मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जून, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

AGNIPATH RECRUITMENT SCHEME

AGNIPATH RECRUITMENT SCHEME साधारण दोन-तीन दिवसांपूर्वी भारतीय डिफेन्स क्षेत्रात भारतीय सैन्य दलात भरती होण्यासाठी नवीन मार्गाचा अवलंब करण्यात आला जो निर्णय अत्यंत धक्कादायक असा आहे..! वरवर जरी हे सर्व खूप सहज अन् सोप्पं वाटणारं असले,तरीही भविष्याचा विचार केला असता ही योजना कितपत काम करेल हा प्रश्न आहे..! तर चला जाणून घेऊया भारतीय सैन्याच्या तिन्ही प्रकारात भरतीसाठी जो नवीन मार्ग अवलंबिला गेला त्या "अग्निपथ" या नवीन योजनेबद्दल..! काय आहे अग्निपथ योजना..? भारत सरकारने नवीन भरती प्रक्रिया अग्निपथची घोषणा दोन तीन दिवसांपूर्वी केली.या भरती प्रक्रियेतून जे सैनिक तयार होतील त्यांना अग्निवीर म्हंटल्या जाईल..! "अग्निपथ" माध्यमातून पुढील काही वर्षात होणारी सैन्य दलातील भरती. IndianArmy - 40000-45000-50000. Indian Air Force - 3500-4400-5300. Indian Navy - 3000-3000-3000. अग्निवीरची पहिली बॅच पुढील 90 दिवसांत सुरू होईल अन् ही पहिली बॅच 2023 मध्ये येईल. शिपाई,एअरमन,सेलर्स या पदासाठी अग्निपथ माध्यमातून भरती होत राहील.ज्यामधे वयोमर्यादा ही  कमीत कमी 17 वर्ष ते जास्तीत

MARRY HERSELF..! 💙

MARRY HERSELF..! 💙 SOLOGAMY..! 💙 वयाच्या २४ व्या वर्षी तिने स्वतःशीच लग्न करण्याचा घेतलेला निर्णय.तिच्या बाबतीत जेव्हा या बातम्या न्यूजवर झळकू लागल्या तेव्हा माझ्यासाठी हे सर्व खूप आनंद वाटणारं असं होतं.कारण तिचं स्वतःवर असलेलं प्रेम हे गेले कित्येक दिवस तिच्या इंस्टाग्राम आयडी माध्यमातून बघून होतो..! तिच्या या निर्णयाने अनेकांना अनेक प्रश्न पडले,अनेकांनी तिच्या या आगळ्यावेगळ्या निर्णयाची खिल्ली उडविली अन् अनेकांनी तिला तिच्या या निर्णयात सोबतही केली जी की खूप कौतुकास्पद बाब आहे..! मान्य आहे आपल्या देशातील संस्कृती,पिढीदर पिढी होत आलेले संस्कार,समाजाने आखून दिलेली रेषा. जिच्या पल्याड जाऊन तिने घेतलेला हा निर्णय,तिचा हा प्रवास पुढे अनेक प्रश्नांना तिला उत्तरे शोधायला लावणारा असणार आहे. परंतु "काहीतरी वेगळं केलं" असं म्हणता येणार नाही. आपल्या सभोवताली बघितलं तर हे आपल्या सगळ्यांना अनोखं,वेगळं असं काहीसं वाटणार आहे. परंतु परदेशात हे असं स्वतःवर मुक्तपणे प्रेम करत आयुष्य जगणं कधीच सुरू झालं आहे..! आपल्या देशात हे सर्व प्रथमतः घडत आहे,त्यामुळे अनेकांना हे पचनी पडणारं नाहीये हे आ