सायंकाळच्या गुजगोष्टी..!
अस्तित्वाच्या पुसट झालेल्या खुणा शोधत मन सैरभैर करत इकभ टकंती करत असले की,आपसूकच आपल्याला हवीशी ही जवळची मित्र भेटत असतात.हल्ली मी माणसात,माणसांच्या गप्पात फार रमत नाही,निसर्ग सोबतीला हवाहवासा वाटतो मला.
अलिकडे फार काही अपेक्षा ठेवल्या नाहीये रोजच्या या दगदगीच्या आयुष्याकडे...
रोजची सांज अन् रोजचा अस्ताला जाणारा सूर्य यांच्या सानिध्यात मला बघायला भेटावा इतकंच वाटतं..होय इतकंच...!
आयुष्याने न मागता खूप काही दिलं आहे अन् खूप काही दिलेलंही नाहीये पण जे आहे त्यात आता उद्याचा दिवस मी बघत असतो.वर सांगितल्याप्रमाणे माणसांचा सहवास मला आता नकोसा वाटतो,कारण अशी ही लहानगे भेटले की मग माझं संवेदनशील मन फारच विचार करायला लागतं...
इतकं बरं आहे की,ते मन अजून संवेदनशील भावना जागून काही व्यक्तींचा आयुष्यात विचार करत असतं,कुणासाठी हळवे होत असते.नाहीतर जगण्याच्या सीमा माझ्या समवेत त्यालाही कळल्या आहे,त्यामुळे फार अश्या गुंतवून ठेवणाऱ्या गोष्टीत ते गुंतत नाही अन् मग भावनांचा होणारा गुंताही फार विस्कटल्या सारखा मला वाटत नाही....
अपेक्षा,ध्येपूर्तीसाठी आयुष्यभर झटणे याला कुठेतरी पूर्णविराम दिला आहे सध्या आयुष्यात.म्हणजे ही प्रश्न आयुष्यभर न सुटणारी आहे,त्यामुळं नैराश्येच्या गर्तेत जाण्यापेक्षा काही घटकेभरचा विसावा म्हणुन आयुष्याचा हा क्षणिक सोहळा साजरा करतो आहे बस...बाकी योग्य वेळ आली की ही आयुष्यभर न सुटणारी प्रश्न सोडायला प्रयत्न करायचे आहेच...
तोवर अस्ताला जाणारा सूर्य,सूर्यास्त अन् सोबतीला अशी ही छोटी दोस्त...
Written by,
Bharat Sonwane
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा