सकाळचे नऊ वाजले होते,काही कामधंदे नसल्यानं झोपलो होतो अजुन,तितक्यात मायना हाक दिली.
"अंय लेका उठ की...आज गावात राशन आलंया...."
अन् या यळेला म्हणे,
गहू,साखर,राकेल,पामतेलाचं पाकीट,तांदुळ, तुरीची दाळ भेटणार हाय म्हणे राशनमध्ये.तेव्हा चल की लेका माझ्यासोबत गोणीचं ओझं आनाया आई मला बोलती झाली...
मी ऐकत होतो तश्शेच डोळे चोळत उठलो,अंथरुणाची घडी घालत घालत मायला बोलो,
आये पण इतके पैशे कुठून भेटल राशन आणायला ?
माय बोलती झाली आरे लेका दोन-तीन बाजार पासून साचवुन ठेवले हायसा,कमी कमी कीरानावर घर धकीत होते... म्हणलं एकदाचकां राशन आलं की,माझ्या लेकराला घेऊन जाईल आणाया राशन,मग जमा करून ठेवली पैशे खूप सारे ...
मी अंघुळ केली अन् चड्डी कर्धोड्यात आटकवून तीन गोण्या ओसरीतून काढल्या एकित गहू,एकीत तांदूळ बाकी सगळं एकीत.असं घेतलं तितक्यात मायना हाक दिली....
मी नाचत नाचत माय जवळ गेलो,मायना तांब्याच्या डब्यातून दहा-विसच्या नोटेचे बंडल दिले,मला बोलली मोज रे पोरा... किती हायसा... मी मोजले चारशे तीस रुपये होते ते.मी आईला बोलो आये आपून किती श्रीमंत झालो नाय का इतके पैशे....
आई हसत हसत बोली आवर बिगी-बिगी राशन बंद होईल मग भेटणार नाय,मी दाराची कडी लावली अन् माय पदर डोक्यावर सावरत व मी उड्या मारीत-मारीत राशन दुकान जवळ आलो....
आम्ही खूप खुश होतो आज इतका पैका अन् कमी पैशात इतकं राशन भेटणार होतं आज.खूप नंबरं होती,आईच्या बाकी जोडीदारनी पण आल्या होत्या...
मायचा नंबर आला मायना गोनी,कार्ड दिलं अन् गहू,तांदूळ त्या राशनवाल्या बाबाने मायला दिले. मी गोनीला सुतळी बांधत होतो,
माय त्याला बोली का हो मामा इतकंच राशन आलं का....?
तो नजर खाली करून बोलता झाला,हो गं माय काय करू सरकार नुस्त सांगत,पर इथवर फक्सत गहू अन् तांदूळ येऊन राहिल्यात मी तरी काय करू....
काही क्षणांपूर्वी जी माय जगातील सर्वात श्रीमंत माय म्हणुन मी बघत होतो,ती पोठापुरते पैशै कमवुनही खजिल झाली होती.अंन म्या मायकडं बघितलं...
मायना नजर झुकवित पाच कीलोचं तांदुळाचं गाठुडं माझ्या खांद्यावर दिलं,तिनं लाल गव्हाचं पंधरा किलोचं ओझं घेऊन पदर डोक्यावर सावरत,आलेलं संकट बघत जगण्यासाठी हाताश होतांना मी मायला टिपलं....ते डोळ्यात अन मनात कायमचं आयुष्यभरासाठी....
#राशनच्या_दुकानातली_खजिल_झालेली_मही_माय...
Written by,
Bharat Sonwane...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा