#Happy_Mothers_Day...♥️ "आकाशाचा केला कागद,समुद्राची केली शाई तरी आईवर निबंध पूर्ण होणार नाही." असा लहानपणी सुविचार आपण म्हणायचो हे किती खरे होते माहित नाही पण आता... आता...नाही व्यक्त होता येत आईसाठी मला तरी शब्दांतून,शब्द आणी भावना वळीवाच्या पावसा सारख्या असतात...कधी कधी मनातुन खूप काही व्यक्त करून जातात पण जेव्हा याच भावनांना शब्दरूपात कागदावर उतरवयाची वेळ येतेना नाही जमत व्यक्त होयला आणी ते लिखित रुपात मांडायला... काय असेल याचे कारण माहित नाही,पण खूप काही व्यक्त करायचं असते मनातले,खूप काही कैद करायचं असत त्या लिखाणात जे फक्त लिखनाशीच शेअर करता येतं...पण हक्काच्या माणसांसाठी इथेही शब्दांना,भावनांना वाहणेच हाती येते,कदाचित माझं हळवं मन इथं त्याची जागा घेत असेल... आईबद्दल काय बोलायचं,फार फारतर आठवणी शेअर करू शकतो तिच्या बद्दलच्या शब्दरुपात.तिलाच शब्दात व्यक्त करायचं म्हंटले की नाहीच येत,कधी कधी वाटते की लहानपण छान असते.... आईबद्दल असलेल्या भावनांना व्यक्त करता येतं आईशी,परंतु जेव्हा आपलेच पाऊल तारुण्यात पडायला लागते तसे तसे यावर मर्यादा यायला लागतात तिची काळज...
माझ्या मनातल्या भावनांना लेखणीच्या सहारे कैद करण्यासाठी माझा हा ब्लॉग..! या ब्लॉग माध्यमातून मी मराठी साहित्यात नवोदित लेखक म्हणून जे काही लेखन केलेलं आहे.सोबतच माझ्या मनातील स्वगत,वाचलेल्या पुस्तकांच्या बाबतीत असलेल्या माझ्या प्रतिक्रिया,पर्यटन,क्रीडा क्षेत्रातील घडामोडींवर मला काय वाटते,माझे या विषयांवर असलेले प्रामाणिक मत,विचार मी या ब्लॉग माध्यमातून तुमच्या समोर मांडत आहे..! तेव्हा एकदा नक्कीच माझ्या या ब्लॉगला तुम्ही एकदा भेट द्या आणि आपल्या प्रतिक्रिया मला कळवा..!