Wild Life... भर दुपारच्या उन्हात तो धरण पाळेचा आधार घेऊन सभोवतालच्या परिसरात नजर लावून बसलेला असायचा,नजर शून्यात असायची की,काहीतरी विचार करत काही शोधात असायची हे फार सहज कळायचे नाही... पण बर्याचवेळ उन्हात उभे राहून जेव्हा दूरवर उन्हाची झळई डोळ्यांना तुटतांना दिसायची त्यावेळी आपसुकच त्याच्या डोळ्यांतून पाण्याचे ओघळ वाहुन यायचे अन् तो या वाळलेल्या,बोडक्या रानात नजर लावुन काहीतरी शोधत आहे हे ज्ञात होत असायचं... उंचावर असलेल्या धरण पाळेवरून त्याला दूरवर पसरलेल्या रानाचा अंदाज घेता येत असायचा,चरायला म्हणुन सोडलेल्या बकऱ्यासुद्धा राखण करता यायच्या,न्याहाळता यायच्या. एखाद दुसरी बकरी वाट चुकली तर तोंडानं विशिष्ट शैलीने तो शिळ फुंकायचा अन् वाट चुकलेली ती बकरी पुन्हा आपल्या कळपात परतायची. वेगळं काही नसायचं रोजचं हेच..! पहाट झाली सुर्य किरणे अंगावर आली की,आवरुन महिन्यांनी बांधलेल्या बकऱ्या चरायला,वळायला म्हणुन रानात घेऊन यायच्या अन् सुर्य धरणपाळेच्या खाली कलला की बकऱ्या घेऊन परतीच्या वाटेवर मार्गानं लागायचं... रस्त्यावर असलेल्या झाडांच्या फांद्या उंच बांबूला बांधलेल्या विळ्याने तोडून डोईवर बांधुन...
माझ्या मनातल्या भावनांना लेखणीच्या सहारे कैद करण्यासाठी माझा हा ब्लॉग..! या ब्लॉग माध्यमातून मी मराठी साहित्यात नवोदित लेखक म्हणून जे काही लेखन केलेलं आहे.सोबतच माझ्या मनातील स्वगत,वाचलेल्या पुस्तकांच्या बाबतीत असलेल्या माझ्या प्रतिक्रिया,पर्यटन,क्रीडा क्षेत्रातील घडामोडींवर मला काय वाटते,माझे या विषयांवर असलेले प्रामाणिक मत,विचार मी या ब्लॉग माध्यमातून तुमच्या समोर मांडत आहे..! तेव्हा एकदा नक्कीच माझ्या या ब्लॉगला तुम्ही एकदा भेट द्या आणि आपल्या प्रतिक्रिया मला कळवा..!