मुख्य सामग्रीवर वगळा

West Minister Bridge च्या नोंदी क्र ३

West Minister Bridge च्या नोंदी क्र ३

आज पहाटेच तुझा वायरलेस फोन आला अन् तू म्हणाली की अरे मी नऊ महिन्यांची पोटूशी आहे..!

पण तू बघतोयना जगात किती अस्थिरता माजली आहे, जिकडे पहावे तिकडे युद्ध सुरू आहे,
मी माझ्या बाळाला जन्म देऊ की नको अरे,

लष्करात असलेला माझा पती इस्राईल सैन्याच्या सोबतीने गेले दोन–चार महिने बेफिकीर होऊन लढतो आहे.  गाझा पट्टीवर पुन्हा एकदा झालेल्या बाँबबारीमध्ये एक सहा महिन्याचे बाळ पोटूशी घेऊन धावत असलेल्या एका आईला एका सैनिकाने गोळी घालून ठार केलं..!

अन् नंतर त्या सैनिकाच्या आतील बाप जागा झाला म्हणून त्यानं त्या बाळाला न मारता तसे तिथंच एकटं सोडून दिलं,
ते बाळ साध रांगतही नाही रे ते तिथेच पडून होतं. 

नंतर कुण्या पान्हा फुटलेल्या गाझा पोलिशीन बाईने त्याला स्तनाशी धरलं 
अन् ऐकणं ते बाळ रडायचं शांत झालं होतं, दूध पित होतं. 
या सगळ्यात त्याच्या आईनं काय केलं असावं,
तिचं थडगं तिथंच पडून होतं.

आठ दहा दिवसांपूर्वी वायरलेस कॉलवर पतीशी बोलत असताना त्याने त्याच्या युद्धाच्या रोजच्या कहाण्या सांगितल्या,
आज हे घडलं ते घडलं इतकी माणसं मरण पावली,
इस्राईल आता त्याला जे हवं ते मिळवणार. 

मी तेव्हा त्याला इतकंच बोलली,
तुला तुझ्या मुलावर हक्क हवा असेल तर 
माणुसकी हरवलेल्या लष्कराची नोकरी सोडून तुला तुझ्या बाळाच्या स्वागताला यावं लागेल. 

इतकं बोलत असताना कॉल एकदम डिसकनेक्ट झाला,
दोन दिवसांनी त्यांच्या बंकरवर बाँब हल्ला झाल्याचं कळलं
त्यात माझा पती शहीद झाला होता.

सैनिकाच्या फुलांनी सजवलेल्या गाडीमध्ये, सैनिकाच्या पोशाखात,
देशाच्या ध्वजात झाकून आणलेलं त्याचं कलेवर माझ्यासमोर ठेवण्यात आलं,

त्याच्या बाळाच्या स्वागताला तो नाही,
त्याचं कलेवर आलेलं होतं.

युद्धाचा शेवट असो की युद्धाचा परिणाम वाईट असतो रे..!

तुझी अस्तित्व हरवलेली मैत्रीण..!

Bharat Sonawane

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...