कविता
कल्पनेतल्या स्वप्नांनमागे
पळून पळून थकलो आहे आता,
किरण एक आशेची कुठेतरी आयुष्यात माझ्या
वास्तवात स्वप्न उतरताना माझे पुन्हा एकदा दिसू देत आता..!
हल्ली अलिकडे मीच मला कोसतो
पडलेल्या प्रश्नांची मनास न पटणारी खरी उत्तरे,
मीच माझ्या मनास मग ती. खोटी करुनी ती आता देतो..!
किती आत उरली माझ्या अजुन आशेची
तेविझू की मिनमिनू करणारी वात ती आता,
जागावे मी प्रश्नांना घेऊन पुन्हा एकदा आता
मार्ग सापडत नाही तोवर स्वप्न सुद्धा पुन्हा एकदा जगून घ्यावे आता..!
खुडल्या गेल्या कळ्या जश्या उमलण्या आधीच झाडांच्या
तितकाच मी माझ्या आत संपत जात आहे,
सारखा फुलल्या सुखून गेलेल्या फुलांच्या..!
तसबीरित कित्येक स्वप्न जुळून आले कुण्या एका घटकेस
घात एकदा पुन्हा झाला
अन्
जुळून आलेल्या तसबीरी खळकन पडल्या तसबीरी
जश्या तसबीरि आड केले कुणा एका..!
मृतम्याच्या त्या वेड्यावाकड्या भेकाड तसबीरि माझ्यापरी मग सुखी मला भासता आता...!
Written by,
Bharat Sonwane.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा