मुख्य सामग्रीवर वगळा

Great भेट....

नेहमी प्रमाणे आज सायंकाळी कॉलेजची INTERNAL EXAM देऊन मी घरी येत होतो. मला माझ्या काही मित्रांना वेरूळ येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या काळात काम झालेल्या त्या स्नानगृहाचे(कुंड) फोटो अन माहिती पाठवायची होती. त्यासाठी मी तेथे भेट देण्यास गेलो या कुंडा बद्दल तशी फारशी माहिती माझाकडे आहे. कारण माझा जन्मच या भूमीत झालाय, तर मी तेथे भेट देण्यास गेलो असता मला काही रशियन पर्यटक दिसलीत.ते काहीसे विचारणा करतांना मी बघितले पण भाषेचा probelm असल्या मुळे ते कुणाला फारसे कळत नव्हते. मी बगितले अन थोडेफार मला समजले त्यांना गाईड हवा होता येथील माहिती मिळवण्यासाठी. पण ते इथ शक्य नव्हते कारण इथे गाईड नसतात,मग काय मला जी काही माहिती होती मी त्यांना सांगितली. मला काही पूर्णपणे इंग्लिश बोलायला जमत नाही पण बऱ्यापैकी जमते अन् माझे बोलणेही त्यांना समजत होते. या मुळे ते खुश झालेत यात मी वेगळे काही केले नव्हते,पण जर अतिथी देवो भव ही शिकवण आपल्याला लहानपणा पासुन दिली जाते ती आपण जपावी,अन् ती मी जपत होतो. कारण त्यांनी बोलून दाखवले की ही माहिती त्यांच्यासाठी खूप मोलाची महत्त्वाची ठरते.अन् त्यांनी न चुकता हे ही सांगितले की तुम्ही लकी आहात की या इथिहासिक वास्तू असलेल्या ठिकाणी तुम्ही आहात.माझासाठी हे खुप मोलाचे ठरते त्यानंतर मी त्यांना वेरूळ लेणी,अजिंठा लेणी अन्  पितळखोरा लेणी या बद्द्दल ही माहिती दिली. महत्त्वाचे म्हणजे त्यांनी अजिंठा लेणी अन् वेरूळ लेणी यावर खूप अभ्यास ही केला आहे,त्यांना पितळखोरा लेणी ही नवीन होती आता वेळी अभावी तिला ते भेट देऊ शकत नव्हते. पण त्यांनी पुन्हा भारतात आल्यावर नक्कीच मला भेटून त्या लेनीची भेट घेण्याचे promissd ही मला केले. सांगायचे इतकेच की आपल्या देशात भेट देण्यास येणाऱ्या पर्यटकांना आपण शक्य तितकी मदत करावी,माहिती द्यावी. कारण त्यांना आवडते आपली संस्कृती आपला इतिहास, स्थापत्य कला,शिल्पकाम,चित्रकाम अन् विवध कला. तेव्हा आपण हा भव्य ठेवा जपवुया अन् त्या बद्दलची माहिती सर्वदूर जगभरात देऊया आजची झालेली ही एक भेट अविस्मरणीय असेल माझासाठी थँक्यु सर अन् मॅम नक्कीच पुन्हा एकदा भेटू...

Today in Ellora, a leading scientist from the Russian Archeology Department met with Vasya

Aleksandriuk...

@vasya Aleksandriuk

#incredibleindia....

#अतुल्यभारत....

शब्दांकन:भारत सोनवणे (सौमित्र),(औंरगाबाद).

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...