माझ्यातला माणूस जेव्हा हरवतो विचारांच्या त्या खोल दरीत मग मी येऊन जातो त्याला शोधायला माणसांच्या गर्दीत. नेहमी प्रमाणे आजची सकाळ झाली,परीक्षा चालु असल्यामुळे सकाळी लवकरच कॉलेजला निघालो. तसा वेळ खूप बाकी होता पण मला या माणसांच्या गर्दीत रमायला खूप आवडत. मग काय सकाळी जरा लवकरच निघालो होतो,मी तालुक्याच्या गावाचा असल्या मुळे इथ फारसं येणं होत नाही. पण आज लवकर आल्या मुळे या सिग्नलला थांबलो न्याहाळत तिथल्या गर्दीला.सकाळीच कंपनीत जाणारे माणसं,कुणी रात्रपाळी करून कंपनीतून वापस येणारे,शेजारीच असेलल्या हॉस्पिटल मध्ये जाणारे सर्व डॉक्टर, परिचारिका यांना मी बगत होतो. बाजूला चालू असलेल्या चहाच्या टपरीवर चालू असलेले वेगवेगळे संवाद ही ऐकत होतो. पंक्चर कडणाऱ्या माणसाची ती छोट्याश्या रिक्षात थाटलेली त्याची दुकान. ये जा करणाऱ्या रिक्षा,जवळच विमानतळ असल्या मुळे तेथून आकाशात उडणाऱ्या विमानाचा आवाज शहर जिवंत असल्याचा अनुभव देत होते. अन् एकदमच मला माझ्या दोन वर्षापूर्वीच्या दिवसांची आठवण आली,कारण हा सिग्नल त्या वेळी माझ्या आयुष्यातला महत्त्वाचा एक भाग होता. हा विचार करत असतानाच मोठ्याने आवाज करत एक Ambulance आली अन् काळजात काही वेळासाठी धडकी भरली. मग काय मनात तिच्या आतल्या माणसासाठी मी प्रार्थना करू लागलो,हे शहर अस काही झाल्यावर पण थांबत नाही याची मात्र खंत वाटली, अन् मी पुन्हा जुन्या आठवणीत गेलो. तेव्हा मी पण इथच एका नामांकित कंपनीत काम करायचो जे खूप मेहणीतीच असत, त्यामुळे कंपनीतील प्रत्येक माणसाबद्दल मला नेहमीच आदर वाटतो, का तर ते मी अनुभवलं आहे जगलो आहे. सकाळीच सहा वाजता थंडीत कुडकुडत मी गाडीवर जायचो,कंपनीत कुणी पायी तर कुणी सायकल वर यायचं,मी शक्य त्यांना गाडीवर बसून घेत असायचो. पायात असलेले ते दोन कीलोचे बुट आपण किती वजनदार,महत्त्वाचे काम करत आहे हे नेहमी आठवण करून द्यायचे. मी पण जगत होतो, अनुभवत होतो त्या जगण्याला.सकाळी या सिग्नलला खूप गर्दी असते पण रात्री जेव्हा नाईट शिफ्ट साठी जायचो तेव्हा वर्दळ थोडी कमी भासायची. पण शहर कधी बंद होयचंच नाही ते चालूच असायचं,ते हॉस्पिटल ही चालू असायचं. अन् त्या रिक्षापण चालूच असायच्या पण त्यांच्या भेटण्याच्या वेळी मात्र माझ्या वेगवेगळ्या असायच्या. एकूण काय तर छान होते ते दिवस आजही काही वेगळं नाही. पण हे मात्र नक्की होत की या सिग्नल ने मला खूप काही शिकवलं होते, अन् हे शहरही कधी बंद होत नव्हत. भले सिग्नल लागलं की काही वेळासाठी ते शहर थांबत जिथं माणसे मात्र कधीच नाही थांबत शहर मात्र थांबत....
ठिकाण: धूत हॉस्पिटल,जालना रोड चिकलठाणा M.I.D.C Road,Aurangabad.
#LifeofSignal....
लिखित:भारत सोनवणे(सौमित्र).
ठिकाण: धूत हॉस्पिटल,जालना रोड चिकलठाणा M.I.D.C Road,Aurangabad.
#LifeofSignal....
लिखित:भारत सोनवणे(सौमित्र).
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा