गुपित आयुष्याचे..!
मी माझा एकाकीच बरा होतो,अलिकडे गेले काही दिवस माणसांच्या सहवासात होतो अन् आता जेव्हा पूर्वापार असलेला मीच मला पुन्हा नव्याने भेटलो तेव्हा माझी मलाच विचार करायला लावणारी माझी मलाच पुन्हा एकदा नव्याने भेट झाली.त्यावेळी खूप काही चुकल्यासारखे वाटत होते अन् ते खरेही आहे,गेले काही दिवस खूप काही हातचे सुटून गेल्यासारखे झालं आहे,मला वाटतं आहे..!
अस्ताला जाणारा सूर्य,सूर्याच्या साक्षीने जेव्हा सायंकाळची भटकंती रोजच नियमाने होत असायची,तेव्हा मी निसर्गातील सजीव असून निर्जीव असलेल्या झाडांना,फुलांना,दगडांना,डोंगरदऱ्यांना बोलतं करत होतो,तेही माझाशी संवाद साधत असायचे.
या अवस्थेला यायला मला जवळ जवळ दोन वर्ष लागली होती,माणसांशी माणसे बोलतात पण माणसांनी या निसर्गातील या निर्जीव गोष्टींशी संवाद साधायला,संवाद करायला नको का..?
म्हणून पांथस्थ होवून माझं विश्व अन् मी त्यांच्यात समरस होऊन हे सर्व अनुभवत होतो...
पण पण...!
गेले काही दिवस पुन्हा या माणसांच्या दूनियेशी संबंध आला अन् गेले दोन वर्ष जे एकांतांच्या सान्निध्यात राहून मी निसर्गाशी एकरूप झालो होतो ते कुठेतरी या महिना-पंधरा दिवसांत माणसांच्या सहवासात मला विसरायला झालं...
जेव्हा-केव्हा पुन्हा हीच वेळ येते,तेव्हा मात्र आत्मपरीक्षण केलं की आपलं आयुष्य खूप काहीतरी वेगळं विश्व असलेलं आहे याची प्रचिती येते.अन् आज सारखे पुन्हा आपले तेच विश्व आपल्यासाठी अन् आपल्या सभोवतालच्या सजीव असून निर्जीव असलेल्या सोबत्यांसाठी आहे हे कळून चुकते..!
अलीकडे मध्यरात्री असलेला माझा भटकंतीचा प्रवास सायंकाळी अस्ताला जाणाऱ्या सूर्याबरोबर येऊन ठेपला आहे,स्ट्रीट लाईटच्या उजेडात वाट न शोधता माझी रस्त्याच्या मधोमध पडणारी लांबच लांब सावली शोधत तिच्या मार्गाने चालायला अलिकडे मला आवडत नाही...
एरवी मी सायंकाळीच स्ट्रीट लाईटचा उजेड पडण्यापूर्वी भटकायला बाहेर निघतो,आता ओळखीचा स्ट्रीट लाईटचा उजेड नसतो पण ओळखीची माणसे रस्त्याने भेटत असतात...
त्यांच्यात मीच मला नव्याने शोधत पुन्हा स्ट्रीट लाईट कधी चालू होईल अन् कधी आता त्याच्या उजेडात मी चालत राहिल याची वाट बघत असतो...
अश्यावेळी मग ही माणसं मला नकोशी होतात ती खायला उठतात मला,त्यांचं असणं किंवा माझं अस्तित्व मग मला नकोसे होते मग मी पुन्हा एकदा स्ट्रीट लाईटच्या उजेडात हलणाऱ्या झाडांशी,पान,फुलांशी,दगडांशी,खदानितील काळ्याश्यार पाण्याशी आपलुकीचे दोन शब्द करत असतो,बोडक्या टेकडीच्या काळ्याश्यार खडकाशी बोलत असतो..!
त्यांचा हा सहवास अलिकडे हवाहवासा वाटतो आहे,म्हणून पुन्हा एकदा आता परतीच्या वाटेवर हा प्रवास सुरू करायचा आहे..!
Written by,
Bharat Sonwane .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा