मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

गाव माझा..!

गाव माझा..! पहाटेची थंडी आता दिवसेंदिवस वाढत आहे.जसजशी पहाट होते तसतशी पहाटेची साखर झोप आधिकच गडद होत जाते पण पहाटेच्या साखर झोपेसोबत सवयीच्या झालेल्या काही आवाजाने मात्र मन सभोवतालच्या वातावरणातील बदल अन् कानावर पडणारे सगळेच आवाज गोधडीत पडूनही कितीवेळ ऐकत बसलेलो असतो..! पूर्वेच्या दिशेने खिडकीच्या फटीतून येणारी सूर्याची कोवळी किरणं,पहाटेच्या कोवळ्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात रस्त्यावर निपचित पडलेली कुत्रे,पहाटेच उठून त्यांच्या पिलांची सुरू झालेली ओरडायची स्पर्धा.तारेवर भरलेली असंख्य पक्षांची शाळा,त्यांचं एक लईत ओरडत आसमंताला साद घालणं,बैलगाडीचा इतक्या पहाटे शेताकडे जातांना चाकाला लावलेल्या गुंघराचा येणारा आवाज..! मंदिरात उत्तरार्धकडे वळालेला काकडा,शेवटचा अभंग,शेवटची गवळण,शेवटची आरती,पसायदान,घंटेचा नाद,कपुरचा सुगंध,कपाळी लावलेला बुक्का,अष्टगंध,चंदन गंध,म्हाताऱ्या आजोबांचे पांढरे धोतर त्याला येणारा कस्तुरीचा सुगंध,अन् आजोबांच्या चेहऱ्यावर असलेले भक्तिभाव..! आजोबांच्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत हरी भक्तित त्यांचं रमून जाणे अन् त्यांची ती इच्छा..! झाला शेवट हा गोड

आयुष्य हरवलेल्या माणसांची गणितं..!

आयुष्य हरवलेल्या माणसांची गणितं..! आयुष्यात आयुष्याला घेऊन रिकामपण आलेली माणसं आपल्या आयुष्यातील आठवणींवर आपल्या दिवसातील २४ तासातील जवळ जवळ ७०% दिवस हा आपल्या भूतकाळातील आठवणींवर जगत असतो.उरलेल्या ३०% दिवस तो फार फारतर ५% झोप घेत असतो अन् उरलेल्या २५% दिवस मधील  १५% दिवस तो उद्याचे आपले उज्ज्वल आयुष्य आणि सगळं सोईनुसार नाही झालेच तर ठोखरा खात आपण जगत असलेलं भविष्य काळातील आयुष्य डोळ्यांसमोर कल्पनेत बघत असतो.त्यात राहिलेला १०% असलेला दिवस हा फक्त वर्तमान काळातील आयुष्य फक्त तो जगत असतो. त्यातही बराच वेळ तो फक्त अनेक गोष्टींशी,अनेक तर्क वितर्क लावण्यासाठी घालवत असतो... हे असं आयुष्य जगणाऱ्या माणसांच्या आयुष्यात शक्यतो फारसे बदल होत नाही अन् झालेच तर ते खूप हळुवारप्रमाणे होतात.इतके हळुवार की त्याला सुद्धा या भविष्यातील येणाऱ्या सुखाची चाहूल होत नसते.या सुखासाठी सुद्धा त्याला आपण भोगत असलेले एकाकीपण अन् आपलं हे हळुवार आयुष्य योग्य अन् कारणी लागत आहे असं वाटत असते..! या माणसांना शक्यतो कुणाचा सहवास नकोसा वाटतो,अंधार हवाहवासा वाटतो.पहाटेचा सूर्योदय कधीतरी यांच्या आयुष्यात पुन्हा

Aurangabad Industrial Hub City..!

Aurangabad Industrial Hub City..! औरंगाबाद शहर अन् औद्योगिक वसाहतींचे जुळून आलेले समीकरण..! औरंगाबाद शहर अन् औद्योगिक वसाहतीबद्दल यापूर्वी मी अनेक लेख लिहले,जे औरंगाबाद शहर सोबतीने त्याचा इतिहास अन् साधारण पाच दशकांपूर्वी काळानुरूप ऑटोमोबाईल क्षेत्रात औरंगाबाद शहराने धरलेलं बाळसं आता याच क्षेत्रात संपूर्ण जगतात ऑटोमोबाईल क्षेत्रातील एक महत्त्वाचं शहर म्हणून झालेली ओळख हा औरंगाबाद शहराचा चढता आलेख मी माझ्या लेखणीतून नेहमीच आपल्या समोर लिखित स्वरूपात उपलब्ध करून देत आलो आहे... एकीकडे औरंगाबादमध्ये उज्ज्वल भविष्याचा विचार करून,नव्याने डीएमआयसी अंतर्गत निर्माण होणारे नवीन प्रकल्प,अलिकडेच पूर्णत्वास आलेली ऑरिक औद्योगिक वसाहत आणि शहराला जोडुन असलेल्या चिकलठाणा एमआयडीसी,शेंद्रा एमआयडीसी,वाळूज एमआयडीसी,चितेगाव परिसरात असलेली जुनी एमआयडीसी यांच्या माध्यमातून औरंगाबाद शहराला "ऑटोमोबाईल इंडस्ट्रीयल हब" सिटी ही मिळालेली नवी ओळख आहे... औरंगाबाद शहरात उपलब्ध झालेला रोजगार आणि एकीकडे कोरोनाच्या काळात उद्योग विश्वात झालेला बदल,नवीन रुजु झालेल्या संकल्पना अन् पुन्हा एकदा आता औरंगा

गुपित आयुष्याचे..!

गुपित आयुष्याचे..! मी माझा एकाकीच बरा होतो,अलिकडे गेले काही दिवस माणसांच्या सहवासात होतो अन् आता जेव्हा पूर्वापार असलेला मीच मला पुन्हा नव्याने भेटलो तेव्हा माझी मलाच विचार करायला लावणारी माझी मलाच पुन्हा एकदा नव्याने भेट झाली.त्यावेळी खूप काही चुकल्यासारखे वाटत होते अन् ते खरेही आहे,गेले काही दिवस खूप काही हातचे सुटून गेल्यासारखे झालं आहे,मला वाटतं आहे..! अस्ताला जाणारा सूर्य,सूर्याच्या साक्षीने जेव्हा सायंकाळची भटकंती रोजच नियमाने होत असायची,तेव्हा मी निसर्गातील सजीव असून निर्जीव असलेल्या झाडांना,फुलांना,दगडांना,डोंगरदऱ्यांना बोलतं करत होतो,तेही माझाशी संवाद साधत असायचे. या अवस्थेला यायला मला जवळ जवळ दोन वर्ष लागली होती,माणसांशी माणसे बोलतात पण माणसांनी या निसर्गातील या निर्जीव गोष्टींशी संवाद साधायला,संवाद करायला नको का..? म्हणून पांथस्थ होवून माझं विश्व अन् मी त्यांच्यात समरस होऊन हे सर्व अनुभवत होतो... पण पण...! गेले काही दिवस पुन्हा या माणसांच्या दूनियेशी संबंध आला अन् गेले दोन वर्ष जे एकांतांच्या सान्निध्यात राहून मी निसर्गाशी एकरूप झालो होतो ते कुठेतरी या महिना-पंधर