माळराणावरची माझी ती बाभूळ बोडखी झाली,काळ बदलला अन् तिची फरफट निघाली..!
ओसाड झाले माझेच आंगण,बकऱ्या माझ्या उपाशी आता कोणाला मी सांगण..!
माळराणावरची माझी ती बाभूळ बोडखी झाली आता..!
मी अजुनी कीतीक सोसावे जगतांना पिलांच्या या मरणाला,पाळेवर धरणाच्या मी बसुन देतो उसासे अश्रु आहे आता फक्त कारणाला....
माळराणावरची माझी ती बाभूळ बोडखी झाली आता..!
लांब वेताच्या काठीला ईळा आहे मी आता बांधला,जाता मी बघतो पाला तोडून कुणी गं बाई साराच आहे गं निला...
माळराणावरची माझी ती बाभूळ बोडखी झाली आता..!
डोंगरी माळरान भासत असे भोकाड वस्ती आता,कीलवाणी पिलं माझी माझ्याकडे बघती बोडखा पाला तो खाता..!
माळराणावरची माझी ती बाभूळ बोडखी झाली आता..!
डोंगर कपारी काळ्या खडकावर मी बसावे दुःख माझे मी त्याच्याशी व्यक्त करावे..!
माळराणावरची माझी ती बाभूळ बोडखी झाली आता..!
बकऱ्या गेल्या माझ्या पुढे आता,पुन्हा त्यांच्या मागे मागे शिळ फुंकीत मी आहे आता फिरता..!
माळराणावरची माझी ती बाभूळ बोडखी झाली आता..!
रोजच्या जगण्याची झाली आहे अशी ही कथा,कुणा कुणाला सांगु माझी अन् माझ्या या पिलाची वणवण फिरण्याची ही व्यथा..!
माळराणावरची माझी ती बाभूळ बोडखी झाली आता..!
सांजवेळी वेध घरी परतायाचे पिलास माझ्या, सरळ मार्गी चालती ओढीने घराच्या सावरून घे भावना फक्त तु तुझ्या आता...
माळराणावरची माझी ती बाभूळ बोडखी झाली आता..!
#धरणपाळेवरच्या_माझ्या_कविता....
-भारत लक्ष्मन सोनवणे (सौमित्र).
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा