मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

सप्टेंबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सीमांतनी..!

सीमांतनी..! हळदीने हात पिवळे झाले,लग्न झाले अन् नवतीचे नऊ दिवस संपले.एकोनिशीची सिमांतीनी आता दिवसभर कामाच्या अन् तिच्या संसाराच्या गराड्यात गुंतून गेली होती.टिपिकल गावाकडल्या साल दोन साल लग्नाला झालेल्या बायकांप्रमाने तीही कामं करू लागली,दिवसभर रोजंदारीने लोकाच्या वावराला खुरपणी,निंदणी करू लागली... ऐन तारुण्यात केलेलं पदार्पण अन् अंगावर संसार नावाच्या एका परंपरेत स्वतःला झोकून देऊन ती दिवसभर काम उपसायची अन् रात्री ऐन तारुण्यात आलेला तिचा दादला तिला घटकेभरचाही उसंत द्यायचा नाही...चार-सहा महिने मागे पडली,ऐन सुगीच्या दिवसात ती तीन महिन्याची पोटुशी असताना तिला कळलं अन् घरात आनंदाचा पारावर उरला नाही... कुणाच्या मनात घटकेभरही हा प्रश्न आला नाही की एकोनिशीची सिमांतीनी या सर्व गोष्टींना सामोरे जाईल का..? तिला इतक्या लहान वयात आलेलं बाळंतपण झेपल का..? , तिचं शेवटच्या काही महिन्यात तिला स्वतःला सावरणे जमल का..? प्रश्न खूप होते पण सर्व प्रश्नांना एकच उत्तर होतं..! ती काही जगाच्या पाठीवर न्यारी नाही,तिच्या मायला जमलं,तिच्या सासुला जमलं अन् आता तिच्या अठरा वर्षाच्या नंदेला जमलं. मग तिला

आठवणीतल्या दोघी..!

आठवणीतल्या दोघी..! रात्रीच्या या अश्यावेळी स्ट्रीट लाईटच्या प्रकाशात मुंबईचे रस्ते भटकायला लागलो की,काही वर्षांपूर्वी असाच ससेहोलपट करत असताना भेटलेल्या दोन मैत्रिणी आठवतात.एक साधारण तिशी-बत्तीशीतील तर एक माझ्या एव्हडी म्हणजे चोविशी-पंचिविशीतील... मुंबई म्हंटले की तिला रात्र काय अन् दिवस काय सारखाच,मुंबई थांबत नाही याचा प्रत्यय प्रत्यक्षात आपण हे सर्व अनुभवले की मग येतोच. तर आज सारखा त्याही दिवशी असाच भटकंती करत होतो,मला एकटा असलो की मग कुणी सोबत लागत नाही,जिकडे रस्ता घेऊन जाईल तिकडे मी भटकत असतो.... रस्ता दिवसापेक्षा हळुवार म्हणजे अती हळूच चालत होता,साधारण अर्धा एक मिनिटाच्या अंतरावर एखादी फॉर व्हीलर जवळून निघून जायची एखाद्या विशिष्ठ पॉईंटला कुठल्यातरी कॉलसेंटरची कॅब येऊन उभे राहायची,दोन तीन मुली उतरल्या की ती पुढे निघून जायची. त्यांच्यासाठी हे रोजचं होतं पण माझ्यासाठी हे नवीनच,कुतूहल वाटायचं त्यात माझी कुठल्याही विषयाच्या खोलात जाऊन विचार करण्याची सवय मग हा सर्व प्रवास भारी वाटायचा.... मोठ मोठाले होर्डिंग्ज,चमकणारे बॅनर अन् ही माझ्या सारख्या एक्कलकोंड्याला भुलवणारी मुंबई.

कविता

कविता कल्पनेतल्या स्वप्नांनमागे पळून पळून थकलो आहे आता, किरण एक आशेची कुठेतरी आयुष्यात माझ्या  वास्तवात स्वप्न उतरताना माझे पुन्हा एकदा दिसू देत आता..! हल्ली अलिकडे मीच मला कोसतो पडलेल्या प्रश्नांची मनास न पटणारी खरी उत्तरे, मीच माझ्या मनास मग ती. खोटी करुनी ती आता देतो..! किती आत उरली माझ्या अजुन आशेची तेविझू की मिनमिनू करणारी वात ती आता, जागावे मी प्रश्नांना घेऊन पुन्हा एकदा आता मार्ग सापडत नाही तोवर स्वप्न सुद्धा पुन्हा एकदा जगून घ्यावे आता..! खुडल्या गेल्या कळ्या जश्या उमलण्या आधीच झाडांच्या तितकाच मी माझ्या आत संपत जात आहे, सारखा फुलल्या सुखून गेलेल्या फुलांच्या..! तसबीरित कित्येक स्वप्न जुळून आले कुण्या एका घटकेस घात एकदा पुन्हा झाला अन्  जुळून आलेल्या तसबीरी खळकन पडल्या तसबीरी जश्या तसबीरि आड केले कुणा एका..! मृतम्याच्या त्या वेड्यावाकड्या भेकाड तसबीरि माझ्यापरी मग सुखी मला भासता आता...! Written by, Bharat Sonwane.

Evening Thought's..!

Evening Thought's..! एकांताशी स्वगत जुळून येणं इतकं सोप्पं नाही की खूप सहज कुण्या आपल्याशी आपली केमिस्ट्री जुळून येणं,त्यासाठी त्या पाईक व्हावं लागतं... भर उजेडात अंधार डोळ्यांना दिसू लागला की मग काही अंशी आपला एकांताशी स्वगत जुळून येणं या प्रक्रियेकडे प्रवास होवू लागतो,गर्दी अनोळखी वाटू लागते,आपली माणसे परकी भासू लागतात किंवा मग माणसाच्या गर्दीत ती हरवून जातात,आपल्याला दिसत नाहीत जरी दिसली तरी आपण त्यांना टाळू लागतो.... मग अश्या रिकाम्या खुर्च्या आवडायला लागतात,आपून बसलेल्या खुर्चीचे आपल्याला ओझे होवू लागते.डोळ्यांना खुर्ची समोरचा सुंदर निसर्ग दिसत असतो पण जाणिवेत तो जाणवत नाही.आपल्याला फक्त एकांत अन् आपलं एकटेपण अश्यावेळी जवळचे वाटायला लागते अन् आपले मनही मग त्यातच रमते,माणसांची सावलीसुध्दा मग काही काळाने आपल्याला नकोशी होवू लागते.... अस्ताला जाणारा सूर्य हवाहवासा वाटू लागतो,शेवटच्या किरणांना डोळ्यात सामावुन घ्यायला आवडतं,मग अंधारून आलं की आपल्याला चहूकडे उजेड दिसायला लागतो मग होणारी चिडचिड अन् स्ट्रीट लाईटचे बंद-चालू होणे यात कुठला फरक भासत नाही... अश्यावेळी पुन्हा ग

सायंकाळच्या गुजगोष्टी..!

सायंकाळच्या गुजगोष्टी..! अस्तित्वाच्या पुसट झालेल्या खुणा शोधत मन सैरभैर करत इकभ टकंती करत असले की,आपसूकच आपल्याला हवीशी ही जवळची मित्र भेटत असतात.हल्ली मी माणसात,माणसांच्या गप्पात फार रमत नाही,निसर्ग सोबतीला हवाहवासा वाटतो मला. अलिकडे फार काही अपेक्षा ठेवल्या नाहीये रोजच्या या दगदगीच्या आयुष्याकडे... रोजची सांज अन् रोजचा अस्ताला जाणारा सूर्य यांच्या सानिध्यात मला बघायला भेटावा इतकंच वाटतं..होय इतकंच...!  आयुष्याने न मागता खूप काही दिलं आहे अन् खूप काही दिलेलंही नाहीये पण जे आहे त्यात आता उद्याचा दिवस मी बघत असतो.वर सांगितल्याप्रमाणे माणसांचा सहवास मला आता नकोसा वाटतो,कारण अशी ही लहानगे भेटले की मग माझं संवेदनशील मन फारच विचार करायला लागतं... इतकं बरं आहे की,ते मन अजून संवेदनशील भावना जागून काही व्यक्तींचा आयुष्यात विचार करत असतं,कुणासाठी हळवे होत असते.नाहीतर जगण्याच्या सीमा माझ्या समवेत त्यालाही कळल्या आहे,त्यामुळे फार अश्या गुंतवून ठेवणाऱ्या गोष्टीत ते गुंतत नाही अन् मग भावनांचा होणारा गुंताही फार विस्कटल्या सारखा मला वाटत नाही.... अपेक्षा,ध्येपूर्तीसाठी आयुष्यभर झटणे याल

Emma Raducanu Is the New Teenage Queen of Tennis..! 💙

Emma Raducanu  Is the New Teenage Queen of Tennis..! 💙 काही गोष्टी अश्या असतात ज्या देवाला न मागता फक्त आपल्याला मिळालेल्या असतात,माझ्या बाबतीत एक अशीच गोष्ट आहे जी तुम्हाला सांगायला मला आवडेल...जेव्हा माझं आवडते कुणी यशाच्या,उत्कर्षाच्या त्या एका सर्वात उंचीच्या शिखरांना सर करत असेल तेव्हा त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर असणारा आनंद आणि स्मित तसच अन् अगदी तितकंच माझ्या चेहऱ्यावर झळकत असतं,तेव्हा चेहऱ्यावर असणारा आनंद अन् येणारा ग्लो काही औरच असतो... आज पुन्हा एकदा याची प्रचिती झाली,जेव्हा काही तासांपूर्वी टेनिस विश्वात आज पुन्हा एकदा सुवर्ण अक्षरात एक पान लिहल्या गेलं एक नव्या राणीच्या नावानं.होय टेनिस जगताची राणी जी अवघ्या सतराव्या वर्षात महिला टेनिस विश्वावर आपलं राज्य गाजवणारी खेळाडू ठरली आहे... आयुष्यात काही मिळविण्याचे स्वप्न बघितले अन् आपला प्रवास आपण त्याच मार्गाने केला की फक्त सोबतीला मेहनत,जिद्द,चिकाटी या गोष्टींची जोड असली की आपलं हे स्वप्न पूर्ण होण्यापासून आपल्याला कुणीही थांबवू शकणार नाही... याचीच प्रचिती काही घटकेपुर्वी झालेल्या टेनिस विश्वात आली,मानाच्या ४ ग्रँड

आयुष्य निर्माल्य झाले..!

आयुष्य निर्माल्य झाले..! वाहत्या नदीच्या किनाऱ्यावर कुणी निर्माल्य म्हणून देवाला वाहिलेल्या फुलांना नदीत वाहते टाकून पुढं निघून चालले होते.कुणी ते निर्माल्यरुपी असलेल्या कचऱ्याला नदीत वाहते टाकत असतांना शिवनामायचे हात जोडून विनवण्या करीत होते की,काही आपल्या मनातले शिवनामायला सांगत होते माहीत नाही अन् त्याला उत्तरही नव्हते. हे सर्व खूप मनोभावे चालू होते,यापाठीमागे श्रद्धा होती ती माझ्या सारख्यांना उमजूनही काहीही कळत नसल्याने कळल्याचे सोंग आम्हाला आणायचे होते... कुणी येतोय महादेवाच्या देऊळाकडे बघुन नदी किनाऱ्यावर उभे राहून महादेवाचे दर्शन घेतोय,कुणी पाण्यात डुबकी मारून आपलं पाप धुवून जाईल म्हणून त्यात डुबकी मारत होते.एका किनाऱ्याशी बेलाच्या पानांची दुकाने सजली होती,दहा रूपायाला एक १०८ पानांचा पुडा असे ते विकत होती,सोबत बेलाची फळसुद्धा होती.... विकणारी बारा-पंधरा वर्षांची ती लेकरं बघुन मी नदी किनाऱ्यावर बसून त्यांना न्याहाळत बसलो,एकीकडे व्यवहाराची गणितं शिकणारी ही मुलं होती ज्यांच्या चेहऱ्यावर न कुठला भाव होता की न कुठली श्रद्धा.फक्त आपण येथून किती पैसे घेऊन जाऊ इतकच ते विचार

सायंकाळच्या गुजगोष्टी...

सायंकाळच्या गुजगोष्टी... नेहमीप्रमाणे आजही सायंकाळ झाली अन् पावले रोजच्या सायंकाळी ज्या वाटेनं मी फिरायला जातो त्या वाटेला निघाली.गेले काही दिवस शहरात बऱ्यापैकी पाऊस होवून गेल्यामुळे घरापासून फिरस्तीच्या मोकळ्या मैदानापर्यंत सर्वदूर हिरवे गवत,विविध झाडे वाढीस लागली आहे. अस्ताला जाणाऱ्या सूर्याचे शेवटचे किरणं जेव्हा दव पडलेल्या गवतावर पडतात तेव्हा चमकणारे दव दिवसभराचा असलेला मानसिक त्रास,मनाचे हजारो प्रश्न यांना विसरायला भाग पाडतो... त्यामुळे अलिकडे सायंकाळची फिरायला जाण्याची वेळ फारशी मी चुकवत नाही,आयुष्यात फार विशेष असे काही चालू नसल्यामुळे ती ही फार चुकत नाही.घड्याळाच्या काट्यावर सध्या माझं आयुष्य बघायचं तर तास काट्यावर चालू आहे असं समजुयात,इतकं सर्व आयुष्यात हळुवार चालू आहे. असो जे आहे ते तूर्तच छान आहेअजून काही दिवस माझ्यासाठी तरी,कारण मनासारख्या गोष्टी नाही घडल्यातर माझ्यावर होणारा परिणाम खूप वाईट आहे.जो गेले काही दिवस अनेकदा अनुभवला,त्यामुळं आता फारसे विचार करत नाही,माझ्या आयुष्याच्या पलिकडे सुद्धा सर्व अस्थिर आहे त्यामुळं हे असावं कदाचित पण काही वेळा खूप काही चुकल्या

JNV च्या आठवणी...

JNV च्या आठवणी... भर उन्हाळ्याचे दिवस असायचे,सकाळची उन्हं सायकल चालवत असतांना पाठीशी पाठीवर पडायची अन् डोक्यातून घामाच्या धारा चेहऱ्यावर येऊ लागायच्या. नदी,नाले,छोट्या-मोठ्या पाऊलवाटा पार करून दोन तासात सायकलच्या कॅरीयरला लावलेली दोनशे पेपर वाटून संपायला यायची.चड-उताराच्या लाल मातीच्या फुफाट्यात असलेल्या रस्त्यानं मग शेवटची नऊ-दहा पेपर टाकण्यासाठी दीड-दोन कि.मी.सायकलवर भटकंती व्हायची... उन्हाळ्यात जवाहर नवोदय विद्यालयास सुट्टी लागली की तीच पेपरची संख्या तीन-चार पेपरवर येऊन जायची.मलाही नवोदयमध्ये जाण्यास कारण लागायचे म्हणून मी ही जायचो ते तीन चार पेपर घेऊन. कारण का लागायचं..? येथे असं काय होतं ज्यासाठी मी इतका भटकंती करून शेवटचे पेपर नेमके या नवोदयमध्येच का टाकायचो..? किंवा पहिले पण टाकू शकत होतो मग शेवटच का..? यालाही खूप कारणे होती,संपूर्ण पेपर टाकली की नवोदय विद्यालयात प्रवेश केला की रस्त्याने चढण लागायची.नवोदय विद्यालय आतील रस्ता संपूर्ण डांबरीकरन केलेला होता,रस्त्याच्या दोन्ही बाजूंना निळी-पिवळी फुलांची झाडे होती,गुलमोहराची झाडं होती,उन्हाळ्यात या रस्त्यांनी जातांना या स

History...!

HISTORY..! जसं एखाद्याला अडगळीच्या अंधाऱ्या खोलीत बसून तासंतास इतिहासाची पुस्तक वाचायला आवडतात.त्या अंधारात त्या पुस्तकात घडून गेलेल्या काळात कल्पनेत विहार करायला आवडते,त्याबद्दल जाणुन घ्यायला खूप आवडते अश्या व्यक्तींशी माझी मैत्री खूप सहज जुळून येते... इतिहास हा माझा अशक्य सुंदर इतका आवडता विषय आहे.अगदी इतका की मला एखाद्या जुन्या काही दशकांच्या बंद असलेल्या लायब्ररीमध्ये, जिथं फक्त नावाला प्रकाश अन कोंदट वातावरण असेल आणि इतिहासाची पुस्तके असतील अश्या ठिकाणी मी कितीही वेळ बसून ती इतिहासाची पुस्तके वाचू शकतो... अगदी दुसरीला असताना असलेला अश्मयुगीन इतिहास मला जेव्हा आवडला तेव्हापासून मला हे सर्व खूप जवळचे वाटते, वर्गातही सर शिकवत असताना मी कल्पनेत अश्मयुगीन माणसांसोबत भ्रमंती करत असायचो.थोडं हास्यास्पद आहे पण खरच मला इतिहास खूप जवळचा अन् त्याबद्दल नेहमीच जाणून घेण्याची भूक असलेला मी आहे... इतिहास म्हंटले की माझा सर्वाधिक आवडता इतिहास हा अश्मयुगीन काळातील इतिहास,नंतर मग संतांचा इतिहास,शिवाजी महाराज यांच्या काळातील इतिहास, स्वतंत्रपूर्व काळातील इतिहास हा फार किचकट असलेला इतिहास

Letter Writing Day..! ❤️

Letter Writing Day..! ❤️ तर आज पत्रलेखन दिवस, दिवसभर आज असंख्य पत्र वाचली,पत्रासोबतच्या अनेकांच्या आठवणी वाचल्या.अनेकांच्या पत्राला सुखाची कीनार तर अनेकांच्या पत्रात दुःखाचे कारण  घटकेसर्शी दिलासा म्हणून पत्रातुन व्यक्त होणं.कारण काहीही असो पत्र लिहायला निमित्त लागत नाही की कारणही अन् वेळही किंवा कुठल्याही नात्याचे बंधनही. आजचा दिवस भरभरून पत्रातून व्यक्त होणाऱ्या मनांची,व्यक्तींची पत्रविषयी असलेली जवळीक,प्रेम त्यांच्या लिखाणातुन दिसुन आले... माझ्याबाबतीत सांगायचे तर मी पत्ररुपी पत्र फार कमीच म्हणजे अगदी नगण्य असे माझ्या आयुष्यात लिहले.परंतु,पत्ररुपी अर्ज हे शाळेत असल्यापासून ते आजतागायत लिहतो आहे,पाठवतो आहे... आता अलीकडे नोकरी संदर्भात पत्र व्यवहार बरेच वाढले आहे,आजच्या डिजिटल युगात ही अर्जरूपी पत्र ही डिजिटल झाली अन् माझा डिजिटल पत्र व्यवहार ईमेलवरती मोठ्या प्रमाणात होवू लागला,हे काही दिवसांपूर्वी एक पोस्ट मधून मी आपणास सांगितलेच.अनेक पत्ररुपी अर्ज केलेत अगदी संपूर्ण विश्वात मी हे डिजिटल पत्र पाठवले आहे,कधी जॉबसाठी तर कधी फक्त पत्राप्रती असलेलं आकर्षण... म्हणूनच मी अलिकडे

गाव अन् गावच्या आठवणी

गाव अन् गावच्या आठवणी..! सकाळचा दहाचा सूर्य तळपत होता,तालुक्याचा पोस्टमन रानाच्या पायवाटेना बोडक्या टेकडीवर दहा-बारा घर असलेल्या ठाकर लोकांच्या वस्तीच्या दिशेनं सायकल लोटीत-लोटित येत होता. लाल कापड,डोक्यावर लाल टोपी घातलेला तो अन् सायकलीला लाल पिशवी असलेली ती सायकल बहुदा पंक्चर झाली असावी... मी टेकडीवर असलेल्या पाण्याच्या टाकीवर बसून होतो,टेकडी गावच्या उंचावर असल्याने पाण्याच्या टाकीवरून सारा गाव नजरी पडायचा.उन्हं असल्यानं अंगाची लाहीलाही होत होती पण अधून-मधून येणारी वाऱ्याची झुळूक काही काळ सुखाचा स्पर्श अंगाला करून जात असायची. दहा बारा घरांची ठाकरवस्ती असलेल्या वस्तीमध्ये चार-पाच तरुण पोरं शहराला औषधीच्या कंपनीत कंत्राटी पद्धतीने काम करायची.दहा पाच खेट्या केल्यानंतर सरपंच्याचा ओळखीने यांना लावून दिलं होतं.कधी महिना-पंद्रादिला त्यांचं पत्र यायचं त्यांची ख्यालीखुशाली कळायची,आईबापसांला महिन्याकाठी शे-दोनशे रूपडे पोरं पाठवायची म्हणून त्यांच्या घरची लोकं तालुक्याचा पोस्टमनची वाट देवागत बघत राहायची... म्या काय चार बुक शिकलो नसल्यानं मी काय करू शकत नव्हतो,मग दहा बारा शेरड्या घेऊन