अडगळीच्या खोलीतील जुने दस्तावेज..! होर्डिंग’ हा प्रकार आधुनिक मानसशास्त्रात ‘विकृती’ मानतात. आपल्याला हे विधान पटायला मुळीच वेळ लागणार नाही. विशेषतः रस्त्यांवरील मोठमोठ्या फ्लेक्सबोर्डांची होर्डिंग रोजच्या रोज पाहताना या विकृतीचा प्रसार केवढा झालेला आहे, याची आपल्याला कल्पना येते. दादा, बाबा, काका, अण्णा, बाप्पू, पप्पू, साहेब या साऱ्यांचे वाढदिवस तिथं साजरे केले जातात, त्यानिमित्त त्यांच्या झळकणाऱ्या सुहास्यास्पद छब्या आणि त्यांना शुभेच्छा देणारे सुहास्यास्पद ‘शुभेच्छूक’ होर्डिंगांवर झळकत असतात. पूर्वी फक्त होर्डिंगावर राजकारणी पुढारी असायचे. आता राजकारण- प्रवेशोच्छूक असे त्यांचे सुपुत्र, सुना, पोरंटोरं आणि पाळण्यातील नातवंडं यांचे जाहीरपणे (आणि चुकीच्या मराठीत) रस्त्यांवर आणि चौकाचौकांत वाढदिवस साजरे केले जातात. ही भलीमोठ्ठी ‘होर्डिंग’ ही ‘विकृती’ आहे, हे (त्या त्या बोर्डावरील लोक सोडल्यास) रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येक भारतीयालाच ठाऊक असतं. त्यासाठी आधुनिक मानसशास्त्राची साक्ष काढण्याची काहीच आवश्यकता नाही. आधुनिक मानसशास्त्राला ‘होर्डिंग’ म्हणजे अशा रस्त...
माझ्या मनातल्या भावनांना लेखणीच्या सहारे कैद करण्यासाठी माझा हा ब्लॉग..! या ब्लॉग माध्यमातून मी मराठी साहित्यात नवोदित लेखक म्हणून जे काही लेखन केलेलं आहे.सोबतच माझ्या मनातील स्वगत,वाचलेल्या पुस्तकांच्या बाबतीत असलेल्या माझ्या प्रतिक्रिया,पर्यटन,क्रीडा क्षेत्रातील घडामोडींवर मला काय वाटते,माझे या विषयांवर असलेले प्रामाणिक मत,विचार मी या ब्लॉग माध्यमातून तुमच्या समोर मांडत आहे..! तेव्हा एकदा नक्कीच माझ्या या ब्लॉगला तुम्ही एकदा भेट द्या आणि आपल्या प्रतिक्रिया मला कळवा..!