मुख्य सामग्रीवर वगळा

Dairy challenge

आयुष्यात सर्वाधिक गोष्टी कोणाशी शेअर केल्या असतील तर त्या फक्त माझ्या डायरीशी.म्हणजे डायरीने मला जगायला शिकवलं,लिहायला शिकवलं अन सर्वात महत्त्वाचं डायरीने एकांतावर प्रेम करायलाही मला शिकवलं....

डायरी लिखाण हे मी नियमित करतो,जसे सुचेल तसे व्यक्त होत असतो माझ्या तोडक्या मोडक्या  लिखाणातून मी डायरीवर.हो तोडक्या मोडक्याच कारण इथं नसतं कुठलं बंधन,आणी नसतं कुणी त्या लिखित स्वरूपात व्यक्त केलेल्या सुख दुःखाच्या भावनांना,क्षणांना बघणारं....

डायरी अन् कॉफी यांचा मिलाफ म्हणजे सुख असते,व हे सुख मी रोज घेत असतो....रोज रात्री फावल्या वेळेत या माझ्या (मैत्रिणीशी) डायरीशी माझी भेट होते,यावेळी खिडकीतून आत येणारा वारा माझ्या शरीराशी हितगुज घालत असतो,सोबतीला गुलजारांची गाणी या क्षणांना चार चांद लाऊन जातात...मग प्रत्येक जगलेला क्षण काॅफीला साक्षी होत,लिखित स्वरुपात एक एक शब्द सुटसुटीत मोती होत डायरीवर कैद होत जातो तो कायमसाठी....

डायरीच्या आतील सफेद पानांवर कधीतरी माझ्याशीच स्वगत घालणारं हे मन,जे कधीच थाय्रावर राहात नाही.त्याला लिखाणातुन व्यक्त करत  मी डायरीत कैद करून ठेवत असतो....

कधीतरी लेखन करत असलो की भावनांचा बांध  फुटतो,मग डोळेही अश्रुरुपी व्यक्त करून टाकतात त्या डोळ्यांतील दुःखद असो किंवा सुखद भावनांना ते अश्रुही मग होऊन जातात डायरीचे अन् डायरीशी समीप करून घेतात कधी-कधी स्वत:ला....

ते म्हणतात ना सुखात सर्व सोबती असतात अन् दुखत कोणी नाही,याची अनुभूती गेले काही दिवस नियमित येत आहे....अश्यावेळी ही डायरी एक हक्काची मैत्रीण म्हणून कायम सोबत आहे,ज्या गोष्टी आईशी व्यक्त करू शकत नाही,त्या सर्व गोष्टी या डायरी सोबत व्यक्त होतात....

कधीतरी काही पानं कायमसाठी घडी करून ठेवले जातात कधीही न उघडण्यासाठी,काही पानं हे प्रेमाचा टॅग देऊन सजविली जातात...हे सर्व करत असतांनी डायरीच्या साक्षीने अनेक वचनंही घेतली जातात,कधीतरी ते निभावून नेण्यासाठी व कधीतरी नेहमीसारखे ते मोडीत काढण्यासाठी.यालाही पाठींबा असतो तिचा कैद झालेले क्षण यावेळी बोलके होतात काय चुक,काय बरोबर ते सांगत असतात.हे सर्व या डायरीमुळेच शक्य होते अन् ती नकळत अशी साथ देऊन जाते.....

माझ्यासाठी अव्यक्त भावनांना,अव्यक्त प्रेमाला,सुख, दुःखाला लिखित स्वरूपात कैद करून व्यक्त करण्याच माध्यम आणी भुतकाळातील आठवणी व भविष्य काळातील स्वप्नांना जगण्यासाठीचे वर्तमान काळातील काही क्षण म्हणजे माझी ही डायरी (मैत्रीण)....📒♥️

आज डायरीविषयी लिहिण्याचं कारण म्हणजे #diarychallenge.

Pooja Dheringe आणि Prajakta Nagpure या दोन माझ्या अत्यंत आवडत्या लेखिका,ज्यांच लेखन मला लिखाणासाठी नेहमी प्रेरणादायी ठरते....
तुम्ही दोघींनीही मला या उपक्रमात सहभागी करुन घेतले यासाठी मनापासून तुमचे खूप खूप धन्यवाद पूजा व प्राजक्ता....🥰🥰

मी या उपक्रमासाठी कुणालाही सांगणार नाही,पण ज्यांनी कोणी हा लेख वाचला व ज्यांना कुणाला मनापासून वाटले डायरी या विषयावर लिहायचं.त्यांनी नक्कीच लिहायचं आहे,सोबत तुमच्या डायरीचा फोटोही टाकायचा अन् मला टॅग करायला विसरायचं नाही....

Written by,
Bharat Sonwane...

#favoritechallenge
#deardiarychallenge #lovefordiary #diary #diaryimportance #quarantine_time

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...