लहानपणा पासून सेक्स,पाळी,व्हर्जिनिटी ह्या विषयावर घरात कधी चर्चा झाल्या नाहीत.कारण समाजव्यवस्थेनं तयार केलेला टॅबु कौटुंबिक नात्यांना भेदत नसानसात शिरलाय,या बाबतीत माझे घरही त्याला अपवाद नाही.....
ह्या बाबत जे ही ऐकलंय ते मैत्रिणींकडून आणि चित्रपट,सिरीयल यांमधुनच.आता अलीकडच्या काळात सोशल मीडियाशी होणाऱ्या संबंधातुन बरीच माहिती मिळाली,म्हणजे ती मी मिळविण्याचा प्रयत्न केला....
मला या माहितीचा एक पुरुष म्हणुन काही एक (शारीरिक)उपयोग होणार नव्हता,पण मला कुठेतरी ही माहिती मला हवी असे मनोमन वाटत होते.कारण समाजात या विषयी असलेले मतभेद तर मी नक्कीच बदलु शकतो....
म्हणजे डायरेक्ट बोलून हे पटवून देणे मला तरी अजुन शक्य वाटत नाही,जरी मी ते करूही शकलो असतो.पण आज जेव्हा जगातील बहुसंख्य स्त्रीया,मुली या सोशल नेटवर्किंग साईट वर वावर करत आहे त्याचा वापर करत आहे....
मग आपल्या छोट्याश्या लिखित स्वरूपाच्या पोस्टने जर त्यांना योग्य ती माहिती भेटत असेल तर काय हरकत आहे.आता याला काही मित्र-मैत्रिणी विरोधही करतील तु एक मुलगा आहे तुला या गोष्टीची,या विषयाची,असलं लिखाण करायची गरज नाही....
पण आपण हा विचार कधी नाही केला की ज्या प्रक्रियेतून सर्व विश्वाची निर्मिती झाली ती पाळी अजुन पुर्णपणे समाजातील काही स्त्रियांनाही पुर्णपणे समजली नाही. तेव्हा पुर्षांना,तरुणांना काय माहिती असेल....
अजुनही पाळी पुर्णपणे कळली नाहीये स्त्रियांना या बाबत थोडी फार माहिती असते,कारण तो त्यांच्या आयुष्याचा एक भाग असतो.पण ती माहिती कितपत योग्य आहे अन् कितपत चुकीची हे तिला अजूनही समजले नाही...
राहिला पुरषांचा प्रश्न त्यांना या विषयाचे ज्ञान देणे महत्त्वाचे आहेच,आनंद तर या गोष्टीचा वाटत आहे की आज समाजात अनेक पुरूष आपल्या घरातील स्त्री,तरुणींना योग्य माहिती तर देताच. तसेच या दिवसात तिच्या वरील मानसिक ताण,तणाव,तिला आराम कसा मिळेल याचा विचारही ते करतात.....
माझ्या लिखाणाचा एकच हेतु असेल याविषयी समाजातील स्त्री,पुरूषापर्यंत योग्य माहिती मी माझ्या लिखाणाच्या माध्यमातुन देईल.तर यासाठी जशी वेळ भेटल तसे मी लेख लिहीत राहिल, समाजात याविषयी साक्षरता पसरावी हीच प्रामाणिक अपेक्षा आहे....
पुढील लेख लवकरच.....
Bharat Sonwane....
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा