भटक्या मुसाफिर ..!
आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं.
कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं.
जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं.
असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते.
आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भटकणं झालं मग; वाचन झालं. बाभळीची वने भटकणं झालं. सायंकाळी फ्लॅटवर आलो तसं पाय फटफट करायला लागले. फ्लॅट पार्टनरला घेऊन भटकायला म्हणून पुन्हा फ्रेश होऊन बाहेर पडलो.
तो चहाच्या अन् सिगारेटच्या थोटकाच्या भलत्या तलपीचा आहे. "एक कश के साथ चाय की एक सीप" ओढताना त्याची लागलेली तंद्री बघितली की, मला सफल झालेला प्रणय अन् शेवटची काही क्षण जे सुख वाट्याला देऊन जातात, जो ऑर्गझम मिळवून देतात. तो या चुत्या मित्राच्या नजरेतून दिसून येतो.
आयुष्याकडे फार काही अपेक्षा त्याने ठेवलेल्या नाहीये. त्यामुळं तो महिन्याला कंपनीत कंत्राटी पद्धतीने काम करून मिळणाऱ्या दहा हजारात रोज असं एकदा हे सुख मिळवून,विकत घेऊन खुश असतो. तितकंच खुश जितकं नको त्या ठिकाणी, नको तिला हौस भागण्यापर्यंत कुस्करून झाल्यावर एज.आय.व्ही वाट्याला यावा. मग एखाद्या तरुणाचं तरुण पोरींना फिरविणारं पिळदार शरीर आयुष्यात एड्स येऊन सर्व शरीर खोकलं होऊन जावं.
आयुष्याला घेऊन खूप विरोधाभास आहे, आयुष्यात अश्या भनंग वस्त्या भटकताना वाट्याला आल्या की हे असं लेखनातून येऊन जातं. पण; तिथली दुःख तिथेच सिगारेटीच्या धुराला जसं हवेत बेवारशी सोडावं तसं या भनंग वस्त्याला सोडला जातो. तो या जगण्याचा नियमच आहे. जसं वापरून झाल्यावर झालेल्या हौसेतून वाट्याला आलेलं निरोध बाभळीच्या वनात बेवारशी वाटेला फेकलं जातं.
मग मेसवर रात्रीची बेवारशी आयुष्य असलेल्या आमच्यासारख्या बेवारशी पोरांची जेवणं होतात. कॅनॉट मग भरल्या पोटाच्या संगतीने ओळखीचा वाटू लागतो. भरल्या पोटांना दिसणारी स्वप्न अन् गप्पा या भरभरून असतात, मग; आयुष्यात रस्त्यानं जाणारी होंडा सिटी कधीतरी आपल्या आयुष्यात आपली होऊन येईल अशी स्वप्न बघितली जातात.
माझ्यासारख्या थोडं अलिप्त आयुष्य जगणाऱ्या मुलांना बघून मग हे बेवारस आयुष्य जगणारी मित्र बोलून जातात की, तू नक्की घेशील होंडा सिटी. आमचं काय..? आम्ही तेव्हापण बेवारस मुसाफिर म्हणून तुझ्या होंडा सिटीतून भटकू पण आता जसं इमाने इतबारे सोबत आहोत तसे या भटकण्यासाठी तुला भाडे देऊ. मी ओंगळवाणे हसून त्यांचं हे बोलणं स्वीकारून घेतो.
फ्लॅटवर आलो की झोपल्याजागी त्यांच्या या मिश्किल बोलण्याचा विचार करत राहतो. मग प्रश्न पडतो या सगळ्यापासून अलिप्त राहून आयुष्य जगण्यात सुख आहे..? की, त्यांच्यासारखं बेवारस, बेफिकीर होऊन जगण्यात सुख आहे..?
Written by,
Bharat Sonawane
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा