मुख्य सामग्रीवर वगळा

दगडफोड्या संतू अन् नागूचं जगणं ..! भाग- ६

दगडफोड्या संतू अन् नागूचं जगणं ..! भाग- ६

मधूनच त्यानं सुमन बाईला भाकरी बांधायला अन् बिगीने आवरायला सांगितले अन् आपल्याला पावसाचा अंदाज बघून लवकर निघायला हवं असं म्हणून तो तिच्या भवती गरबड करू लागला होता. बरसदीचे दिवस जवळ येत होते अन् आता कामाचा उरक वाढवायला हवा म्हणून गोंडाजीसुद्धा गरबड करू लागला होता. 

तितक्यात संतूचा आवाज आला अय लेका मला बी येऊ दे रे, बरसदीच्या आदी म्या बी दगुड घेऊन येतो म्हंजी मग बरसाद सुरू झाली की आपलं टिकी टिकी टाके द्यायचं काम चालू राहील नाय का..!
नागू त्याला बघून हसू लागला अन् बोलता झाला..!
हाव रे लेका तुझ खरं हाय बघ, वजीस आवर अजून वाहतूळ आहे त्यांना आवराया, सुमनबाई न्याहारी बांधायली चौघ संगीतनं अन् सांच्याला संगतीनेच घर जवळ करा.

संतू हे बोलणं ऐकत त्यांच्या शिंगराला पाणी पाजत होता,पाणी पाजून झालं तसं त्यानं त्याच्यावर पोत्याची झूल टाकली अन् तो त्यात त्याचं दगुड फोडायच साहित्य टाकू लागला. त्याला काह ध्यान आलं एकाकी समजलं नाही त्यानं त्याची बंडी चपापली पण त्याला काही गवसत नसल्याचा उधार भाव तो चेहऱ्यावर आणून झोपडी आता गेला अन् आवजाराच्या जागी असलेल्या वळकटीत ठेवलेली छटाक किंवा पावशेराची देशीची एक चपटी त्यानं बंडीच्या आत असलेल्या चोर खिश्यात टाकली अन् तो काहीही न केल्याचं उसनं आवसान आणून त्याच्या बायकोची नजर चुकवीत शिंगरा मोहरं येऊन उभा राहीला अन् त्याच्या घरदनीला मोठ्यानं आवाज देऊ लागला.

संतू बोलू लागला,
म्या काय म्हणतो आवरतया का आजच्या दिस का दिवस इथंच मावळतीला घालायाचा इच्चार हायसा..?
त्याची बायको बोलू लागली,
नाय वं जी निघालू की आता न्याहारी बांधायली, तुम्ही वजेस एका काम करा तू पर, झोपडीच्या मागल्या अंगाला पोत्याची कॅन हायसा तितकी भरून झूलीला बांधा..!
संतू बोलू लागला,
मायला हा काय तमाश्या बा. गडी असून बायकांच्या कामाला जुंपायली तू त मला..!
दूरवरून नागू त्यांचं बोलणं ऐकत असल्याचं संतूच्या लक्षात आलं.
तसं तू गुमान जाऊन कॅन भरून घेऊन आला अन् शिंगराच्या अंगावर असलेल्या झुलीला पक्की बांधून तो निघाला. मागून डोक्यावर पदर अन् पाटी घेऊन अन् कपाळावर आडवे कुंकू लावलेली त्याची बायकोही त्याच्या मागे निघाली.

दोघेही नागूच्या घराजवळ आली अन् संतू गोंडाजीला हाळी देऊ लागला..!
अय गोंडाजी आवरलं का लेका, सुटतूया का बायकोचा पदर आजच्या दिस..,? 
अन् नागूकडे बघून तो हसायला लागला, एकाकी सगळे हसायला लागले. 

लाजतच गोंडाजी झोपडीतून बाहेर आला, रानूबाईने ठेवलेला कोऱ्या चहाची कप तो थाळणीत घेऊन आला. त्यानं सगळ्यांना चहा दिला, तितक्यात सुमनबाई डोक्यावरचा पदर सावरत पाटी घेऊन समोर आली. तिला लाजयला झालं अन् ती खाली नजर घालून संतूच्या बाई संगतीने चालायला लागली. संतू नागूची राम-श्याम झाली. गोंडाजी संगतीने संतू आपआपली शिंगरू घेऊन गावाच्या सडकीनं निघाली.

गावच्या चौफेर रानाला येड्या बाभळीचे वने असल्यानं गाव चहूकडून बंदिस्त होता. गावच्या एका अंगाला मुसलमान बांधवांचा मोहल्ला अन् एका अंगाला महार, मांग बांधवांची वस्ती होती. एका अंगाला घिसाडी लोकांची झोपडी वजा घरं बरसदीच्या सुरुवातीला तीन महिने असायची अन् मग एखादा गावचा पाटील असावा तसा गावचा घिसाडी गावची सर्व कामं बारा महिने करायचा. अश्यानं त्याची गावात वट होती, गावात पाटलांच्या मांडीला मांडी लावून तो बसायचा.

घिसाडी लोकांचा काफिला त्यांच्या गावाला गेला की मग संतू अन् नागू यांच्या झोपड्या गावच्या एका अंगाला असलेल्या बाभळीच्या वनात पडायच्या. पण गेले दोन-तीन साल त्यांची इथे त्यांचं ठान मांडून ठेवलं होतं. गावच्या मोहरे असलेल्या मोकळतीच्या रानाला तीन-चार खदानी होत्या, दगुड जीव घ्यायचा. खूप मेहनतीने आचारी जेव्हा खव्याची बर्फी करतो अन् ती जशी रवेदार होऊन छान आकारात कापली जाते तसा इथला दगुड आकाराला व्हायला फार त्रास देत नव्हता. अर्धा आधिक टाके देऊन झालं की फुटत नव्हता.
क्रमशः
नाव:भारत लक्ष्मण सोनवणे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...