तो हल्ली काय करतो कुणास ठाऊक म्हणजे काल सकाळी मी अंघोळ करून थंडी वाजत
असल्यामुळं बाल्कनीत येऊन भांग पाडत होतो...
माझं असे आहे की मला मुलींपेक्षा जास्तवेळ लागतो भांग पाडायला,मी बसलो होतो समोरून सुर्य किरणांची तिरीप मस्त अंगावर पडत होती. आरसा छानपैकी सेट केल्यामुळे माझं चालले होते भांग पाडणे.बाजुला एका प्लास्टिकच्या डब्यात पावडरचा डब्बा,क्रीम,अजुन दोन कंगवे,आईच्या गोल बारीक टिकलीचे पाकिटे त्यात होती...
मस्त भांग पाडून झाला अन मी आता त्याला न्याहाळत बसलो होतो,तो पण आता उठला होता तसा तो बाल्कनीत आला हात उंचावून आळस देत मला हात दिला....
अन म्हणाला काय लेखक साहेब बरे आहे का तुमचे काम ? मी म्हंटले हो भाऊ कसले लेखक अन् कसले काय,सुशिक्षित बेरोजगार म्हणा वाटले तर मला राग नाही येणार.
तो हसतच बोलला नाही रे छान लिहतो तु, तुझ्याकडे काहीतरी आहे कराण्यासारखे मी जर बेरोजगार झालोना तर,मला घरचे दोन वेळची भाकर देतील की नाही काय माहीत.अन् चेहरा पाडुन तो तिथुन निघुन गेला...
मी पण मनात हा प्रश्न घेऊन आता गेलो की तो मला अडवा बोला होता की,त्याचे काही विपरीत ? आईने तोवर गरम कॉफी टेबल वर आणुन ठेवलेली होती आरसा आटकवून,डब्बा नेहमीच्या जागी ठेऊन मी कॉफी पित बसलो होतो....
तितक्यात खिडकीच्या ग्रील मधुन तो जातांना दिसला,चेहर्यावर निराश झालेला अन शरीरातले त्राण सोडून कसल्या तरी विचारांच्या सावटाखाली तो चालत होता.त्याने मी मगाशी बसलेल्या बाल्कनी कडे बघितले अंन जोर्यात हात झटकले.मला प्रश्न पडला त्याला काही बोलायचे तर नसेलणा ? काही विपरीत तर घडले नसेलणा त्याच्यासोबत...
मी संध्याकाळी त्याच्या येण्याच्या टायमावर त्याची वाट पाहत बाल्कनीत घोडा करून भिंतीवर बसलो होतो,पण तो खुप वेळ झाला आलाच नाही....
मी आता घरात गेलो जेवण केले पुन्हा येऊन बसलो,अन् तो आला पार विस्कटलेले केस,विस्कटलेली शर्टिंग,अन् हातातली बॅग छाती जवळ घेऊन तो चालत होता...
मी त्याला आवाज दिला,हाय ब्रो... त्याने स्मितहास्य देत हाय केले... अन् बोला जेवलास का ? मी हो म्हंटले अन् त्याला काही विचारणार तोच तो बोलून गेला चल येतो भाई हल्ली खूप थकुन जात आहे सवय नाही रे मला या कामाची...
अन् मला उत्तर भेटले,जे खरे होते की खोटे काय माहीत. मी काही न बोलता शरीरात त्राण नसल्या सारखा घरात झुलत आलो....
अन् बेडवर जाऊन मोबाईलवर त्याचे फेसबुक चेक करत बसलो तो लेफ्ट झाला होता कुठून ते नाही सांगू शकणार...
#हरवलेल्या_माझ्यासोबतचा_तो_एक...
लेखन-भारत लक्ष्मन सोनवणे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा