मुख्य सामग्रीवर वगळा

बौद्ध धम्माचे एक जागतिक कीर्तीचे मार्गदर्शक हरपले..!

बौद्ध धम्माचे एक जागतिक कीर्तीचे मार्गदर्शक हरपले..!


२२ जानेवारी २०२२.
बौद्ध धम्माचे एक जागतिक कीर्तीचे मार्गदर्शक हरपले.

महान बौद्ध विचारक अन् बौद्ध धर्माचा सर्व जगभरात प्रसार करणारे तसेच जगामध्ये 'सोशली एंगेज बुद्धिजम' च्या माध्यमातून क्रांती आणणारे महान बौद्ध भिक्खू "तिक न्यात हन्ह" यांचे दि.२२ जानेवारी २०२२ रोजी वयाच्या ९५ व्या वर्षी निर्वाण..!

"तिक न्यात हन्ह" यांचा जन्म ११ ऑक्टोबर १९२६ ला "व्हिएतनाम" येथे झाला.वयाच्या १६व्या वर्षी झेंन मॉनेस्ट्रीमध्ये ते सहभागी झाले.१९४९ मध्ये त्यांनी आपल्याला पूर्णतः बौद्ध भिक्खू जीवनामध्ये सामील केले.जागतिक स्तरावर त्यांना "तिक न्यात हन्ह" म्हणून ओळखले जाते,"तिक" या शब्दाचा अर्थ म्हणजे ते शाक्य कुळाचा एक भाग आहेत..!

"तिक न्यात हन्ह" व्हिएतनाम येथील प्रसिद्ध बौद्ध विचारक,आध्यात्मिक गुरू,कवी,लेखक होते.ज्यांच्या विचारांना जगभरात वाचल्या,समजून घेतल्या गेले.त्यांनी अनेक पुस्तके लिहले जे जीवन जगण्यासाठी आपल्याला प्रेरणा देणारे होते.
भारत देशातसुद्धा हे लोकप्रिय लेखक होते..!
जगण्याचे सार सांगणारे अन् बौद्ध धर्माचे तत्वज्ञान,धर्माचा जगभर त्यांनी केलेला प्रसार यावर त्यांचे इंग्रजी अन् हिंदी भाषेत ग्रंथ प्रकाशित झाले व काही प्रकाशनाच्या मार्गावर आहेत..!

१)"Old Path White Cloud's".
२)"The Stone Boy".
३)"Cultivating the Mind of Love".
४)"Our Appointment With Life".
५)"जहं जहं चरन परे गौतम के".

जगभरातील नावाजलेल्या विद्यापीठात त्यांनी व्याख्याने दिली तरुणांना जगण्याचा मार्ग,जगभरात युद्ध काळात शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी त्यांनी आपल्या व्याख्यानातून शांततेचे संदेश जगाला दिला.याच दशकात २६ जानेवारी १९६७ साली ते "नोबेल पिस प्राईज"साठी नॉमीनेट झाले होते.या दशकात जेव्हा व्हिएतनाम मध्ये झालेल्या युद्धात सापडलेल्या अनेक निर्वासितांना त्यांनी आश्रय दिला.१९६० साली त्यांनी "School of Use For Social Services" नावाची संस्था स्थापन केली.संस्थेमार्फत गाव,शाळा,दवाखाने यांचे पुनर्वसन करण्यात आले या कार्यात त्यांच्या अनेक स्वयंसेवकानी अहोरात्र काम केले अन् जगाला शांतता प्रस्थापित करण्यासाठी एक संदेश आपल्या या कार्यातून दिला ..!

बौद्ध धर्माचा जगभर त्यांनी प्रसार केला बौद्ध धर्माचे तत्व स्वीकारून आपल्या वैयक्तिक आयुष्याला आपण कसे समृध्द बनवू शकतो याचे त्यांनी नेहमीच मार्गदर्शन केले."दलाई लामा" यांनीही त्यांच्या कार्याची नोंद घेतली अन् नंतर या कार्याला हाती घेत जगभरातील संघटना या कार्यात सहभागी होवून काम करू लागल्या..!

काही दिवसांपूर्वी त्यांचे "जहं जहं चरन परे गौतम के". हे पुस्तक वाचनात आले.ज्या माध्यमातून त्यांनी भगवान गौतम बुद्धांच्या जीवन मार्गावर लेखन केले आहे,भगवान गौतम बुद्धांनी आपल्या विचारांना घेऊन जगभर केलेल्या भ्रमंतीवर त्यांनी या पुस्तकात लिहले आहे,सोबतच भगवान गौतम बुद्धांच्या जीवनाचा सारीपाट त्यांनी या पुस्तकातून मांडला आहे. या पुस्तकाला वाचतांना आपल्याला आपण भगवान गौतम बुद्धांसमवेत त्यांच्या या मार्गावर सोबत आहोत अन् आपल्याला सोबत घेऊन गौतम बुद्ध जगभर बौद्ध धर्माचा,विचारांचा प्रसार करत आहेत याची प्रचिती येते..!

सोबतच हे पुस्तक गौतम बुद्ध यांचे जीवन चरित्र अन् त्यांनी मिळवलेले ज्ञान सांगू करणारं आहे,या पुस्तकाला पाली,संस्कृत आणि चिनी भाषेच्या स्त्रोत यांचा आधार घेऊन लिहण्यात आलेलं आहे..!

People usually consider walking on water or in thin air a miracle. But I think the real miracle is not to walk either on water or in thin air, but to walk on earth. Every day we are engaged in a miracle which we don't even recognize: a blue sky, white clouds, green leaves, the black, curious eyes of a child-our own two eyes. All is a miracle.
      - thích nhất hạnh.

Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य...

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस...