शब्द संपले आहे माझे...
शब्द संपले आहे माझे,
कवितेला विकण्या पर्याय
शोधायचा आहे...
विकले गेले शब्द माझे,
कवितेला जगण्या पर्याय
मिळाला आहे...
हल्ली कवितांची भाषा मला उमगत नाही,सुचल्या त्या कविता कोठे,
मागे सोडून दिलेल्या अडचणीच त्या...
शब्द माझे फक्त माध्यम ते जगण्याच्या गुज गाण्याशी आहे,
मैफिल रोज सजते इथे पण ती
अपुरी कवितांशिवाय आहे....
पर्याय शोधले शिवाय कवितेच्या अनेक मी आहे,मार्गच तो चालण्याचा कविते शिवाय जीवन व्यर्थ आहे...
कविता हल्ली रचली जात नाही
रुजवली जाते माझ्या आत आहे,
विकली कविता जेव्हा माझी विकले मला जात आहे....
नाव:भारत सोनवणे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा