बालपणी एकदा सरांनी खुप बदडले,
जेव्हा परिक्षेत करत होतो मी कॉपी...
मग केविलवाणा चेहरा करून मीच मागत होतो सरांची माफी...१
जगताना कधी नाही करता आली कॉपी...!
बालपणीच जगण्याच्या शर्यतीत माझा झाला होता पराभव म्हणून की काय आता,मलाच करायची होती माझा जीवनाची कॉपी...२
घडवायच होते मलाच माझा आयुष्याला कारण इथं नव्हती करता येणार मला कुटली कॉपी,किवा नव्हती भेटणार कुटल्या चुकीची माफी...३
बालपणीचा आई वडिलांच्या संस्कराची करायची वेळ आली होती आता कॉपी, कारण या गरिबाला या समाजातील चुकीचा वागणुकीचा लोकांकडून नव्हती भेटणार कधीच माफी....४
जगताना कधी नाही करता आली कॉपी...!
तिरडी वर जेव्हा माझा येतील लोक रडाया,करतील माझाच छान छान गोष्टींची माझा जवळ कॉपी,
घेता अंतिम निरोप मी जगाचा चुकलो मी भूतकाळात कधी तर मागेल पुन्हा एकदा शेवटची मी माफी....
जगताना कधी नाही करता आली कॉपी...!५
लिखित: भरत सोनवणे (सौमित्र)
भारतातील शिक्षण व्यवस्थेवर आधारित आणि *दयासागर वानखेडे* दिग्दर्शित *कॉपी* हा चित्रपट ०८ नोव्हेंबर २०१९ रोजी प्रदर्शित होतोय. त्यानिमित्त राज्यस्तरीय काव्य स्पर्धेचे आयोजन केलेले होते त्यासाठी कॉपी या विषयावर केलेली ही माझी कविता...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा