२०२० हे वर्ष सुरू झाले पहीली रात्र संपुन गेली आहे,ती मी भटकत,भटकत जगलो आहे.जरी शरीराने मी डांबलेलो आहे एका अंधाऱ्या खोलीत जिथे उजेडालाही भीती वाटत असते यायची,मग ती खोली मनातली की प्रत्येकक्षातली याला काही माझ्यालेखी तरी अर्थ नाही....
या वर्षाची पहीली रात्र अंधार खुप पडला होता, थंडीही खुप आहे,मी म्हणजे दुसरा कुणी नाही हो मीच आहे,सोबत माझ्या ते माझे Psycho विचार घेऊन निघालो आहे....
चहुकडे अंधार झाला आहे,रात्रीचा एक वाजून आठ्ठावीस मिनिटं होऊन काही क्षण वर झाले असेल,रस्ता नरकाची वाट भासतोय.मी एक-एक पाऊल झप,झप टाकत चालतोय,त्या विस्तीर्ण टेकडीच्या दिशेने.....
रस्त्यावरची खडी अनवाणी पायांना टोचते आहे, कधीतरी येणाऱ्या लाल मातीच्या फुफाट्यात पाय पडतो मग मात्र तळव्यांना मऊ स्पर्श होतो आहे. स्मशान सालं जागं आहे,त्याची भूक मिटवायला आज एकबी मडं आल नव्हतं मग ते मलाच खुणावत आहे,हसत आहे माझ्याकडे बघून,माझ्या अनवाणी पायांना बघुन....
गुडघ्यावर फाटलेली माझी चड्डी शिऊन घेतली नाही याचा पश्चाताप होत आहे,वारा झोंबतो आहे. मी चालतोय रस्ता मागे पडतो अन पुन्हा पुढे येतो आहे,बांबुच्या बेटांवर बसलेले ते उलटं घुबड यडं लागल्यासारखे ओरडत आहे,त्याला रात्री दिसतं त्यांना मी ऐकलं होते पण ते हुडुक माझ्या तोंडाला बघेणा पण झाले आहे.....
खांबावरचे लाईट चालू आहे मी वेडा की खुळा यावेळेला त्यांना बंद करून टाकतोय,दुरवरून कुणीतरी शिव्यांचा आवाज मला दिला,ही भाषा मला अवगत नाही म्हणून मी लाईट बंद ठेऊन अंधारातच चालतोय....
काही अंतरावर टपरी चालु दिसते,रात्री कोण येणार यांच्या टपरीकडे भटकायला,पण जवळ जाऊन पाहतो तर इथे माझ्यासारखे अनेक Psycho बसले आहे पब्जी खेळत.मी चुलीवर हात ठेवत शख घेत आहे,तो वाळलेला बाबा पार म्हसणात मडकं गेले त्याचे ते माझ्याकडे रागाने पाहत आहे,काय माहीत मी काय खुळा दिसलो की काय त्याला....
मग मी मोहरं निघालो भटकत,भटकत माझ्या रस्त्याला,रस्ता संपला आहे.रानवाट लागली तितक्यात लाल डोळ्याचे ते भोरे कुत्रे अंगावर आले,दगड भिरकावला अन सारे पळून गेले.एकाच्या पेटकात तो लागला ते इवळत बसलं आहे,उंच आवाज करून लांडगे ईवळत आहे....
इतक्या रात्री एक बाबा डब्बं घेऊन नदीला चालला आहे,मला बघुन तोंड लपुन चालत आहे जसं काय मी त्याचं डब्बड सांडुन देणार आहे.बाभळी लागल्या आहे रस्त्यानं अनवाणी पाय मंग काटा टोचु नये म्हणून मी रस्त्याच्या कडेना चालतो आहे.....
कीर...कीर...आवाज येत आहे दुसऱ्या क्षणाला माझ्या अंगावर एखादी फांदी पडावी अन मी त्या झाडाला उलटा लटकुन भूत होऊन जातो का काय असा भास होत आहे....
टेकडी जवळ आली आहे मी चढु लागलो आहे, वारा झोंबत आहे,मी चढत आहे,पायाला ठेच लागली याचे भान मला नाहीये.बोटातुन भळ-भळ रगत निघतं आहे,आता मी या विचारानं यडा झालो आहे की उंच टेकडीवरनं त्या खालच्या काळ्य पाण्याच्या खदानीत मला उडी मारायची आहे...
पण इथं वर पोहचताच माझ्यातला जुना विचार जागा झाला आहे,मी मोठ्यानं गाणं म्हणत आहे,''बाहो में बॉटल,बॉटल मे दारू दारू मैं हे मेरी नशा,एकबार जिसने थोडीसी पीलीं बेहोश ओ हो गया...! टिंग... टिंग...टिंग...''
तिथंच माझ्यातलं ते वेड जे भारत मातेचे सेवा करण्याचं आहे अहो रात्र अन् दीवस जे मी बघितलं आहे ते जागे होते,जिथं खुप घाम गाळुन या टेकडीला पळण्याचा सराव मी करत आलो आहे,त्या आठवणी जाग्या झाल्या अन् आता पुन्हा तेच सुरू करत रातच्याला मी पळत सुटलो आहे,वेड्यागत.....
#मी_एक_Psycho_अनेक_विचारांसाठीचा.....
Bharat Sonwane....
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा