कधीतरी अश्यावेळी त्या धरणाच्या पाळेवर जाऊन बसून राहावं वाटते एकटं..! एकटं..! काही करायचं नाहीये फक्त एकटक त्या नितळ पाण्यात,सोबत जगण्यासाठी दूरवर चालेली त्या नावड्याची अन् त्याच्या नावेची धडपड बघत बसायची आहे.... समोर पाणी असून सुद्धा शरीर घामाने ओल झालं आहे,पण तरीही पाण्यात पाय टाकून बसायचं नाहीये.मनातच मनातील असंख्य विचारांचा चालेला खेळ अनुभवत बसायचा आहे खुप वेळ... कित्येकदा रडू वाटत असते,अश्रू डोळ्यात येऊन पापण्याआड ते विस्फारलेले आहेत.कधीतरी त्या धरणातील पाण्याच्या येणाऱ्या संथ लाठेप्रमाणे गालाला स्पर्श करुन,ते जमिनीत विलीन होतील नाहीतर गालावरच सुखून जातील...सोबतीला थंडपणाची जाणीव शरीराला देऊन स्वतः सोखावतील की काय,काय माहीत.... दोन प्रश्नांची उत्तरे इथे भेटतील,राहीलेल्या प्रश्नांना सोबत घेऊन हा प्रवास धरण पाळेवरून,त्या धरणात जाणाऱ्या पुलाच्या दिशेनं करायचा आहे... इथे एक प्रश्न कायमचा सुटेल,मागे अनेक प्रश्न कायमची तशीच सोडून पुन्हा कधीच ज्यांची उत्तरे शोधली जाणार नाही.कींवा नाही होणार अट्टहास त्या प्रश्नांना सोडविण्यासाठीचा कधीच... कधीतरी असे वाटते की शरीरा बरोबर हे...
माझ्या मनातल्या भावनांना लेखणीच्या सहारे कैद करण्यासाठी माझा हा ब्लॉग..! या ब्लॉग माध्यमातून मी मराठी साहित्यात नवोदित लेखक म्हणून जे काही लेखन केलेलं आहे.सोबतच माझ्या मनातील स्वगत,वाचलेल्या पुस्तकांच्या बाबतीत असलेल्या माझ्या प्रतिक्रिया,पर्यटन,क्रीडा क्षेत्रातील घडामोडींवर मला काय वाटते,माझे या विषयांवर असलेले प्रामाणिक मत,विचार मी या ब्लॉग माध्यमातून तुमच्या समोर मांडत आहे..! तेव्हा एकदा नक्कीच माझ्या या ब्लॉगला तुम्ही एकदा भेट द्या आणि आपल्या प्रतिक्रिया मला कळवा..!