सूर्य अस्ताला जातो आपोआप पाऊले शहराच्या उत्तरेस असलेल्या त्या एकाकी अन् शांत असलेल्या बोडख्या टेकडीकडे वळतात. सोबत नसते कुणी त्या मार्गाला या वेळी भटकणारेही कुणी नसते,जे असतात ते परतत असतात आपल्या आठवणींना त्या टेकडी शी शेअर करून. हल्ली माझी ही वेळच झालिये म्हणजे दिवसभर जरी मी मोकळा असलो तरी मला या वेळेलाच त्या टेकडीवर जायला खूप आवडायला लागले आहे. मग पाऊले मार्गाला लागता एक-एक पाऊल पडत राहते,शहर मागे जात राहते टेकडी जवळ येत राहते. ती जस जशी जवळ येते तस तशी आठवण तीव्र होत जाते,अंधार पडायला लागतो लाईटही चमकायला लागतात अन् या अंधारात मी मार्ग शोधत असतो टेकडीच्या त्या स्थळी जाऊन बसायचा.ज्या ठिकाणी अशा वेळी शहरातले तरी नक्की कुणी येणार नाही,कारण काय फक्त एकच मला एकांत हवा आहे.जो तिथं भेटत असतो मला फक्त एकच विचार करायचा असतो तो फक्त तो अन् तो.पाऊले चढत असता टेकडीची ती अरुंद पाऊलवाट,हिंस्त्र प्राण्यांचे पक्षांचे ते आवाज काळजाची धढ धड वाढवत असतेच.मधीच समोर एखादं प्रेत येऊन पडावं तसे झाडाची फांदी झपकन खाली पडते,तिच्या खाली मी कधी येतो तर माझा मेंदूच उघडा पडता,जसा तो तुझा विचारांनी बाकी विचारा साठी कायमचा उघडा पडला आहे.मग येते ती कपार तो दगड जिथं मी बसतो पाय लाऊन त्या माझा हक्काच्या दगडाला जो फक्त माझंच ऐकणार आहे या क्षणाला तरी. मग न्याहाळत बसतो कितीवेळ त्या विस्तीर्ण शहराला सोबत तुझा माझा प्रत्येक आठवणीतल्या क्षणाला. क्षण येतात मला सोडून जातात आयुष्य सरकत राहत पुढे पुढे मृत्यू ही येत राहतो जवळ जवळ. तशी आठवण अजून तीव्र होत जाते पण ती नाही जात सोडून मला या वेळी सारखी काळा सारखे.हल्लीना थंडीचा पारा वाढलाय ती त्या कपारीच्या आडोशाला असल्यावर जास्तीची जाणवत नाही,पण तरीही ती मला बिलगुन असते घट्ट अगदी माझा जर्किंग मध्ये घुसून माझा मिठीत ती विसावलेली असते.वाऱ्याची येणारी ती अलवार झुळूक अन् या झुळके बरोबर उडणारे माझे केस जे हल्ली मला फारसे विचित्र वाटायला लागले आहे, म्हणजे त्यांनी पण त्या हवेचेच ऐकायचे ठरवले की काय असे होऊन गेलय. काही काही असो पण हा निसर्ग नाहीये फितूर माझाशी म्हणजे कसं तो अजूनही माझ्यासोबतच आहे, त्याच्या सानिध्यात छान वाटते.मग काय आता या अंधारात ही कुणाचा मुड होईल का पण आमचे वेडे मन जे तुझे कधी झाले नाही ते आमचे कसले होतेय,त्याला फोटो काढायचे सुचते मग काय अंधाराच्या साक्षीने अन् आठवणींच्या सोबतीने एक फोटो काढला जातो माझा,बळजबरी चेहऱ्यावर हसरे भाव आणत. आता माझा सोबती कुणी जरी असते,केव्हा जो कुणी मला दुरून न्याहाळत आहे तो नक्कीच मला सायको म्हणत असेल.असे काही नाही हो अगदीच पण तुझा विचाराला मात्र मी सायको केले आहे.का ? तर ते खुप विचार करता हल्ली तुझा,मी नाही बर का ते विचार. मग मी माझाच पाठमोऱ्या आकृतीकडे बघत बसतो कितीवेळ, त्या कुत्र्यांना सुध्दा बघत असतो जे केव्हापासन माझा मोबाईल फ्लॅशकडे बघुन वर तोंड करून उंच आवाजात भुंकत आहे. तो लांडगा ही मी बगतो आहे तो जरी दिसत नाहीये पण त्याचे डोळे मात्र चमकतात दुरूनच. कुठेतरी दूरवर वीटभट्टीचा तो धूर आकाशात पसरला आहे जणू कुणाचे मडे त्या स्मशानात जाळले जात आहे, ती धूर भर उंच आकाशात सर्वदूर पसरली आहे. मग मी पुन्हा आल्या मार्गाला वापीस निघतो, मग भीती वाटायला लागते इतक्या वेळ ज्या जागी वर बसलो होतो तिला मागे वळुन बघायची सुद्धा. तुझी आठवण तशी ओसरत जाते घराची ओढ लागते मग ती मला भानावर आणते. पुन्हा एकदा माणसात मला शोधण्यासाठी,माझा हरवलेल्या अस्तित्वाला शोधण्यासाठी. मग मी शोधत राहतो मार्गाला अनेक व्यक्ती येता न्याहाळत राहतो तुला अस्तित्वाला पण भेट तुझी होत नाही अन् त्याची सुध्दा नाही.रस्त्याने लागलेल्या लाईटा खाली मग मी माझा सावलीत शोधत राहतो चालत राहतो दोघेही,शुजचा रस्त्याला घसण्याचा आवाजही मग मला स्पष्ट ऐकू येतो.टेकडीवर पाय तिरपा पडून मुरगळला आहे, हे ही मग मला कळू लागते.मग लंगडत लंगडत घराच्या रस्ता मी शोधायला लागतो,तो जर मी कधी विसरून गेलो कायमचा कधी तर मग.आता मात्र तुझा आठवणी तुझं अस्तित्व मला नकोस वाटायला लागते मला फक्त रस्ता हवा असतो घराकडचा जो मला माझे अस्तित्व पून्हा एकदा मिळवून देत असतो......
#अस्तित्वाच्याशोधातअस्तालाजाणारामी ......
लिखित: भारत लक्ष्मण सोनवणे(सौमित्र),कन्नड, औरंगाबाद.
#अस्तित्वाच्याशोधातअस्तालाजाणारामी ......
लिखित: भारत लक्ष्मण सोनवणे(सौमित्र),कन्नड, औरंगाबाद.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा