच्या बाबतीत सतत उंचीचा आलेख बघत असल्यानं,काही गोष्टी मला गौण वाटायच्या.साहजिक आहे त्यासाठी तितकी मेहनत करत असायचो,आयुष्याला,आयुष्यात आलेल्या क्षणांना तितके पिळून काढायला आवडायचं,मेहनत करायला आवडायचं..!

नेहमीप्रमाणे असेच एक दिवस दुसऱ्या शिफ्टमधले काम करून सुट्टी झाली अन् घरी परतायची वेळ झाली.साधारण पावणे बारा वाजलेले होते,कंपनीच्या गेट बाहेर आलो अन् थंडीचे दिवस असल्यानं हुडहुडी भरून आली.वर म्हंटल्याप्रमाणे नशिबाने खूप गोष्टी मला माझ्या आयुष्यात लवकर मिळाल्या त्यात एक वडिलांची दुचाकी गाडी होती...

थंडी खूप असल्यानं अवस्था वाईट झाली होती,गाडी जवळ येऊन बघतो तर गाडी पंक्चर झालेली.बरे बसून घेऊन जावं तर वालशिट कट होवून जाईल अन् ट्यूब बेकामी होईल अन् आजचा संपूर्ण काम केलेला पैसा त्यात जाईल म्हणून मी ती दुचाकी घेऊन एमआयडीसीच्या सूनसान रस्त्यानं पायी निघालो..!

साधारण बारा वाजले होते,हात थंडीने कुडकुडत होते.स्वेटर अंगात होते पण अंगकाठी खूप बारीक असल्यानं मी थंडीनं कुडकुडत,थरथर कापत होतो ते सहज लक्षात येत होते.कंपनीत अलिकडेच नव्याने झालेले मित्र मी पायी चालत असताना मला सोबतीला चालायला भेटले..!

आयुष्याला घेऊन जगण्याच सार ते मला सांगून गेले.रात्र पहुडली होती, काळजाला चर करणारा काळोख अन् काळोखात धुक्यांचे लोट दिसायचे.सूनसान रस्ता असल्यानं भिती वाटायची पण नवे मित्र असल्यानं गाडी लोटत चालत होतो..!

मी पहिल्यांदा असा पाई चालत होतो अन् आज हा अनुभव किती भयावह करणारा आहे याची प्रचिती येत होती,कारण याच काळोखाच्या रस्त्याने अनेक चोरी,लुटीच्या घटना रात्री काम करायला येणाऱ्या या मुलांसोबत झालेल्या आठवल्या पण आपण रोज गाडीवर जातो ही होणारी जाणीव सुखद होती..!

अन् एकीकडे एवढ्या थंडीत,चोरी लूटमारीचा धाक असूनही ही मुलं कुठलीही तक्रार न करता कित्येक वर्ष याच रस्त्यानं येजा करत होते, थंडी,ऊन,वारा,पाऊस यांचं त्यांना कुठलं सोयरसुतक नव्हतंच.मी नेहमीच Duty सुटल्यावर गाडीवर मागे बसून कुणाला घेऊन यायचो अन् मेन रोड आला की तिथे सोडून द्यायचो पण तिथून पुढं किती दूरपर्यंत ते पायी जायचे त्याचं काय..?

अश्या छोट्या छोट्या गोष्टींना घेऊन मी समाधानी होतो परंतु आयुष्याला घेऊन त्या मुलांकडे बघितले की आयुष्य इतकं खडतर परिस्थिती प्रवास करायला लावते याची प्रचिती यायची हे सगळं जवळून अनुभवल्या शिवाय अन् अनुभव घेतल्या शिवाय ती झळ आपल्या पर्यंत पोहचत नसते म्हणून मी आयुष्याला अनेकदा हे अनुभवण्यासाठी स्वतःला संकटात टाकून ते अनुभवलं ते वेगळं अन् आजचा हा अनुभव वेगळा होता..!

लख्ख काळोखाच्या अंधारातून रोडवर असलेल्या स्ट्रीट लाईटच्या उजेडाला आलो अन् मित्र त्यांच्या मार्गाला लागले काही दहा-पंधरा मिनिटे गाडीचा तोल सांभाळत पायी चालत असताना आयुष्याला घेऊन सर्वच विचार या पंधरा मिनिटांत करून घेतला जितका विचार आजवर कधी केला नव्हता..!

गाडी लोटत लोटत एका नावाला असलेल्या पंक्चरच्या दुकानवजा दुकान असलेल्या ठिकाणी आणली,पेंगुळलेल्या अवस्थेत असलेल्या त्या कारागिराला उठवले पैसा येणार म्हणून तोही ताडकन उठला.झोपला म्हणजे काही कॉटवर तो झोपला नव्हता तर जमिनीवरच पानकापड अंथरूण तो पहुडला होता..!

उठला हत्याराने टायर खोलले अन् पंक्चर चेक करायला म्हणून ते ट्यूब त्या गढूळ थंडगार पाण्यात हात घालून टायर फिरवू लागला,साफ करू लागला,थंडीने हात थरथर करत होते.तेव्हा मी ही फार बोलका असल्यानं कुठला..? किती कमावतो..? अशी प्रश्न केली.बोलणं झालं अन् बरीच प्रश्न जी आयुष्याला घेऊन पडली होती त्या प्रश्नांना उत्तरे नकळत मिळाली..!

उत्तरे होती एमपी से आया हुं भय्या..! कुछ ढाई-तीन सौ दिनरात करके कमा लेता हुं,तुम्हारे जैसा सिखा होता तो कोनसी कंपनी मे लग जाता.
बोलला पण कंपनीत आमची काय अवस्था असते त्याला काय सांगणार होतो..!

तो म्हंटला कित्ये कमाते हो..?
काय बोलणार त्याच्याकडे बघून सांगितलं कुछ नही आठ घंटे के तीन सौ तीस रुपये कमाता हुं,एक वखत का खाना,नाश्ता,चाय उपरसे मिलती है बस..!
काम क्या होता हैं..?
काम का मत पूछो भाई Casual हुं,साहाब जो बोलेंगे ओ करना पडता हैं..!
लेकीन अच्छा है जो है..!

सिखा होता तो मै बी आता,लेकीन अनपडगवार जो हुं..!
त्याच्या खांद्यावर हात ठेऊन म्हंटले,
भाई तेरा काम भी कुछ बुरा नही हैं,अच्छा कमा लेते हो और तुम ईमानदार हो तो तरक्की करोगे तुम..!

माझ्याकडे बघून तो चमकला..!
एरवी पंक्चर काढून टायर फिट करून झाले होते,हवा भरली होती त्यानं पुन्हा त्याचं हत्यारे गुंडाळले अन् मी ही हातात पैसे देऊन चल आता हुं..! म्हणून निघायला लागलो..!

भाईने काय करावं..?
जरा रोको म्हंटला अन् त्या गढूळ पाण्यात हात धुवून हात पुसले अन् भाई गळ्यात पडला,काय आनंद झाला होता माहीत नाही त्याला..!
त्या मिठीत कामाचा थकवा अन् आयुष्य या गोष्टींचा मला विसर पडला होता..!

मिलते रहेंगे म्हंटले अन् निघालो गाडी घेऊन घराची वाट जवळ करायला,तो दूरवर जास्तोवर मला बघत होता.आज मी खुश होतो आयुष्यात एक नवीन अनुभव आला होता,आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन पुन्हा बदलला होता..!

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...