प्रिय, पत्रास कारण की, काल-परवापासून शिवना नदीच्या पुला खालून पाणी वाहते झाले आहे अन् नेमकाच आषाढ लागलेला आहे... अंगणातले झाडे आता बहरलीये आणि त्यामुळे मंदिरात फारसा पालापाचोळा होत नाहीये,मंदिराचा परिसर स्वच्छ राहत आहे.कधीतरी सोसाट्याचा वारा आला की,मग चिंता सतावते कारण काही झाडांची उंची फार वाढलेली आहे तसेच पाने,फुले,फळे पडून खराब होऊन जातात... मी या मताचा आहे की झाडांची फुले,फळे हे पूर्णपणे तयार होण्यापर्यंत झाडावरच असावी हल्ली ते शक्य होत नाहीये... मलाही दुःख होतेच पण काय करणार अग्नी,जल,आणि वारा यांच्याशी वैर करून आपले काहीही साध्य होत नाही याची मला जाणीव आहे.त्यामुळे मी त्यात फारसा पडत नाही... हो मात्र नित्य नियमाने ठरवून दिलेल्या वेळीत सकाळ मंदिर आवारातील सर्वच मी सेवाभावे झाडून,पुसून घेत असतो.आता तब्येत साथ देत नाही पण,माझा श्वास आहे तोवर हे मला चुकणार नाहीये.... काल राच्याला एकदमच सोसाट्याच्या वार्यासह पाऊस बरसू लागला,ओसरीत झोपलेलो मी खिडकीतून येणाऱ्या पावसाच्या थेंबांनी जागा झालो... उठताच पोटात कळ येऊन गेली,माहीत नाही पण हल्ली पोटपाठ यांचे खोबऱ्याच्या खावट...
माझ्या मनातल्या भावनांना लेखणीच्या सहारे कैद करण्यासाठी माझा हा ब्लॉग..! या ब्लॉग माध्यमातून मी मराठी साहित्यात नवोदित लेखक म्हणून जे काही लेखन केलेलं आहे.सोबतच माझ्या मनातील स्वगत,वाचलेल्या पुस्तकांच्या बाबतीत असलेल्या माझ्या प्रतिक्रिया,पर्यटन,क्रीडा क्षेत्रातील घडामोडींवर मला काय वाटते,माझे या विषयांवर असलेले प्रामाणिक मत,विचार मी या ब्लॉग माध्यमातून तुमच्या समोर मांडत आहे..! तेव्हा एकदा नक्कीच माझ्या या ब्लॉगला तुम्ही एकदा भेट द्या आणि आपल्या प्रतिक्रिया मला कळवा..!