मुख्य सामग्रीवर वगळा

मक्का सोंगायले जात असा आम्ही पण....

सकाळ सकाळच्याला आवरून आम्ही निघालो हुतो मक्का सोंगायले.आता मक्का सोंगायचे खुप कामे आले आहेत,मग काय आमच्या शेजारच्या मावश्या अन् माझी माय मक्का सोंगायले उक्त घेऊन राहिल्या. चार पैक भी भेट्ट्या अन् जनावराले मक्काचे चारा पण भेटायला. काल सा नच्याला माय म्हणली होती की उदयाला शाळेला सुट्टी मार,मजासोबत मक्का सोंगाया ये. मला नव्हत जायचे पण माझे मित्र पण यायले बोली ती हण्या अन् अर्सुळ्या मग काय मी पण जाणार आहे. काल रातच्यालाच आजचा अभ्यास मी अन् माझा मित्रांनी करून ठेवला,आता काय आज दिवसभर तो मक्काच चारा मडयावर वाहायचा हुता. खुप आंग दुखणार हुत आज अन् आंगाले खाज पण येणार होती, एक तर मले नाही सहन होत हे काम पण माझी माय बोली जायलाच लागलं. रस्त्यानं जातांना आम्ही काय शिदि नाय चालत कुत्र्याला दगड मारलं,पारावर लोकानले बळजबरी रामराम करेल,म्हाताऱ्या बाईला हटकून   आवाज देऊन लपून बसल. रोडणा मक्काच्या ताटचे लंबी काडी रोडला घासाडत गाडी गाडी खेळत जाणार, रस्त्यानं बोरं आलिया बोरीला ती खिसा भरून पण्या मधी भरून घेऊन जायचे आहे, मक्का सोंगत असताना खायाले मस्त आंबट गोड हमम.संच्याला येताना वाळुन गेलेली बोरं आम्ही घरी घेऊन जाणार आहे भिजून खायले शाळेतल्या गुरुजी ला अन् बाईला देणारे खुप बोरं, मग ते आम्हाला मारणार नाहीत. दुपारच्या न्याहारीला मायना जाड बेसन भाकर अन् लोणचे ठेचा आणलाय,अर्सुळ्याच्या मायना शेंगदाण्याचे पाणी आणलं अन् सोबत भाकर, हण्याले त्याच्या मायने बोंबलाची खुडी आणली आहे, त्यो बसलाय झाडाच्या खोडावर जावून खायला, हात पर अंगार मारू लागले आहेत जेवताना सारा चारा हाताला घासून हात बोट चिरलिये, पार अंगार होयली आहे.आमच्या बकरीला खुप चारा आहे इथ संच्यला जाता वखत एक ओझं चारा मला अन् माझा मायला घेऊन जायचा आहे.बकरीला दोन पिल्ले झालीय एक पाट अन् एक बक्रू खुप भारी आहे दोगपन. सकाळच्याला थंडी खुप पडयली बकऱ्या पार कुड कुड करत असा, चला घरच्याला जायचा सांज झालीय ये अर्सुळ्या,हण्या चाला की बिगी बीगी देवळात आरती करायला जाऊ,आज मी ऐकल आहेता की त्यो देव नवसाला पावल अन् आपली गरिबी दूर जायले.लोक आमच्या कडे काहून बगायले समजेना,एक म्हातार हसायला पण यडा असायला कारे अर्सुळ्या त्त्यो बाबा. ये हन्म्या मायव मावशे चालकी बिगी बीगी.....
#मक्कासोंगायलेजातअसाआम्हीपण....
लेखन:भारत सोनवणे (सौमित्र).

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...