मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑगस्ट, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अंत एका भाषेचा,अंत एका संस्कृतीचा..!

अंत एका भाषेचा,अंत एका संस्कृतीचा..! अंत एका भाषेचा,एका संस्कृतीचा..! काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता..? काय करत होता..?कसं आयुष्य जगत होता..? त्याचं राहणीमान कसं होतं..? हे आपल्याला काही माहीत नाही..! अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते..! मूळात त्याला मानव जातीचा राग,तिटकारा होता किंवा कदाचित भितीसुद्धा वाटत असेल.कारण त्याच्या जमातीतील,त्याच्या रक्ताच्या नात्यातील माणसांना व्यवहारी व्यवस्थेचं भूत मानगुटीवर बाळगलेल्या आपल्यातल्याच काही व्यवहारी माणसांनी त्यांच्यावर गोळ्या झाडून त्यांचा अंत केला अन् शेवटी हा एकटाच उरला..! २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात,अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला.परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं.तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म

"तुझं आहे खंडी भर भरून उदंड प्रचंड उदंड आहे अखंड स्वागत"

"तुझं आहे खंडी भर भरून उदंड प्रचंड उदंड आहे अखंड स्वागत"  आठ दिवसांपूर्वी प्रख्यात कवी लेखक समीक्षक आणि प्रकाशक "अविनाश साळापुरीकर" सर यांची भेट झाली अन् सरांनी मला त्यांचा "तुझं आहे खंडी भर भरून उदंड प्रचंड उदंड आहे अखंड स्वागत" हा काव्यसंग्रह अभिप्रायार्थ भेट दिला..! खरंतर या काव्यसंग्रहावर अनेक दिग्गज साहित्यिकांनी लिहलेले आहे,अश्यावेळी माझ्यासारख्या नवख्या लेखकाने काय लिहावं. पण ; लिहायला हवं आहेच. त्यामुळे जे काही लिहतो आहे ते खूप काळजीपूर्वक अन् माझ्या साहित्य,लेखन,कविता,आयुष्याला घेऊन आयुष्याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन या सर्व गोष्टींवर हे सर्व अवलंबून आहे..! कारण सरांच्या कविता फक्त वाचून समजण्या इतपत सोप्या नाही,त्यासाठी तुम्ही तितकं पाईक असावं लागतं.तुम्ही आयुष्याकडे किती सिरियस होवून बघता,आयुष्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन कसा आहे हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे.जर हे तुम्हाला जमत असेल तरच सरांच्या या कविता तुमच्या परिघात बसतील आणि त्यावेळी त्या तुम्हाला आपसूकच जवळच्या वाटतील..! कारण या कविता काही दिवसांच्या,किंवा काहीतरी अनागोंदी कारभा

प्रिय..! एक ओळ तुझ्यासाठी..!

Book Review..! प्रिय..! एक ओळ तुझ्यासाठी..! आठ-दहा दिवसांपूर्वी मराठवाड्यातील प्रसिद्ध कवयित्री. "माधवी देवळाणकर" यांचा "प्रिय..! एक ओळ तुझ्यासाठी" हा काव्यसंग्रह अभिप्रायार्थ भेट मिळाला. खरंतर मॅडमना हा काव्यसंग्रह मला भेटून देण्याची इच्छा होती अन् मलाही तो त्यांच्या हातानेच हवा होता..! परंतु,मॅडम अनेकदा औरंगाबाद येऊनही काही कारणास्तव माझी त्यांच्याशी भेट होवू शकली नाही अन् मग अनायसे मॅडमला हा त्यांचा काव्यसंग्रह मला पोस्टाने पाठवावा लागला अन् अखेरीस तो मला मिळाला..! खूप सुंदर,मनातील अलवार भाव भावनांना शब्दांची जोड देऊन त्या शब्दांची गुंफण करून काव्य संग्रहातील प्रत्येक ती प्रिय एक ओळ,एक एक रचना करत हा काव्यसंग्रह आकाररूपास अाला आहे..! प्रत्येकाला वाचावासा वाटेल असा हा त्यांचा काव्यसंग्रह..! आठ-दहा दिवसांपूर्वी काव्यसंग्रह मिळाला पण माझ्या इतर कामाच्या व्यस्थतेमुळे तो वाचायची इच्छा असूनही वाचल्या जात नव्हता.परंतु अखेरीस काल सायंकाळी वाचायला घेतला अन् एका बैठकीत वाचून संपवला. ९६ पानांचा का काव्यसंग्रह त्यातील कवितांप्रमानेच नाजूक अन् छोटासा आहे,बोल

भारत देशातील पहिली औद्योगिक वसाहत - कागजीपुरा..!

