मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जानेवारी, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

हरवलेल्या माझ्यासोबतचा तो एक

तो हल्ली काय करतो कुणास ठाऊक म्हणजे काल सकाळी मी अंघोळ करून थंडी वाजत असल्यामुळं बाल्कनीत येऊन भांग पाडत होतो... माझं असे आहे की मला मुलींपेक्षा जास्तवेळ लागतो भांग पाडायला,मी बसलो होतो समोरून सुर्य किरणांची तिरीप मस्त अंगावर पडत होती. आरसा छानपैकी सेट केल्यामुळे माझं चालले होते भांग पाडणे.बाजुला एका प्लास्टिकच्या डब्यात  पावडरचा डब्बा,क्रीम,अजुन दोन कंगवे,आईच्या गोल बारीक टिकलीचे पाकिटे त्यात होती... मस्त भांग पाडून झाला अन मी आता त्याला न्याहाळत बसलो होतो,तो पण आता उठला होता तसा तो बाल्कनीत आला हात उंचावून आळस देत मला हात दिला.... अन म्हणाला काय लेखक साहेब बरे आहे का तुमचे काम ? मी म्हंटले हो भाऊ कसले लेखक अन् कसले काय,सुशिक्षित बेरोजगार म्हणा वाटले तर मला राग नाही येणार. तो हसतच बोलला नाही रे छान लिहतो तु, तुझ्याकडे काहीतरी आहे कराण्यासारखे मी जर बेरोजगार झालोना तर,मला घरचे दोन वेळची भाकर देतील की नाही काय माहीत.अन् चेहरा पाडुन तो तिथुन निघुन गेला... मी पण मनात हा प्रश्न घेऊन आता गेलो की तो मला अडवा बोला होता की,त्याचे काही विपरीत ? आईने तोवर गरम कॉफी टेबल वर आणुन ठेवलेली होती

धरणपाळेवरच्या माझ्या कविता....

माळराणावरची माझी ती बाभूळ बोडखी झाली,काळ बदलला अन् तिची फरफट निघाली..! ओसाड झाले माझेच आंगण,बकऱ्या माझ्या उपाशी आता कोणाला मी सांगण..! माळराणावरची माझी ती बाभूळ बोडखी झाली आता..! मी अजुनी कीतीक सोसावे जगतांना पिलांच्या या मरणाला,पाळेवर धरणाच्या मी बसुन देतो उसासे अश्रु आहे आता फक्त कारणाला.... माळराणावरची माझी ती बाभूळ बोडखी झाली आता..! लांब वेताच्या काठीला ईळा आहे मी आता बांधला,जाता मी बघतो पाला तोडून कुणी गं बाई साराच आहे गं निला... माळराणावरची माझी ती बाभूळ बोडखी झाली आता..! डोंगरी माळरान भासत असे भोकाड वस्ती आता,कीलवाणी पिलं माझी माझ्याकडे बघती बोडखा पाला तो खाता..! माळराणावरची माझी ती बाभूळ बोडखी झाली आता..! डोंगर कपारी काळ्या खडकावर मी बसावे दुःख माझे मी त्याच्याशी व्यक्त करावे..! माळराणावरची माझी ती बाभूळ बोडखी झाली आता..! बकऱ्या गेल्या माझ्या पुढे आता,पुन्हा त्यांच्या मागे मागे शिळ फुंकीत मी आहे आता फिरता..! माळराणावरची माझी ती बाभूळ बोडखी झाली आता..! रोजच्या जगण्याची झाली आहे अशी ही कथा,कुणा कुणाला सांगु माझी अन् माझ्या या पिलाची वणवण फिरण्याची ही व्यथा..! माळराण

प्रवास सौख्याचा....

चहोबाजुंनी रिंगण माझ्या प्रेताशी मधुबक्षीकींनी घालावे,सोवळे मरणाची त्यांनी आवाजात त्यांचा सभोवताली माझ्या गुंणगुंणावे .... सभोवताल काय तो दुःखात माझिया जाण्याच्या रडावा,बाहेर तो यम यमसदनी घेऊन जाण्यास वाट माझी बघत रहावा.... अंघोळ मजला घातली जात होती,पाण्यास अत्तराचा,कापराचा सुगंध तो बंद कापसांच्या नाकास भासावा.... तिरडीस माझ्या वेताचा आधार,फुलांचा अन् आधार शरीरास मयताच्या कापडाचा होता,लपेटला तार चांदीचा जातांनी प्रवासाल शेवटच्या डोईवर भार तो रुपयाचा होता.... कापडांनी बोळवणीच्या उलट्या बुजगावणे माझे सजवीले जात होते,तिर्डीस आधार आता चार खांद्या परि कुणाचा तो नसावा.... अंतीमयात्री प्रवास माझा गावच्या वेशीतुन होता, पारावर बघण्या मला शेवटचे काही क्षणांचा गावकऱ्यांसाठी माझा विसावा शेवटचा तो आता असावा... प्रवास तिरडीवरचा संपला आता,चीताच माझी अन् मी चीतेचा प्रवास हा शेवटचा दिगंतरी  नेण्याचा कल्पनेत मला भासावा..... आप्त स्वकीयांनी अश्रु  शेवटचा दुःखात माझ्या ढाळावा,फुलांच्या राशीत फेकुनी मजला निरोप माझा तयांनी शेवटचा तो घ्यावा... सरले सरण माझे बांधिस्त प्रवास पृथ्वीलोकांत झाला माझा,प्रव

नामदेव ढसाळ

सभ्य लोकांच्या गर्दीत... एकविसाव्या शतकातल्या सभ्य लोकांच्या गर्दीत मी एक असभ्य.. इथे व्यक्त होणं हाच एक असभ्य पणा आहे.. कारण मी व्यक्त होतोय जस दिसतंय तस.. पण तुला मात्र चढवावा लागतोय अतिशयोक्तीचा मुलामा तुझ्या दुःखाला ही.. मी सांगतोय माझं दुःख माझ्याच शब्दात.. पण रोज कानावर पडणारे शब्द समोर स्वतः गुन्हा साक्षीला असतानाही त्यांना अनोळखी वाटताहेत.. मी न्ह्याहळतो लहान अर्भकाला स्तनपान करणाऱ्या मादीला .. आणि जगातल्या सर्वात सुंदर दृश्य साठवू पहातो डोळ्यात... पण लगेच लावलं जात माझ्या वर अश्लीलतेचं लेबल... आणि मग पुढील प्रत्येक क्षण करू लागतो मला बहिश्कृत .. मला मान्य नाही स्वतःच्या भावना दाबून स्वतःसोबत केली जाणारी हिंसा... आणि मग मी व्यक्त होऊ लागतो तुमच्या म्हणण्याप्रमाणे असभ्यपणे... मी पाहतो रोज पडणारा तुमच्या बरबटलेल्या कोंदट विर्याचा फवारा इथल्या प्रत्येक गावागावात नगरांनगरांत.. मी ठेचू पाहतो तुमच्या निर्घृण शुक्राणूंना माझ्या शब्दाने.. आणि तुम्ही मलाच बलात्कारी घोषित करून मोकळे होतात.. हो मला वाटते उजवी इथल्या वेशाबाजारातील वेश्या इथल्या संस्कृती जपत आलेल्या सुशिक्ष

अन्... मी भटकत होतो,भटकत होतो....

हा विषय माझ्या खुप जवळचा आहे भावनिक दृष्ट्या किंवा काळाची गरज,मला जर कुणी म्हंटले चलतो मॉलमध्ये फिरायला जाऊ,तर मला ते आवडत नाही..... मी एमआयडीसीमध्ये फिरायला जातो नेहमी, रिकामा असलोकी तिकडच भटकत असतो.प्रत्येक कंपनीचे बाहेरून निरीक्षण करत  फिरत असतो जे करायला मला खुप आवडते... नेहमी प्रमाणे तो दिवस पेपर झाला,घरी जायला खुप वेळ होता म्हणुन मी काहीतरी नवीन माहिती भेटल म्हणुन एमआयडीसी एरियात फिरायला गेलो साधारण तीन महीन्यांपुर्वीची ही गोष्ट असेल... मी रस्त्याने भटकत होतो इकडेतिकडे कावरी-बावरी नजर टाकत,आजू-बाजूला चालू असलेले संवाद ऐकत.आज का कुणास ठाऊक पण मला इथे खुप भयाण शांतशांत वाटत होते.... जिथे नेहमी वरदळ असते कंपन्यांमधला यंत्रांचा आवाज,भोंग्यांचा आवाजही आज ऐकु येत नव्हता.मी चालत-चालत बराच पुढे आलो,तशी ती शांतता अजुन वाढत गेली,पुढे रस्त्याने एक चिटपाखरू सुद्धा दिसेनासे झाले.... नेहमी आवडणारे दृश्य आता मला भीतीदायक वाटु लागले होते,उंचउंच इमारती त्यांना कांग्रेसच्या जंगलाने वेढले होते‌.आतमध्ये पूर्ण काळोख नजरेस पडत होता.कंपनीचा मरलेल्या माणसाचा जसा सापळा व्हावा तसा भास होत होता.... ज

Company rules ....

कंपन्यामध्ये काम करण्याचा माझा अनुभव जेमतेमच आहे,पण जो आहे तो खुप छान आहे. शिस्त,वेळेचे महत्त्व,इत्यादी गुण आपल्याला रोजच्या जीवनात जर अनुभवायचे असेल तर खरच एकदा तरी हा अनुभव घेऊन बघावा.... मी आजवर काम केलेल्या कंपनीमध्ये मला आवडलेलं कंपनी क्षेत्र जर कोणते असेल तर ते फार्मा कंपनी.शिस्तबद्धता,वेळेचे नियोजन,अजुनही असंख्य नियम या कंपनीत काम करणाऱ्या सर्वांना लागु असतात.... अगदी House keeping मध्ये काम करणारा असो किंवा सर्वोच्च पदावर काम करणारे सर्वांसाठी सारखे नियम येथे असतात.तर थोडक्यात माहिती या कंपनींच्या नियमांबद्दल व येथे चालणारे काम कसे चालते याबद्दल.... फस्टशिप(सर्व शिपमध्ये असेच काम होत असते, फक्त कामाचे नियोजन व एमरजेंसीमध्ये यात वेळेनुसार बदल होत असतो)मध्ये जर तुम्ही काम करत असाल,तर कसे असते तुमचे एकुण 9.00 तासांचे कामाचे नियोजन ते खालीलप्रमाणे असते.फस्टशिपमध्ये काम करण्यासाठी तुमची वेळ असेल सकाळी 6.30 ते दुपारी 3.30.... सर्व प्रथम नियोजित वेळेवर तुम्ही कंपनीच्या मेन गेटवर असायला हवे. तुमचे राहणीमान दाढी,कटिंग व्यवस्थित असावं,नख कापलेली स्वच्छ असावी,गळ्यात ओळखपत्र,पायात सेफ

लोकांनी_वेडी_ठरवलेली_ती_अशोक_रुपी_माऊली

जेवण आटोपून मी देवळात तेलाचा दिवा घेऊन गेलो,एरवी अंधार झाला होता थंडी कापत होती शरीराला.... वेशीच्या बाहेर असलेलं ते देऊळ,दुरूनच टाळ मृदुंगाचा आवाज कानी पडला.सोबतीला माझ्या शिवनातीरच्या विठु माऊलींचा ही आवाज कानी पडत होता,तसा मी तिच्या जवळ जात होतो... तसंतसं पावलांनी वेग वाढता घेतला,खुप दिवस झाले गावाकडे आलो होतो.माऊलीचे वेध लागलं होतू या भक्ताला,शिवनामाई तुडुंब भरली होती संथ वाहणारी शिवनाई भयाण रौद्ररूप धारण केलेली भासत होती.... स्मशानातही काल सोडुन गेलेल्या एकनाथ बाबाचं मडं जळत होतं,दुरुनच बघुन वाटेवरच हात जोडून एकनाथ बाबाचं दर्शन घेतलं.बापाच्या वयाचा असल्यानं बाप गेल्याचं दुःख व्हावं तसं झालं.... नकळत माऊलींच्या ओढीनं पावलं देवळाकडे वळाली,मला माझ्या सर्व माऊलींचे दर्शन झाले अन् धन्य झालो मी.ही माऊली पंढरीची नसुन माझी शिवनातीरावरची माझी पंढरीची माऊली समान मला ती होती.... गावातील सर्व वृद्ध,सायंकाळी हरिपाठ,भजनाला जमतातनां ती मायबापच माझी माऊली. आईबापा नंतर देव दिसला तो या माऊलींमध्येच मग नाही कधी पंढरीच्या वारीची आठवण झाली... गावी येऊन एक अख्खी रात्र यांच्या सहवासात घालतो,आशिर्