शब्द संपले आहे माझे... शब्द संपले आहे माझे, कवितेला विकण्या पर्याय शोधायचा आहे... विकले गेले शब्द माझे, कवितेला जगण्या पर्याय मिळाला आहे... हल्ली कवितांची भाषा मला उमगत नाही,सुचल्या त्या कविता कोठे, मागे सोडून दिलेल्या अडचणीच त्या... शब्द माझे फक्त माध्यम ते जगण्याच्या गुज गाण्याशी आहे, मैफिल रोज सजते इथे पण ती अपुरी कवितांशिवाय आहे.... पर्याय शोधले शिवाय कवितेच्या अनेक मी आहे,मार्गच तो चालण्याचा कविते शिवाय जीवन व्यर्थ आहे... कविता हल्ली रचली जात नाही रुजवली जाते माझ्या आत आहे, विकली कविता जेव्हा माझी विकले मला जात आहे.... नाव:भारत सोनवणे
माझ्या मनातल्या भावनांना लेखणीच्या सहारे कैद करण्यासाठी माझा हा ब्लॉग..! या ब्लॉग माध्यमातून मी मराठी साहित्यात नवोदित लेखक म्हणून जे काही लेखन केलेलं आहे.सोबतच माझ्या मनातील स्वगत,वाचलेल्या पुस्तकांच्या बाबतीत असलेल्या माझ्या प्रतिक्रिया,पर्यटन,क्रीडा क्षेत्रातील घडामोडींवर मला काय वाटते,माझे या विषयांवर असलेले प्रामाणिक मत,विचार मी या ब्लॉग माध्यमातून तुमच्या समोर मांडत आहे..! तेव्हा एकदा नक्कीच माझ्या या ब्लॉगला तुम्ही एकदा भेट द्या आणि आपल्या प्रतिक्रिया मला कळवा..!