कधीतरी अश्यावेळी त्या धरणाच्या पाळेवर जाऊन बसून राहावं वाटते एकटं..! एकटं..!
काही करायचं नाहीये फक्त एकटक त्या नितळ पाण्यात,सोबत जगण्यासाठी दूरवर चालेली त्या नावड्याची अन् त्याच्या नावेची धडपड बघत बसायची आहे....
समोर पाणी असून सुद्धा शरीर घामाने ओल झालं आहे,पण तरीही पाण्यात पाय टाकून बसायचं नाहीये.मनातच मनातील असंख्य विचारांचा चालेला खेळ अनुभवत बसायचा आहे खुप वेळ...
कित्येकदा रडू वाटत असते,अश्रू डोळ्यात येऊन पापण्याआड ते विस्फारलेले आहेत.कधीतरी त्या धरणातील पाण्याच्या येणाऱ्या संथ लाठेप्रमाणे गालाला स्पर्श करुन,ते जमिनीत विलीन होतील नाहीतर गालावरच सुखून जातील...सोबतीला थंडपणाची जाणीव शरीराला देऊन स्वतः सोखावतील की काय,काय माहीत....
दोन प्रश्नांची उत्तरे इथे भेटतील,राहीलेल्या प्रश्नांना सोबत घेऊन हा प्रवास धरण पाळेवरून,त्या धरणात जाणाऱ्या पुलाच्या दिशेनं करायचा आहे...
इथे एक प्रश्न कायमचा सुटेल,मागे अनेक प्रश्न कायमची तशीच सोडून पुन्हा कधीच ज्यांची उत्तरे शोधली जाणार नाही.कींवा नाही होणार अट्टहास त्या प्रश्नांना सोडविण्यासाठीचा कधीच...
कधीतरी असे वाटते की शरीरा बरोबर हे मन का दिले असेल,कारण ते करत तर काहीच नाही.सतत द्विधा मनस्थितीत पाडत असते आपल्याला,हे करू की ते करू काही करायला गेलं की ते चुकते इथे दोष कुणाला द्यायचा तर आपल्यालाच....
हा सगळा प्रवास आहे ज्यामध्ये सोबत कोणाचीच नसते,अगदी सगळेच खायला उटलेले असतात.आपली माणसे नावालाच आहे येथे आपले शरीर सुद्धा आपलीच खिल्ली उडवत असते...
या सर्वात आयुष्यभर फक्त एकच जण साथ देत असते ते म्हणजे डोळ्यांतील अश्रु त्यांचं वाहनं कधी थांबत नाही,आपलाही रडगाण्याचा प्रवास कधीच संपुष्टात येत नाही....
शेवट काय हवे असते आपल्याला व काय अपेक्षा असतात ?
अपेक्षा वगैरे या गोष्टी फक्त शब्दात छान वाटतात, माझ्यासाठी नाहीये ते बनलेले...
Even मी हे सर्व मानतच नाही...
अपेक्षा,स्वप्न,नाते,पैसा,सुख,दुःख हे सर्व माझ्यासाठी फक्त शब्द आहे.कारण काय होत की,यातील एक शब्दाचासुद्धा मी विचार केला की उभे आयुष्य डोळ्यासमोर दिसते...
तो आशेचा उंचावलेला आलेख,हो तो कल्पनेत उंचावलेलाच असतो,तो कधी प्रत्यक्षात कधी नसतोच.ही इतकी सर्व तडजोड मला सहन नाही होत,म्हणुन कधीतरी हे असे येऊन दोन सुखाच्या गोष्टी ज्या फक्त नावाला घडत आहे त्या तुला देऊन जातो.कारण तू पण काही घेतल्याशिवाय काही देत नाही हो नं...
तुझं अस्तित्व जपविण्यासाठी तू माझ्यासारख्या मन थकलेल्यांचा आधार घेत असतो,तु तुझं सूनपन आमच्या पदरात टाकून संथपणे लाठ होऊन आमच्यावर उधळत असतो...
शेवटी काय तर तू पण या व्यवहारी जगात व्यवहार शिकला आहे तर....
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा