मुख्य सामग्रीवर वगळा

नामदेव ढसाळ

सभ्य लोकांच्या गर्दीत...

एकविसाव्या शतकातल्या सभ्य लोकांच्या गर्दीत मी एक असभ्य..
इथे व्यक्त होणं हाच एक असभ्य पणा आहे..
कारण मी व्यक्त होतोय जस दिसतंय तस..
पण तुला मात्र चढवावा लागतोय अतिशयोक्तीचा मुलामा तुझ्या दुःखाला ही..
मी सांगतोय माझं दुःख माझ्याच शब्दात..
पण रोज कानावर पडणारे शब्द समोर स्वतः गुन्हा साक्षीला असतानाही त्यांना अनोळखी वाटताहेत..
मी न्ह्याहळतो लहान अर्भकाला स्तनपान करणाऱ्या मादीला ..
आणि जगातल्या सर्वात सुंदर दृश्य साठवू पहातो डोळ्यात...
पण लगेच लावलं जात माझ्या वर अश्लीलतेचं लेबल...
आणि मग पुढील प्रत्येक क्षण करू लागतो मला बहिश्कृत ..
मला मान्य नाही स्वतःच्या भावना दाबून स्वतःसोबत केली जाणारी हिंसा...
आणि मग मी व्यक्त होऊ लागतो तुमच्या म्हणण्याप्रमाणे असभ्यपणे...
मी पाहतो रोज पडणारा तुमच्या बरबटलेल्या कोंदट विर्याचा फवारा इथल्या प्रत्येक गावागावात नगरांनगरांत..
मी ठेचू पाहतो तुमच्या निर्घृण शुक्राणूंना माझ्या शब्दाने..
आणि तुम्ही मलाच बलात्कारी घोषित करून मोकळे होतात..
हो मला वाटते उजवी इथल्या वेशाबाजारातील वेश्या इथल्या संस्कृती जपत आलेल्या सुशिक्षित बायांपेक्षा ...,
कारण ती करते तीच काम प्रामाणिक पणे..
आणि मग तुम्ही मला रंडीबाज म्हणून हिनावता..
इथे तुम्ही रोज घडवून आणता बलात्कार भूक भागवणार्या पैशाला जन्माला घालण्यासाठी...
आणि गुलामी मान्य नसलेला मी घडवत राहतो माझं समतेच करियर..
इथे प्रत्येकाला पाहिजे असते एक कधीही न फोडलेलं सीलबंद मादी शरीर....
आणि खूप आधी मानसिक verginity मोडलेला मी प्रत्येक क्षणाला साजरा करतो उत्सव माझ्या vergin नसल्याचा...
आणि मग तुम्ही करता गिणती माझी व्यभिचारी मध्ये...
मी बोलतो निसंकोच पणे सम्भोगावर...
आणि तुम्ही काळजी करत राहत तुमच्या vergin प्रणयाची
माझ्या याच सवयीनमुळे कदाचित ..हा याच सवयीमुळे..
मी असेल अजून सिंगल..
पण आता मात्र या गर्दीत दूरवर दिसतेय मला माझी प्रेयसी..
जिने कधीच फेकून दिले आहेत सर्व बंधने ,संकोच ,आणि यांची शिलाची कुजकी संकल्पना..
ती ही सोसत आली आहे बहिष्कृताच जीवन माझ्याप्रमाणे...
तिला ही जाणवते आहे कपड्याचा ढिगाखाली दबलेल्या सोसायटीच नागवेपन....आणि विवस्त्र असूनही समतेच्या आणि प्रेमाच्या कपड्यात गुंडाळलेलं माझं शरीर....
ती सुद्धा तयार आहे जगातल्या सर्व भावनांना नगण्य करणाऱ्या शरीर मिलनाचा जल्लोष करण्यासाठी...
मी नाही करत गल्लत प्रेम आणि सेक्स मध्ये...
पण  त्याच कुंफ्युजन अजूनच वाढत चाललंय ...
आणि मी मात्र जगातील अमोल अवर्णनीय क्षणांचा आनंद घेत
माझ्यासारखच एक असभ्य आणि समतावादी अर्भक; प्रसवण्याची वाट पाहतोय याचा सभ्य लोकांच्या गर्दीत....

Dedicated to सभ्य लोकांच्या गर्दीतील एक महान असभ्य माणूस
महाकवी पद्मश्री नामदेव ढसाळ....

(आज सकाळी हा लेख नावानिशी वाचनात आला खुप सुंदर लेख).

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...