मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

नोव्हेंबर, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कॉपी

बालपणी एकदा सरांनी खुप बदडले, जेव्हा परिक्षेत करत होतो मी कॉपी... मग केविलवाणा चेहरा करून मीच मागत होतो सरांची माफी...१ जगताना कधी नाही करता आली कॉपी...! बालपणीच जगण्याच्या शर्यतीत माझा झाला होता पराभव म्हणून की काय आता,मलाच करायची होती माझा जीवनाची कॉपी...२ घडवायच होते मलाच माझा आयुष्याला कारण इथं नव्हती करता येणार मला कुटली कॉपी,किवा नव्हती भेटणार कुटल्या चुकीची माफी...३ बालपणीचा आई वडिलांच्या संस्कराची करायची वेळ आली होती आता कॉपी, कारण या गरिबाला या समाजातील चुकीचा वागणुकीचा लोकांकडून नव्हती भेटणार कधीच माफी....४ जगताना कधी नाही करता आली कॉपी...! तिरडी वर जेव्हा माझा येतील लोक रडाया,करतील माझाच छान छान गोष्टींची माझा जवळ कॉपी, घेता अंतिम निरोप मी जगाचा चुकलो मी भूतकाळात कधी तर मागेल पुन्हा एकदा शेवटची मी माफी.... जगताना कधी नाही करता आली कॉपी...!५ लिखित: भरत सोनवणे (सौमित्र) भारतातील शिक्षण व्यवस्थेवर आधारित आणि *दयासागर वानखेडे* दिग्दर्शित *कॉपी* हा चित्रपट ०८ नोव्हेंबर २०१९ रोजी प्रदर्शित होतोय. त्यानिमित्त राज्यस्तरीय काव्य स्पर्धेचे आयोजन केलेले होते त्यासाठी कॉपी य

ती एक अनोळखी लायब्ररीतील पुस्तकीवेडी अन् मी एक शहर हिंडणारा...

या वेळेला कधी कधी मी शहरात फिरायला निघतो  पायी,या मुळे होते काय की आपल्या पासून दुरावलेल्या,त्या खुप दिवसांपासून अनोळखी असलेल्या शहराची आपल्याला नव्यानं ओळख होते. ती कॉलनी,तो चौक,तो नाका,ते दिवस तरुण- तरुणींनी गजबजलेलं कॉलेज रात्री मात्र शांत अन् विरहाच्या वाटा भेट देणार भासते. ते मंदिर,ते मस्जिद कुणाचा गरिबांचा सहारा होत असते, कुण्या गल्लीने तो गुराखी त्याचं काम करतोय. मी मात्र भटकतोय एकटा एकटा न्याहाळत त्या अनोख्या अन् रौद्र रुप धारण केलेल्या शहराला.तो स्मशान तर काळजात धडकी भरवत आहे, मोडकळीस आलेला त्याचा ही एक जीव येतोय अन् एक जातोय,पण तो ही अजून उभा आहे अनेकांच्या शेवटच्या क्षणाला साक्षीदार होण्यासाठी. ते बसस्टँड मात्र निपचित पडलय  कधीच एक दोन तासाला एखादी परी भेटायला येत आहे, मग अनेकांच्या झोपा खुश करून जात आहे,अनेकांच्या डोळ्यात अश्रू आणत आहे. सर्व शहर फिरतोय,मग नेहमीच्या त्या सोसायटी जवळ मी आलो जिथं आज पण काही वेगळे नव्हते.वाचमन झोपलाय खुर्ची वर कधीचाच त्यालाही थंडी वाजत असावी,पण जगणे अन् कर्तव्याची विण कुणाला चुकणार,हातपाय पार थरथर करताय तरी तो पार पाडतो आहे कर्तव्य त्याचे. आ

अस्तित्व हरवलेला एक मी

सूर्य अस्ताला जातो आपोआप पाऊले शहराच्या उत्तरेस असलेल्या त्या एकाकी अन् शांत असलेल्या बोडख्या टेकडीकडे वळतात. सोबत नसते कुणी त्या मार्गाला या वेळी भटकणारेही कुणी नसते,जे असतात ते परतत असतात आपल्या आठवणींना त्या टेकडी शी शेअर करून. हल्ली माझी ही वेळच झालिये म्हणजे दिवसभर जरी मी मोकळा असलो तरी मला या वेळेलाच त्या टेकडीवर जायला खूप आवडायला लागले आहे. मग पाऊले मार्गाला लागता एक-एक पाऊल पडत राहते,शहर मागे जात राहते टेकडी जवळ येत राहते. ती जस जशी जवळ येते तस तशी आठवण तीव्र होत जाते,अंधार पडायला लागतो लाईटही चमकायला लागतात अन् या अंधारात मी मार्ग शोधत असतो टेकडीच्या त्या स्थळी जाऊन बसायचा.ज्या ठिकाणी अशा वेळी शहरातले तरी नक्की कुणी येणार नाही,कारण काय फक्त एकच मला एकांत हवा आहे.जो तिथं भेटत असतो मला फक्त एकच विचार करायचा असतो तो फक्त तो अन् तो.पाऊले चढत असता टेकडीची ती अरुंद पाऊलवाट,हिंस्त्र प्राण्यांचे पक्षांचे ते आवाज काळजाची धढ धड वाढवत असतेच.मधीच समोर एखादं प्रेत येऊन पडावं तसे झाडाची फांदी झपकन खाली पडते,तिच्या खाली मी कधी येतो तर माझा मेंदूच उघडा पडता,जसा तो तुझा विचारांनी बाकी विचारा

मक्का सोंगायले जात असा आम्ही पण....

सकाळ सकाळच्याला आवरून आम्ही निघालो हुतो मक्का सोंगायले.आता मक्का सोंगायचे खुप कामे आले आहेत,मग काय आमच्या शेजारच्या मावश्या अन् माझी माय मक्का सोंगायले उक्त घेऊन राहिल्या. चार पैक भी भेट्ट्या अन् जनावराले मक्काचे चारा पण भेटायला. काल सा नच्याला माय म्हणली होती की उदयाला शाळेला सुट्टी मार,मजासोबत मक्का सोंगाया ये. मला नव्हत जायचे पण माझे मित्र पण यायले बोली ती हण्या अन् अर्सुळ्या मग काय मी पण जाणार आहे. काल रातच्यालाच आजचा अभ्यास मी अन् माझा मित्रांनी करून ठेवला,आता काय आज दिवसभर तो मक्काच चारा मडयावर वाहायचा हुता. खुप आंग दुखणार हुत आज अन् आंगाले खाज पण येणार होती, एक तर मले नाही सहन होत हे काम पण माझी माय बोली जायलाच लागलं. रस्त्यानं जातांना आम्ही काय शिदि नाय चालत कुत्र्याला दगड मारलं,पारावर लोकानले बळजबरी रामराम करेल,म्हाताऱ्या बाईला हटकून   आवाज देऊन लपून बसल. रोडणा मक्काच्या ताटचे लंबी काडी रोडला घासाडत गाडी गाडी खेळत जाणार, रस्त्यानं बोरं आलिया बोरीला ती खिसा भरून पण्या मधी भरून घेऊन जायचे आहे, मक्का सोंगत असताना खायाले मस्त आंबट गोड हमम.संच्याला येताना वाळुन गेलेली बोरं आम्ही घ

Message details

कधी कधी काय होते कुणास ठाऊक क्षणार्धात होत्याचे नव्हते होऊन बसते,मग होकरांचे रूपांतर नाकारत होऊनच बसते. चीड चीड होते, सहवासाचे अन् श्वसनाचे गणितं चुकता अन् मन एकाकी होऊन बस तासनतास एकच विचार करू लागते. जणू ते ध्यासालाच लागते की नाही आता हे मला मिळवायचे आहे यासाठी मग माझी वाट मला बदलायला लागली तरी चालेल,माझे आयुष  यासाठी झोकून द्यायलाही मी तयार होऊन जातो. मग नसतोच कुठला स्वार्थ या साठी किंवा नसते कुठली आर्थिक अपेक्षा.बस खुप खुप लिहायचं आहे त्या विषयावर कारण,आज जे प्रश्न मला पडलेय ज्याचे अपेक्षित उत्तर मी खुप शोधूनही मला भेटले नाहीत. त्या प्रश्नांना मलाच उत्तर शोधायची गरज आहे कारण उद्या ही प्रश्न उद्या कुणाला पडले,कुणाला असा अनुभव आला तर तो नको मझासारखा हरवून जायला. या आभासी पण ओळखीच्या हक्काच्या माणसांच्या विश्वात जिथे कधी कधी एकांत हा मनावर राज्य करायला लागतो,व्यक्त होणारी भिंत ओसाड पडते अन् शेवाळ साचून ती ती कधी घसर्डी होऊन धोक्याची होते.का होते असे समजत नाही म्हणून लिहायचं आहे तिच्यासाठी,ती या आंतरजालातील एक असा भाग आहे तिचा ऑनलाईन सहवास  काही मर्यादित वेळे साठी जरी लाभला,तिच्यासाठी

Great भेट....

नेहमी प्रमाणे आज सायंकाळी कॉलेजची INTERNAL EXAM देऊन मी घरी येत होतो. मला माझ्या काही मित्रांना वेरूळ येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या काळात काम झालेल्या त्या स्नानगृहाचे(कुंड) फोटो अन माहिती पाठवायची होती. त्यासाठी मी तेथे भेट देण्यास गेलो या कुंडा बद्दल तशी फारशी माहिती माझाकडे आहे. कारण माझा जन्मच या भूमीत झालाय, तर मी तेथे भेट देण्यास गेलो असता मला काही रशियन पर्यटक दिसलीत.ते काहीसे विचारणा करतांना मी बघितले पण भाषेचा probelm असल्या मुळे ते कुणाला फारसे कळत नव्हते. मी बगितले अन थोडेफार मला समजले त्यांना गाईड हवा होता येथील माहिती मिळवण्यासाठी. पण ते इथ शक्य नव्हते कारण इथे गाईड नसतात,मग काय मला जी काही माहिती होती मी त्यांना सांगितली. मला काही पूर्णपणे इंग्लिश बोलायला जमत नाही पण बऱ्यापैकी जमते अन् माझे बोलणेही त्यांना समजत होते. या मुळे ते खुश झालेत यात मी वेगळे काही केले नव्हते,पण जर अतिथी देवो भव ही शिकवण आपल्याला लहानपणा पासुन दिली जाते ती आपण जपावी,अन् ती मी जपत होतो. कारण त्यांनी बोलून दाखवले की ही माहिती त्यांच्यासाठी खूप मोलाची महत्त्वाची ठरते.अन् त्यांनी न चुकता

सिग्नल लाईफ....

माझ्यातला माणूस जेव्हा हरवतो विचारांच्या त्या खोल दरीत मग मी येऊन जातो त्याला शोधायला माणसांच्या गर्दीत. नेहमी प्रमाणे आजची सकाळ झाली,परीक्षा चालु असल्यामुळे सकाळी लवकरच कॉलेजला निघालो. तसा वेळ खूप बाकी होता पण मला या माणसांच्या गर्दीत रमायला खूप आवडत. मग काय सकाळी जरा लवकरच निघालो होतो,मी तालुक्याच्या गावाचा असल्या मुळे इथ फारसं येणं होत नाही. पण आज लवकर आल्या मुळे या सिग्नलला थांबलो न्याहाळत तिथल्या गर्दीला.सकाळीच कंपनीत जाणारे माणसं,कुणी रात्रपाळी करून कंपनीतून वापस येणारे,शेजारीच असेलल्या हॉस्पिटल मध्ये जाणारे सर्व डॉक्टर, परिचारिका यांना मी बगत होतो. बाजूला चालू असलेल्या चहाच्या टपरीवर चालू असलेले वेगवेगळे संवाद ही ऐकत होतो. पंक्चर कडणाऱ्या माणसाची ती छोट्याश्या रिक्षात थाटलेली त्याची दुकान. ये जा करणाऱ्या रिक्षा,जवळच विमानतळ असल्या मुळे तेथून आकाशात उडणाऱ्या विमानाचा आवाज शहर जिवंत असल्याचा अनुभव देत होते. अन् एकदमच मला माझ्या दोन वर्षापूर्वीच्या दिवसांची आठवण आली,कारण हा सिग्नल त्या वेळी माझ्या आयुष्यातला महत्त्वाचा एक भाग होता. हा विचार करत असतानाच मोठ्याने आवाज करत एक Ambulan

आयुष्यातील अशी ही एक अनोखी वेळ....

 #एक्झिट_इंटरव्ह्य़ू कॉन्फरन्स रूममध्ये, एचआर विभागामधली सर्वात अनुभवी ‘ती’ आणि कंपनीत आपल्या तंत्रज्ञानाच्या ज्ञानामुळे दबदबा असलेला ‘मी’ ‘एक्झिट इंटरव्ह्य़ू’साठी, म्हणजे राजीनामा देऊन कंपनीतून बाहेर पडण्यापूर्वी घेतल्या जाणाऱ्या मुलाखतीसाठी समोरासमोर बसलो होतो. विषयाला थेट हात घालत ती म्हणाली, ‘‘कंपनीतल्या उत्तम ‘परफॉमन्स’ असणाऱ्या लोकांपैकी तू एक आहेस; पण शेवटी निर्णय तुझा आहे.. मात्र ‘तडजोडी’ची काहीही जरी शक्यता असली तर तुला दुसऱ्या कंपनीने दिलेली ‘ऑफर’ सांग. आम्ही ती ‘ऑफर’ आमच्याकडून देऊच.. पण त्याचबरोबर नवीन ऑफरच्या वीस टक्के रक्कम तुला ‘स्पेशल बोनस’ म्हणूनही देऊ.’’ त्यावर दीर्घ श्वास घेत मी म्हणालाे, अगोदरच सांगितलंय की, माझ्याकडे दुसरी कोणतीही ऑफर नाही. ‘नोकरी सोडणं’ इतकाच माझा उद्देश आहे. त्यामुळेच आपला ‘नोटीस पीरियड’ही मी कोणतंही कारण न देता पूर्ण केला. शिवाय माझी कंपनी किंवा कंपनीतल्या माणसांबद्दलही काही तक्रार नाही.’’ पण ती मागे हटणार नव्हती. आपली पुढची ‘ऑफर’ माझ्यासमोर ठेवत  म्हणाली, ‘‘तू अजून महिनाभर थांब. एक नवीन ‘प्रोजेक्ट’ येतोय. त्यासाठी वर्षभर तुला ‘ऑनसाइट’ल

Save letter and save writing...

काळाच्या ओघात नष्ट होत चालली पत्र पाठविण्याची परंपरा आपण जपवुया.... #पत्रासकारणकीमाणसाच्या या जगरहाटीत मी कुठेतरी धुळीस मिळालो आहे तेव्हा मला वाचविण्यासाठी माझाच एक प्रयत्न तुमच्यासाठी पत्र लिखाणाचा #मीएकपत्रधुळीतपडलेलं.....#भारत,(सौमित्र).

आठवणींना उजाळा बाजारातल्या

नेहमीप्रमाणे मी अन् आई सायंकाळी भाजीमंडी मध्ये भाजीपाला आणायला गेलो. भाजीपाला आणायला आई सोबत जायचं म्हंटल की मला खूपच जीवावर येतं . कारण आई ४-५ भाज्या घ्यायला कमीत कमी एक तास तरी लावते. म्हणजे भाव वगैरे करत नाही पण व्यवस्थित नीटनेटक सगळं कसं. पण हल्लीना मला आई बरोबर भाजीपाला घ्यायला जाण्यास आवडायला लागलं होते. म्हणजे आई मंडीत गेली की मी तिथंच गाडी लाऊन आजूबाजूच्या लोकांना न्याहाळत बसायचो. कोण कसा बोलतो?कोण काय करतो? कोणाचं कुठे लक्ष आहे?मज्जा यायची यात तर नेहमी प्रमाणे आई गेली मी गाडी लाऊन निरीक्षण करत बसलो होतो.आपण म्हणतो जागतिक मंदी चालू आहे पण इथ असं काही दिसत नव्हते.रोजच्या जीवनातील लागणाऱ्या वस्तू घेणं समजु शकतो पण लोकांची चैन काही कमी झाली नव्हती. म्हणजे ते देशी दुकानातून दारू पिउन येणारे तरुण,म्हातारी माणसे मस्त कुठलही टेन्शन नसलेली भासत होती. मस्त एक एक शेंगदाणा खात खात गेट बाहेर आले की बाजूला पचकन थुंकत चहूकडे बगत चालत होते,जस की काय आम्ही खुप मोठं कार्य करून आलो. बाजूलाच एक वाइन शॉप पण होत जिथं जरा हाय प्रोफाईल लोकं भारी मधली दारू घेऊन पार्सल कागदात पॅक करून ते पण निघायचे. ब