भारत देशातील पहिली औद्योगिक वसाहत - कागजीपुरा..! भारत देशातील पहिली औद्योगिक वसाहत "कागजीपुरा"..! औरंगाबाद गेलं की माझी एक जूनी सवय आहे.ज्या दिवशी मी औरंगाबाद जातो,त्या दिवशी शहरात साहित्य,कला या विषयांना घेऊन कुठे काही कार्यक्रम असेल तर त्यांना शोधून मी त्या कार्यक्रमाला वेळात वेळ काढून किंवा ती तेव्हढी वेळ राखीव ठेवून तिथे हजेरी लावत असतो..! दोन-तीन दिवसांपूर्वी असच औरंगाबाद येण्याचं ठरलं आणि मग शहरात कुठे काही कार्यक्रम आहे का हे बघण्यासाठी शोधाशोध सुरू झाली.काही वेळात शहरात एक छानसा कार्यक्रम सायंकाळी असणार आहे हे कळले.मग काय सायंकाळ राखीव ठेवून माझी सर्व कामे पूर्ण करून मी त्या कार्यक्रमाला हजेरी लावली..! साहित्य क्षेत्रात जेव्हापासून लेखन करायला लागलो तेव्हापासून या अश्या अनेक विषयांशी जोडलेली बरीच मान्यवर व्यक्तींची ओळख झाली आहे.त्यामुळं कार्यक्रमात एकटं असं कधी वाटत नाही अन् त्या ठिकाणी जाण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे खूप काही नवीन शिकायला त्या त्या क्षेत्रातील अनुभवी व्यक्तीकडून आपल्याला भेटणे..! तर पर्वाची सायंकाळ अश्याच एका कार्य

"रान बाजार"

रान बाजार..! "रान बाजार" असंच काहीसं घडलं होतं... कदाचित..? मराठी वेबसृष्टीवर खळबळ उडवून देणारी बहुचर्चित मराठी वेब सीरिज "रानबाजार" अखेर आज बघितली.राजकारण अन् राजकारणाच्या पलिकडच्या अनेक न कळू शकणाऱ्या गोष्टी अन् यात शिकार ठरत जाणारा सामान्य माणूस. अश्या एका संवेदनशील विषयाला प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न या वेब सीरिज माध्यमातून करण्यात आला आहे..! वेब सीरिज मधील काही अश्लील संवाद किंवा काही ठिकाणी खूप ओव्हर झाल्यासारखे वाटते.परंतु शेवटपर्यंत ही वेब सीरिज बघत गेलं की आपल्याला सुरुवातीलाच पडत गेलेल्या एक एक प्रश्नाचे उत्तर शेवटपर्यंत मिळत जाते..! वर संगितल्याप्रमाणे काही सीन बोल्ड काही संवाद अश्लील वाटतील त्यामुळे ट्रेलर बघूनच वेब सिरीज बघायची की नाही हे आपलं आपण ठरवावे..! रेगे’ आणि ठाकरे’ सारखे संवेदनशील विषय प्रभावीपणे हाताळणारे दिग्दर्शक "अभिजित पानसे" या वेबसीरिजच्या रुपाने आपली नवी कलाकृती घेऊन आपल्या समोर येतात अन् त्यांनी त्यांच्या कलाकारीतून असो किंवा दिग्दर्शनातून या वेब सिरीजला अक्षरशः न्याय दिला आहे..! मराठीतील या भव्य वेब सीरिज

"Aurangabad Industrial Hub"

"Aurangabad Industrial Hub" "औरंगाबाद शहर अन् औद्योगिक वसाहतींचे जुळून आलेले समीकरण" "ऑटोमोबाईल इंडस्ट्रीयल हब सिटी" नंतर फार्मा क्षेत्रातील कंपन्यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेला  रोजगार अन् आयटी क्षेत्रात बाळसं धरू बघणारे शहर..! औरंगाबाद शहर अन् औद्योगिक वसाहतीबद्दल यापूर्वी मी अनेक लेख लिहले,जे औरंगाबाद शहर सोबतीने त्याचा इतिहास अन् साधारण पाच दशकांपूर्वी काळानुरूप ऑटोमोबाईल क्षेत्रात औरंगाबाद शहराने धरलेलं बाळसं आता याच क्षेत्रात संपूर्ण जगतात ऑटोमोबाईल क्षेत्रातील आशिया खंडातील एक महत्त्वाचं शहर म्हणून झालेली शहराची ओळख हा औरंगाबाद शहराचा चढता आलेख मी माझ्या लेखणीतून नेहमीच आपल्या समोर लिखित स्वरूपात उपलब्ध करून देत आलो आहे. एकीकडे औरंगाबादमध्ये उज्ज्वल भविष्याचा विचार करून,नव्याने डीएमआयसी अंतर्गत निर्माण होणारे नवीन प्रकल्प,अलिकडेच काही वर्षांपूर्वी पूर्णत्वास आलेली ऑरिक औद्योगिक वसाहत आणि शहराला जोडुन असलेल्या चिकलठाणा एमआयडीसी,शेंद्रा एमआयडीसी,वाळूज एमआयडीसी,चितेगाव परिसरात असलेली जुनी एमआयडीसी यांच्या माध्यमातून औरंगाबाद शह