कधी कधी काय होते कुणास ठाऊक क्षणार्धात होत्याचे नव्हते होऊन बसते,मग होकरांचे रूपांतर नाकारत होऊनच बसते. चीड चीड होते, सहवासाचे अन् श्वसनाचे गणितं चुकता अन् मन एकाकी होऊन बस तासनतास एकच विचार करू लागते. जणू ते ध्यासालाच लागते की नाही आता हे मला मिळवायचे आहे यासाठी मग माझी वाट मला बदलायला लागली तरी चालेल,माझे आयुष यासाठी झोकून द्यायलाही मी तयार होऊन जातो. मग नसतोच कुठला स्वार्थ या साठी किंवा नसते कुठली आर्थिक अपेक्षा.बस खुप खुप लिहायचं आहे त्या विषयावर कारण,आज जे प्रश्न मला पडलेय ज्याचे अपेक्षित उत्तर मी खुप शोधूनही मला भेटले नाहीत. त्या प्रश्नांना मलाच उत्तर शोधायची गरज आहे कारण उद्या ही प्रश्न उद्या कुणाला पडले,कुणाला असा अनुभव आला तर तो नको मझासारखा हरवून जायला. या आभासी पण ओळखीच्या हक्काच्या माणसांच्या विश्वात जिथे कधी कधी एकांत हा मनावर राज्य करायला लागतो,व्यक्त होणारी भिंत ओसाड पडते अन् शेवाळ साचून ती ती कधी घसर्डी होऊन धोक्याची होते.का होते असे समजत नाही म्हणून लिहायचं आहे तिच्यासाठी,ती या आंतरजालातील एक असा भाग आहे तिचा ऑनलाईन सहवास काही मर्यादित वेळे साठी जरी लाभला,तिच्यासाठी मनात अनेक प्रश्न येऊन जातात. अन् मग हे जग इतकं कठोर कसे होऊन जाते की इथही तिनं आपल्याला भेटाव,मग तोच विचार अन् वेड्या मनाला एक निमित्त ऑनलाईन विश्वात एक आलेला तो संदेश जो विचारांच्या दिशा बदलून टाकतो.....
#ऑनलाईनसंदेशविचारकाहीतरीकरण्याचीवृत्ती.
लिखाण: भारत सोनवणे (सौमित्र).
मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख. खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे... तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा