भर उन्हात सलम्या त्याच्या बकऱ्या घेऊन,धुळीनं माखलेल्या रस्त्यानी बकऱ्या हुडकत,हुडकत चालतोय....पुढं बकऱ्या,सलम्या मागे मी सलम्याच्या चायना मोबाईलचं गाणं चालू आहे,
"तुंम भी कभीं मेरी तंराह प्यार करके देखोना...."
मी पण चालत-चालत त्याच्या पुढे आलो,तितक्यात सलम्यानं मला आवाज दिला,ओ छोटे सरकार...इधर कहा घूम रहे हो...?
त्यानं माझ्या हातातली पिशवी,क्याटली पाहून ओळखले लक्ष्मी आईला चालला की काय नैवेद्य घेऊन छोटे सरकार,तो बोलता झाला...
मी बोलता झालो हानं यार सलम्या भाई,ते वावरातला नवीन गहू घरला आल्यात काल,मग सकाळच्याला मायना पुरणपोळी,गुळंणी केली सोबतीला भजे,वरन-भात पण केलंया....
का रं सलम्या तुला जीवावर नाही येत का फिरायचे... ?
छोटे सरकार आम्हाला कायकु येणार फिरायला जीवावर,या रांडा (बकऱ्या) आयुष्यात आल्या अन् आमचं फिरणं चालू झालं...ये सलम्या उनको कायकों रांडा बोलरारे येडे....
और बता क्या चल रहा है सलम्या तेरा ? लडके इस्कुल जाते हैं ना ? भाबी का क्या चल रहा है, परसो की दिन मिले थे राशन के दुकान पर में को....
और सूंन कुछ गेहूं,चावल होना होंगा तो घर से लेके जा,बहोत बुरे गत के दिन चालू हैं यार अभी सलम्या....
पुढे आम्ही सोबत चालू लागलो,त्याने माझ्या हातातली क्याटली त्याच्या खांद्यावर असलेल्या काठीला अटकवली व त्याने मला प्रश्न केला,जो सारं गाव हल्ली करते मला...
और क्या छोटे सरकार पैसा-बैसा कुछ कमा रहे हो क्या नहीं शहर में... ?
क्या अभीं भीं घरसे लेकर ही जी रहे हो...?.(खेड्यातील विचारदृष्टीने त्याचा हा प्रश्न)
सलम्या सध्यातरी नाही कमावत यार पण,लवकरच तेरा ये भाई ओ काच चमकते नहीं क्या बडे-बडे ओ हापीसमें काम करने को लगने वाला है...
का रे सलम्या तुला पायाला ऊन नाही लागत का,नुसता अनवाणी पायांनी फिरतोय तू.तोंडाला मास्क,रुमाल बांध साले कोरोना हो जाऐंगा ते को...
तो हसतच बोला कसले मास्क अन् कसली चप्पल,चप्पल घ्यायची होती पण साले या वर्षी लग्न नाही होऊन राहीले ना,नाहीतर तीन-चार जोड लग्नातून पसार केले की धकून जातं आपल वर्षभर...
जसे-जसे त्याचे हे विचार मी ऐकत होतो सुन्न होत होतो,चालत चालत आम्ही स्मशानाच्या ओट्यावर येऊन बसलो,तो बकऱ्यांना हुंडकत आवाज देत होता....
मी फक्त बघत होतो त्याच्या त्या अलवार नजरेकडे अन् त्याच्या त्या नजरेतून तुटणार्या उन्हाच्या तुटत्या झळईकडे...
कधीतरी त्याच्या शर्टाला मागून चिपकलेलं ते लांडुर दीसून जायचं,ते हाताने काढून फेकलं.
त्याला बोलो मोबाईल कब लिया सलम्या ?
तो बोलता झाला अरे ओ पांनसों में दीया हमारे बडे मेहुणे है उन्होंने,उसके साथ कोंणसी तो म्यामरी दिये है.उसमे गाणे है वहीं सून-सून के बेकार हो गया यार,बाजार में कल गाणे भरणे गया तो बोले पच्चास रुपये लगेंगे ज्यांदो फिर बोला....
अरे त्याला कश्याला देतो पैशे सांच्याला ये मी भरुन देतो फुकट गाणे,सध्या काही देतो मी त्याला काही गाणे दिले.
जेवण कधी करतो सलम्या तू ?
करेल आता,इथे हापश्यावरून पाणी आणतो थांब....तो पाणी घ्यायला गेला पाणी आणून त्या ओट्यावर तो बसला,मी पण बसलो...
डब्यातील माश्याचे कालवण आणि भात काढून तो खात होता,मला बोलला चल खाना खाले...
मी नकारार्थी मान हलवली अन् त्याला डब्ब्यातून आईने दिलेला नैवेद्य पुरणपोळी,गुळंणी,आणि वरण भात दिला.पोटभर जेऊन तो बोलला आता देवीला काय नैवेद्य देणार ?
मी बोलो डब्यात उरलेला दाखवेल,मग आम्ही दोघं गेलो देवीला नैवेद्य दिला,अगरबत्ती लावली बाहेर असलेल्या मुंज्याला शेंदूर फासला,अन् नारळ फोडून त्याला दाखवले,नैवेद्य ठेवले.
मंदिराची घंटी वाजून आम्ही बाहेर येऊन बसलो तो बोलला मी इथे रोज येतो या मंदिराच्या सावलीत आराम करतो,देवी,मुंज्या आहे छान वाटते,रोज भेट होती त्यांची...
तू कब आया था पिछले वक्त ?
मी बोलता झालो दो साल हो गये...
में रोज आता हू,तो भी देवी मुझे ऐसी गरीब रखीं यार और तु कभी कभी आता है,तो भी तू इतना बडा आदमी बन चुका है छोटे सरकार...
पुढे तो बोलला चल जाता हुं में,उधर मेरी बकऱ्या खा लेंगे कुत्ते...
तो गेला,मी मात्र बघत राहीलो त्याच्या पाठमोऱ्या आकृतीला अन् माझ्या वाईट परिस्थितीला,विचार करत राहिलो मृगजळ काय असते अन् त्याचे सुख कोणते...
एकटा होतो तिथं मी कसला भास नाही की नव्हती देवी,नव्हता मुंजा...
#मंदिराच्या_सावलीतहीं_मी_अपुर्ण_आहे...
Written by,
Bharat Sonwane...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा