HISTORY..!
जसं एखाद्याला अडगळीच्या अंधाऱ्या खोलीत बसून तासंतास इतिहासाची पुस्तक वाचायला आवडतात.त्या अंधारात त्या पुस्तकात घडून गेलेल्या काळात कल्पनेत विहार करायला आवडते,त्याबद्दल जाणुन घ्यायला खूप आवडते अश्या व्यक्तींशी माझी मैत्री खूप सहज जुळून येते...
इतिहास हा माझा अशक्य सुंदर इतका आवडता विषय आहे.अगदी इतका की मला एखाद्या जुन्या काही दशकांच्या बंद असलेल्या लायब्ररीमध्ये, जिथं फक्त नावाला प्रकाश अन कोंदट वातावरण असेल आणि इतिहासाची पुस्तके असतील अश्या ठिकाणी मी कितीही वेळ बसून ती इतिहासाची पुस्तके वाचू शकतो...
अगदी दुसरीला असताना असलेला अश्मयुगीन इतिहास मला जेव्हा आवडला तेव्हापासून मला हे सर्व खूप जवळचे वाटते, वर्गातही सर शिकवत असताना मी कल्पनेत अश्मयुगीन माणसांसोबत भ्रमंती करत असायचो.थोडं हास्यास्पद आहे पण खरच मला इतिहास खूप जवळचा अन् त्याबद्दल नेहमीच जाणून घेण्याची भूक असलेला मी आहे...
इतिहास म्हंटले की माझा सर्वाधिक आवडता इतिहास हा अश्मयुगीन काळातील इतिहास,नंतर मग संतांचा इतिहास,शिवाजी महाराज यांच्या काळातील इतिहास, स्वतंत्रपूर्व काळातील इतिहास हा फार किचकट असलेला इतिहास पण जरा मनापासून समजून घेतले की जवळचा वाटणारा नंतर स्वतंत्र नंतरचा इतिहास हे माझ्या मनाने मी केलेले इतिहासाचे टप्पे यात अजून बरेच असतील....
इतिहास म्हंटले की मग वाद येतोच मग खुद्द इतिहास म्हणजे नेमकं काय या प्रश्नाचे उत्तर एक नाहीतर अनेक आहे अनेकांनी इतिहास कोणत्या नजरेतून बघितला त्यानुसार ही व्याख्या झाली...
यात मला सर्वात सोयीचे अन् सर्वात सोप्पी वाटली ती व्याख्या म्हणजे इतिहासाचे जनक "हिरोडोटस" यांची व्याख्या.पुढे ही अनेक जणांनी मान्यही केली पण याबद्दल नेहमीच चर्चा होत राहिली....
१)हिरोडोटस यांची व्याख्या-
भूतकालीन मनोरंजक,संस्मरणीय घटनांचा शोध म्हणजे इतिहास होय.
किती सहज अन् समजणारी ही व्याख्या.
२) जर्मन विचारवंत हर्डर यांची व्याख्या- हर्डर यांच्यामते इतिहास म्हणजे घटनांची साखळी
३) धर्मानंद कोसंबी यांनी इतिहासाची व्याख्या-
इतिहास म्हणजे साधन व उत्पादन यांचा संबंधातील एका अनुक्रमावर आधारित घटनाक्रम.
४) पंडित जवाहरलाल नेहरू यांची इतिहासाची व्याख्या-
निरनिराळ्या युगात निसर्ग व पंचमहाभूते, वन्यपशू व अरण्य आणि शेवटी ज्या सजातियानी मनुष्याला पददलित ठेवण्याचा व आपल्या स्वार्थासाठी त्याचे शोषण करण्याचा प्रयत्न केला आहे. या सर्वांच्या विरूद्ध त्याने केलेल्या संघर्षाची कहाणी म्हणजे इतिहास होय.
५)कार्ल मार्क्स यांची थोडीशी वेगळी व्याख्या-
साम्यवादी विचारप्रणालीचा जनक म्हणजे कार्ल मार्क्स याने वर्गकलह म्हणजे मानवी इतिहास होय अशी वेगळी व्याख्या मत तयार केले.
१९ व २० या शतकात आर्थिक,सांस्कृतिक इतिहासाचे लेखन मोठ्या प्रमाणावर पाश्चात्य देशात झाले.सांस्कृतिक इतिहासाची उत्तम उदाहरणे म्हणून व्होलटेअरच्या THE HISTORY OF THE MARD'S AND CUSTOMS OF THE NATIONS आणि रेनॉल्डच्या HISTORY OF THE IDEAS या ग्रंथाचा उल्लेख केला जातो...
इतिहास समजून घेण्यासाठी आपल्याला त्याची काही मुद्दे समजून घ्यावी लागतात तेव्हाच आपल्याला इतिहास समजून घ्यायला सहज जातो.
Ex-१)PALEOGRAPHY (जुन्या हस्ताक्षरांचा अभ्यास करणारे शास्त्र.)
२)PHILOLOGY (भाषाशास्त्र अनेक भाषांचा तौलनिक अभ्यास करणारे शास्त्र).
३)GEOGRAPHY (भूगोल हा शब्द व्यापक अर्थाने वापरला जातो परंतु इतिहास जाणुन घेताना त्या प्रदेशाची रचना,नैसर्गिक सीमा,डोंगर, दऱ्या,जंगले,समुद्र इत्यादी यांचा अभ्यास केला जातो म्हणून हे एक महत्वाचे अंग ठरते.)
४)ARCHAEOLOGY (पुरातत्व शास्त्र)
पुरातत्व शास्त्र म्हणजे प्राचीन अवशेषांचा अभ्यास करणारे शास्त्र.
आणि असे मुद्धे आहेत की ज्यांचा उपयोग इतिहास जाणून घेण्यासाठी केला जातो.
(काही दिवसांपूर्वी अश्याच आशयाचा एक लेख लिहलेला होता,माझासारख्या इतिहास प्रेमींना तो आवडेल म्हणून थोडक्यात येथे शेअर करतोय.)
भविष्यासाठी वर्तमानकाळात आपलं आयुष्य कसं सुखकर होईल,आयुष्याशी कोणत्या विचारांची लगट आपल्याला करावी लागेल यासाठी अनेक पुस्तकं संपूर्ण जगात भूतकाळात लिहल्या गेली.जी काही शतकांपूर्वी आताच्याही शतको पुढील वर्तमान काळातील वर्षांचा,स्थितीचा विचार करून लिहल्या गेली आहे,आजही ती लिहल्या जात आहेत....
हे लेखन सर्व गुंतागुंतीच वाटत असेल पण माझ्या लेखी "पुस्तक" या शब्दाची व्याख्या ही आहे की,
"वर्तमान काळातील जीवन सुखकर करण्यासाठी आणि भविष्य काळातील कल्पनेतील जगण्यासाठी इतिहासाने उपयोगी ठरेल अश्या भूतकाळातील नोंदी ठेवण्याचं पुस्तक हे एक माध्यम"
कदाचित माझा कल हा इतिहास विषयाकडे जास्त असल्यामुळे मला तसे वाटत असावं,त्यामुळे विचारानुसार ही व्याख्या बदलत जाते...
आज घडीला अनेक पुस्तके,ग्रंथ हे आपल्याला जगण्यासाठी समृद्ध करत आहेत.आपला वैभवशाली इतिहास आपल्या समोर ठेवत आहे,इतिहासात अनेक लेखक होवुन गेले ज्यांनी आपल्या विचारधारा लिखाणातून व्यक्त करत जगाला एक समृद्ध जीवन कसे जगायचे याचा संदेश दिला.भारताचा इतिहास लिहणारे अनेक लेखक होऊन गेले,ज्यांनी अनेक पुस्तके,ग्रंथ आपल्या देशाच्या संस्कृतीशी,इतिहासाशी निगडीत लिहले.
१)जेम्स मिल- History of Birtish India. (खंड ३)
२)माल्कम- Political History of India.
३)व्हॅलेंटाईन चिरोल-Father of indian unrest.
४)राॅबट आर्म- Historical Frugments.
५)राधाकुमुध मुखर्ची-Ancient India, Ancient india Education,Gupta Empire, (Hindu Civilization),Nationalism in Hindu culture, Local Self Govt.in Ancient india.
६)के.पी.जैस्वाल -History of India.
७)सर जदुनाथ हरकार-Fall of Mughal Empire (खंड ४), Shivaji & His Time.
८)दादाभाई नौरोजी-Poverty of Birtish Rule in India.
९)जेम्स टाॅड- Annals and Antiquities of Rajasthan.
१०)ऐ.एस.अळतेकर-The Position of women in Hindu Civilization.
११)एडवर्ड सैद-Orientalism.
१२)लिओपोल्ड वाॅन रेंके- Princes of people of Southern Europe.
१३)हेगेल- Philosophy of Dialectic.(तत्त्वज्ञान)
१४)डॉ.के.एन.चिटणीस- Research Methodology in History.
Written by,
©®Bharat Sonwane .
(वरील लेख माझ्या नावासहित शेअर करायला माझी हरकत नाही)
क्रमशः
Written by,
Bharat Sonwane
MBA:Production and Operation.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा