नजर मी रोखुनी नभाशी, खेळ मी केला नयनांशी करार त्यांचा झाला बघण्याशी, हरल्या अपेक्षासाठी निमित्त ते ठरले अंधारल्या भूतकाळाशी..! नयनांनी नजरेत रोज सजावी पहाट अशी, खेळ मी केला बघण्याचा बुबळांशी जीवन माझे अव्यक्त पर्याय न उरला जगण्याशी, ढळावी रोज सांज नभा आड गेल्या त्या शिखराशी..! शोधला पर्याय केला खेळ तो आयुष्याशी, फासे फिरले अन् सोंगटी ने विश्वासघात केला पटाशी जुळून यावे आयुष्य केल्या कराराशी, पुन्हा खेळ न व्हावा अन् न व्हावा फसवाफसवीचा करार नियतीशी..! नजर होते बोलकी संवाद व्यक्त न होणाऱ्या डोळ्याशी, रोज नव्याने सजली जावी चादर खेळ तो रोज व्हावा थडग्याशी..! अन् मग, व्हावा पुन्हा एकदा करार तो वाहणाऱ्या आसवांचा कोरड्या झालेल्या डोळ्यांशी, अन् अन् वाहन्या गुलाब तो रोजच चादरीवर त्या कबरीशी..! Written by, Bharat Sonwane .
माझ्या मनातल्या भावनांना लेखणीच्या सहारे कैद करण्यासाठी माझा हा ब्लॉग..! या ब्लॉग माध्यमातून मी मराठी साहित्यात नवोदित लेखक म्हणून जे काही लेखन केलेलं आहे.सोबतच माझ्या मनातील स्वगत,वाचलेल्या पुस्तकांच्या बाबतीत असलेल्या माझ्या प्रतिक्रिया,पर्यटन,क्रीडा क्षेत्रातील घडामोडींवर मला काय वाटते,माझे या विषयांवर असलेले प्रामाणिक मत,विचार मी या ब्लॉग माध्यमातून तुमच्या समोर मांडत आहे..! तेव्हा एकदा नक्कीच माझ्या या ब्लॉगला तुम्ही एकदा भेट द्या आणि आपल्या प्रतिक्रिया मला कळवा..!