Letter Writing Day..! ❤️
तर आज पत्रलेखन दिवस,
दिवसभर आज असंख्य पत्र वाचली,पत्रासोबतच्या अनेकांच्या आठवणी वाचल्या.अनेकांच्या पत्राला सुखाची कीनार तर अनेकांच्या पत्रात दुःखाचे कारण घटकेसर्शी दिलासा म्हणून पत्रातुन व्यक्त होणं.कारण काहीही असो पत्र लिहायला निमित्त लागत नाही की कारणही अन् वेळही किंवा कुठल्याही नात्याचे बंधनही.
आजचा दिवस भरभरून पत्रातून व्यक्त होणाऱ्या मनांची,व्यक्तींची पत्रविषयी असलेली जवळीक,प्रेम त्यांच्या लिखाणातुन दिसुन आले...
माझ्याबाबतीत सांगायचे तर मी पत्ररुपी पत्र फार कमीच म्हणजे अगदी नगण्य असे माझ्या आयुष्यात लिहले.परंतु,पत्ररुपी अर्ज हे शाळेत असल्यापासून ते आजतागायत लिहतो आहे,पाठवतो आहे...
आता अलीकडे नोकरी संदर्भात पत्र व्यवहार बरेच वाढले आहे,आजच्या डिजिटल युगात ही अर्जरूपी पत्र ही डिजिटल झाली अन् माझा डिजिटल पत्र व्यवहार ईमेलवरती मोठ्या प्रमाणात होवू लागला,हे काही दिवसांपूर्वी एक पोस्ट मधून मी आपणास सांगितलेच.अनेक पत्ररुपी अर्ज केलेत अगदी संपूर्ण विश्वात मी हे डिजिटल पत्र पाठवले आहे,कधी जॉबसाठी तर कधी फक्त पत्राप्रती असलेलं आकर्षण...
म्हणूनच मी अलिकडे संपूर्ण विश्वात कुठेही मी ईमेल पाठवत असतो,ईमेलचा रिप्लाय तितकाच आनंद देऊन जातो जितका पाच-सहा दिवस पत्र पाठवून झाले की ते आपल्या हातात जेव्हा येते...
शालेय वयात सुट्टीचा अर्ज हेच माझं पत्र,पत्ररूपी ग्रिटींग कार्ड दिवाळीच्या सणाला,न्यू इअरसाठी अनेक मित्र-मैत्रिणींना दिले.नंतर नकळत्या वयात आलेल्या जबाबदाऱ्या अन् मग हे सगळं दुरावत गेलं,मग मात्र पत्र फक्त परीक्षेत लिहल्या गेले पण ते खूप मनापासून इतके की,अनेकवेळा माझं पत्र भर वर्गात शिक्षकांनी वाचून दाखविले...
खूपवेळा वाटायचं आपणही कुणाला पत्र लिहावे पण तेव्हा ते मला परवडणारे नव्हते,मग अनेकदा मनात येऊनही मी ते टाळत राहायचो.आजही खूपवेळा पत्र लिहायचा विचार करत असतो,सर्वकाही ठीक असूनही हल्ली पत्र लिहायला मन धजावत नाही...
कॉलेज वयातही सायन्सचा विद्यार्थी असल्यामुळे कधी पत्राचा संबंध आला नाही किंवा कॉलेज फक्त परीक्षेच्या दिवशीच माहीत असल्यामुळे कुणाला पत्र लिहून द्यायचीसुद्धा वेळ आली नाही.हेच योग्य वाटतं की नाही लिहली त्यावेळी पत्र तेच बरे झाले,नाही तर आज इतकं लिहायला मला शक्य नसतं...
पुढे बी.एस.सी. झालं अन् एक दिवस लायब्ररीमध्ये असताना का कुणास ठावूक काय वाटले पत्र लिहावं वाटलं,तेव्हापासून डायरीत पत्र लिहून ठेवायला लागलो.पुढे तेही कंटाळवाणे वाटायला लागलं कारण पत्र लिहण्यात तेव्हाच मज्जा जेव्हा ते कुणीतरी वाचणारे असते,नशिबाने आजवर पत्ररुपी पत्र वाचणारे कुणी जवळचे नाही,त्यामुळे नाही लिहत आता पत्र...
इतकं मात्र आहे एकदा मात्र हा पत्रांचा प्रवास अनुभवायचा आहे,जरी पत्र लिहली नसेल.पत्रांचा हा प्रवास जवळून बघायचा आहे,कारण त्याचं खूप आकर्षण खूप लहानपणापासून आहे.डिजिटल पत्रांचा प्रवास अजून काही वर्ष आयुष्यात नित्याचा असणार आहे,त्यामुळे लिहत राहायचं आहे अन् समोरच्या व्यक्तीला पत्र भेटले की आपसूक चेहऱ्यावर येणारे भाव कल्पनेत अनुभवणे चालू ठेवायचे आहे...
कुणाला इच्छा असेल तर नक्कीच प्रयत्न करा,तुमचे पत्र वाचायला आवडेल मला...
#LetterWritingDay ...!
Written by,
Bharat Sonwane .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा