मुख्य सामग्रीवर वगळा

Aurangabad Industrial Hub City..!

Aurangabad Industrial Hub City..!

औरंगाबाद शहर अन् औद्योगिक वसाहतींचे जुळून आलेले समीकरण..!

औरंगाबाद शहर अन् औद्योगिक वसाहतीबद्दल यापूर्वी मी अनेक लेख लिहले,जे औरंगाबाद शहर सोबतीने त्याचा इतिहास अन् साधारण पाच दशकांपूर्वी काळानुरूप ऑटोमोबाईल क्षेत्रात औरंगाबाद शहराने धरलेलं बाळसं आता याच क्षेत्रात संपूर्ण जगतात ऑटोमोबाईल क्षेत्रातील एक महत्त्वाचं शहर म्हणून झालेली ओळख हा औरंगाबाद शहराचा चढता आलेख मी माझ्या लेखणीतून नेहमीच आपल्या समोर लिखित स्वरूपात उपलब्ध करून देत आलो आहे...

एकीकडे औरंगाबादमध्ये उज्ज्वल भविष्याचा विचार करून,नव्याने डीएमआयसी अंतर्गत निर्माण होणारे नवीन प्रकल्प,अलिकडेच पूर्णत्वास आलेली ऑरिक औद्योगिक वसाहत आणि शहराला जोडुन असलेल्या चिकलठाणा एमआयडीसी,शेंद्रा एमआयडीसी,वाळूज एमआयडीसी,चितेगाव परिसरात असलेली जुनी एमआयडीसी यांच्या माध्यमातून औरंगाबाद शहराला "ऑटोमोबाईल इंडस्ट्रीयल हब" सिटी ही मिळालेली नवी ओळख आहे...

औरंगाबाद शहरात उपलब्ध झालेला रोजगार आणि एकीकडे कोरोनाच्या काळात उद्योग विश्वात झालेला बदल,नवीन रुजु झालेल्या संकल्पना अन् पुन्हा एकदा आता औरंगाबाद शहराजवळील औद्योगिक वसाहती नव्यानं येणाऱ्या कंपन्यांचा चढता आलेख,कोरोनाच्या वाईट काळातील दिवसांना अनुभवत पुन्हा पुर्ववत औद्योगिक वसाहतींमध्ये चालु झालेला कारभार या सर्व गोष्टी औरंगाबाद शहर हे आशिया खंडातच नव्हे तर जगतात औद्योगिक क्षेत्रात किती उंचीवरील अन् महत्त्वपूर्ण शहर आहे हे दाखवून देत आहे...

औरंगाबाद हे ऐतिहासिक आणि औद्योगिक शहर म्हणून जगाच्या नकाशावर आधीपासून ओळखले जातेच,त्यामध्ये दिल्ली-मुबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरमुळे ऑरिकची नव्याने भर पडली आहे.त्यामुळे येथे उद्योग वाढीला एक मोठे व्यासपीठ उपलब्ध झालेले आहे अन् सोबतच अनेक नवीन कंपन्या,ग्रहनिर्माण प्रकल्प या ठिकाणी उभारल्या जात आहे जाणार आहे...

इंडस्ट्रीयल कॉरिडॉर आल्याने औरंगाबादचा औद्योगिक विकासाचा आलेख हा पुढील पंधरा वर्षात कायम वाढत राहणारा असेल.ऑरिकमध्ये येत्या काळात ३,३०,००० लोकांना रोजगार उपलब्ध होवू शकतो असा अंदाज प्राथमिक माहितीनुसार देता येतो,या सर्व बाबींचा एकत्रित परिणाम म्हणजे औद्योगिक उत्पादनाच्या बाबतीत शहर मोठी झेप घेऊ बघत आहे..!

नवीन निर्माण होणारा रोजगार लक्षात घेता आगामी काळात येथे मोठ्या प्रमाणावर रहिवासी प्रकल्पाची गरज भासणार आहे,अलिकडच्या काळात मोठ्या प्रमाणात निर्माण झालेले रहिवासी प्रकल्प 'रिअल इस्टेट'च्या जगतात सुगीचे दिवस आणु बघत आहे,शहराची वाढती आर्थिक उलाढाल बघता शहराच्या विकासासाठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या जात आहे.एकुण शहराचा विकास औद्योगिक क्षेत्राच्या आधारावर भरभराटीस येऊ बघत आहे...

सोबतच काही अंशी का होईना परंतु आता नव्याने काही नवीन प्रकल्प उभे राहण्यासाठी स्थानिक उद्योजक असो किंवा परदेशी उद्योग विश्वातून उद्योजक भारत देशात आपले प्रकल्प या ठिकाणी स्थायिक करण्याचा प्रयत्न करत आहे,औरंगाबाद शहरात आपले पावलं रोवू बघत आहे.दिवसेंदिवस आधुनिक टेक्नॉलॉजी मुळे होणारे बदल स्वीकारत शहरात एमआयडीसी मधील प्रकल्पा अंतर्गत औद्योगिकविश्वात होणाऱ्या घडामोडी हे सर्व बघण्यासारखे आहे...

एकीकडे शहरात इतक्या मोठ्या प्रमाणात ऑटो मोबाईल इंडस्ट्रीयल क्षेत्रात आपले मुळं रूजवून आहे तर सोबतच,फार्मा क्षेत्रात चालू असलेल्या घडामोडी बघता फार्मा क्षेत्रातील औरंगाबाद शहरालगत औद्योगिक वसाहतीत असलेल्या कंपन्या बघता आॅटोमोबाईल क्षेत्रानंतर सर्वाधिक कंपन्या असलेलं फार्मा क्षेत्र ठरत आहे.

आज मितीला या कंपन्यां माध्यमातुन खूप मोठ्या प्रमाणात रोजगार हा औरंगाबाद शहर अन् जवळपास असलेल्या गावातील नागरिकांना उपलब्ध झालेला आहे..!
औरंगाबाद शहरालगत असलेल्या औद्योगिक वसाहतीत अनेक जगप्रसिद्ध नामांकित कंपन्यांनी आपलं प्रोडक्शन हाऊस उभारले आहे,ज्या माध्यमातून सर्व विश्वात मेडीसिन पुरवण्याचे कार्य या कंपन्या करत आहेत.कोरोना ज्यावेळी मोठ्या प्रमाणात पसरलेला होता,त्यावेळी रात्रंदिवस या कंपन्यानी प्रोडक्शन चालू ठेवून आपली कामगिरी पूर्ण केली आहे अन् खूप मदत प्रशासनाला केली आहे .!

औरंगाबाद शहरालगत असलेल्या पाच औद्योगिक वसाहतीत आज घडीला अनेक देश विदेशी फार्मा कंपन्यांनी आपले पाय रोवले आहे.यातील काही कंपन्यानी जवळ जवळ दोन दशकांपूर्वी येथील औद्योगिक वसाहतीत आपले प्रोडक्शन हाऊस चालू केले आहे..!
यात खालील फार्मा कंपन्या मोठ्या प्रमाणात रोजगार उपलबध करून देत आहेत..!
1) Wockhardt Pharma,Wockhardt Research Center.
2) Lupin Limited.
3)Maylan Laboratories. 
4)Glenmark Pharma.
5)Harman Finochem Limited.
6)Ajanta Pharma.
7)Sun Pharma Limited.
8)ATRA Pharmaceutical Company.
9)Midas Care Pharmaceutical.
अश्या अन् अनेक छोट्या मोठ्या कंपन्या या ठिकाणी कार्यरत आहेत...

औरंगाबादसह मराठवाड्यासाठी भूषण असलेल्या दिल्ली मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉरच्या (डीएमआयसी) औरंगाबाद इंडस्ट्रिअल सिटी (ऑरिक) शेंद्रा टप्प्यात साधारण जानेवारी २०२१ मध्ये आणखी पाच नवीन कंपन्यांची भर पडली आहे.या कंपन्यांना भूखंडांचे वितरण नुकतेच करण्यात आली.या कंपन्यांमधून १६० कोटींची गुंतवणूक झाली असून जवळजवळ २५० जणांना रोजगार मिळणार आहे. 

दरम्यान,Covid-19 परिस्थितीनंतर प्रथमच 'ऑरिक' व्यवस्थापनाकडे मागणी केलेल्या उद्योगांपैकी पाच उद्योगांना प्लॉट हस्तांतरित करण्यात आले.यामध्ये सिंदिया फार्मा यासह औषधनिर्मितीतील आणखी एक कंपनी,लिक्विड ऑक्सिजनसह ऑक्सिजन प्रॉडक्टस् तयार करणारी आयनॉक्स एअर प्रॉडक्टस प्रायव्हेट लिमिटेड,फूड प्रोसेसिंगमधील एक आणि सॅनिटरी नॅपकिन बनविणाऱ्या एका उद्योगाचा समावेश आहे..!

त्यामुळे फार्मा विश्वातसुद्धा औरंगाबाद शहर आपले स्थान निर्माण करत आहे..!

Written by,
Bharat Sonwane.
MBA - Production & Operations Management.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य...

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस...