हरवलेला गाव... माझा तो गाव हरला आहे,भर उन्हात दुपारच्याला उंच-उंच दुमजली वाड्यांच्या दगडी भिंतीच्या आडोश्याला सावलीत चालताना भिंतीना गाल लावून जो थंडावा अनुभवला आहे तो हल्ली अनुभवास मिळत नाही. गाव बदलला,गावातल्या वाड्यांची जागा उंच इमारतींनी घेतली... भर दुपारी पारावर बसलेल्या म्हाताऱ्या,म्हातारे आता गावात उरलेच नाही जी उरली बिचारी अंथरुणाला खिळून आपला शेवटचा काळ मोजता आहेत.ओट्यावर,कट्ट्यावर बसायला गावातली सारखी-वारखी पोरंच गावात राहिली नाही,जी आहे ती घरात बसली आहे म्हणून गाव माणसावाचून पोरका झाला आहे. गावातली दुकान बदलली अन् दुकांदरही बदलला दुकानात आता दोंड रुपायची रांगोळी,तिंड रुपयाचं तूप कागदात गुंढळुन नाही भेटत.गावाची रविवारची बंद शाळा कायमची बंद झालेली दिसती,एरवी रोज बंद अवस्थेत असलेली सरकारी दप्तरं मात्र आता रविवारीसुद्धा त्यांच्या शिक्यांची ठाकठूक करत बसलेली असतात.दप्तरातून मोडकळीस आलेल्या खिडकीच्या पल्ल्याड दिसणाऱ्या नदीच्या दृश्याला नजरेत टिपणारा तो साहेब बदली झाला आहे जणू,म्हणून दप्तरात हल्ली जीव लागत नाही. एक ब्येस केलं आहे या काळात दप्तरातील लाकडी कपाट बदलून...
माझ्या मनातल्या भावनांना लेखणीच्या सहारे कैद करण्यासाठी माझा हा ब्लॉग..! या ब्लॉग माध्यमातून मी मराठी साहित्यात नवोदित लेखक म्हणून जे काही लेखन केलेलं आहे.सोबतच माझ्या मनातील स्वगत,वाचलेल्या पुस्तकांच्या बाबतीत असलेल्या माझ्या प्रतिक्रिया,पर्यटन,क्रीडा क्षेत्रातील घडामोडींवर मला काय वाटते,माझे या विषयांवर असलेले प्रामाणिक मत,विचार मी या ब्लॉग माध्यमातून तुमच्या समोर मांडत आहे..! तेव्हा एकदा नक्कीच माझ्या या ब्लॉगला तुम्ही एकदा भेट द्या आणि आपल्या प्रतिक्रिया मला कळवा..!