मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

आठवणीतली पाऊलवाट... लेबलसह पोस्ट दाखवत आहे

आठवणीतली पाऊलवाट...

#आठवणीतल्या_पाऊलवाटा...! आज दिवसभर अंगावर ब्लँकेट घेऊन खिडकीतून संथपणे पडणारा पाऊस बघत बसलो होतो. पावसात कुठलाही जोर नव्हताच आता श्रावण महिन्यातील पावसाचे वेध लागले आहे. निसर्ग पूर्णपणे त्याच्या सौंदर्याची मुक्तपणे उधळण करतोय नदी,नाले,बऱ्यापैकी भरल्यामुळे पाणी वाहते झाले आहे. अभयारण्यातील झरेही कुठेकुठे वाहू लागले आहे,श्रावणात ते पूर्णपणे रौद्ररूप धारण करणार याची जाणीव अलिकडे काही दिवस होतेय... श्रावणाची चाहूल लागली म्हणजे मग आठवण येते भद्रा मारुती पायी दर्शन दिंडी सोहळ्याची,दर शुक्रवारप्रमाणे चारही शुक्रवार कन्नड ते भद्रा मारुती पायी दर्शन मी अनुभवत असतो...यावर्षी कोरोना असल्यामुळे हे दर्शन अनुभवता येणार नाहीये आणि सोबत वेरूळ लेणी डोंगर ते शासकीय विश्रामगृह परिसरात रात्रीच्या दीड ते अडीच यावेळेत केलेला ट्रॅक,सोबतीला निसर्गाचे स्वर्गरूपही यावेळी अनुभवायला मिळणार नाही याचेही दुःख आहे... तर चला आज या स्वर्गरूप अनुभवायला देणाऱ्या प्रवासाबद्दल थोडक्यात लिहण्याचा प्रयत्न करतो... दर सालाबादाप्रमाणे पायी चालत रात्रीच्या एक-सव्वा दरम्यान मी वेरूळ लेणीच्या पायथ्याशी असलेल्या गेटव...