आषाढी एकादशीची वारी पूर्णत्वास आली की,वारकरी मायबाप विठ्ठल रखुमाईचे आशीर्वाद घेऊन घराच्या ओढीने पुन्हा एकदा परतीच्या मार्गाला लागतात... वारकरी मायमाऊली घरी येते व तिच्या नित्याच्या कामात व्यस्त होऊन जाते. दिवसभर काबाडकष्ट आणि सांजेच्या प्रहरी शिवना काठावर असलेल्या सावता माळ्याच्या देऊळात माऊलीच्या भक्तीरसात गुंग होऊन सर्व माऊली भक्तांनी केलेला हरिपाठ,भजन दिवसभराचा थकवा आणि संसारातील तडजोडी यांना विसरायला लावणारा असतो... इतके सर्व करूनही माझा वारकरी या दिवसात काहीतरी चिंतेत असलेला मला भासतो... कारण त्याला वारीतील एक-एक क्षण आठवत असतो अन् या निमित्ताने त्याला मायबाप विठ्ठल रखुमाईची आठवण येत असते... एरवी निसर्ग हिरवीशाल अंगावर घेऊन त्याच्या सौंदर्याची मुक्तपणे उधळण करत असतो. पावसाने नदी,नाले पूर्णपणे भरलेली असतात,श्रावणाची जसजशी चाहुल लागते तसतशी झाडांना नव्याने पालवी फुटू लागते, सुगंधित फुलांची आरास निसर्गात सर्वदूर पसरू लागते... या काळात घरात भर दुपारी शांतता असते अन् नकळत मलाही जाणीव होते की,माझ्या साहित्य क्षेत्रातील वाटचालीस सुरुवात याच दिवसांमध्ये लहानपणी आजोबांनी केलेल...
माझ्या मनातल्या भावनांना लेखणीच्या सहारे कैद करण्यासाठी माझा हा ब्लॉग..! या ब्लॉग माध्यमातून मी मराठी साहित्यात नवोदित लेखक म्हणून जे काही लेखन केलेलं आहे.सोबतच माझ्या मनातील स्वगत,वाचलेल्या पुस्तकांच्या बाबतीत असलेल्या माझ्या प्रतिक्रिया,पर्यटन,क्रीडा क्षेत्रातील घडामोडींवर मला काय वाटते,माझे या विषयांवर असलेले प्रामाणिक मत,विचार मी या ब्लॉग माध्यमातून तुमच्या समोर मांडत आहे..! तेव्हा एकदा नक्कीच माझ्या या ब्लॉगला तुम्ही एकदा भेट द्या आणि आपल्या प्रतिक्रिया मला कळवा..!