भारत देशातील पहिली औद्योगिक वसाहत - कागजीपुरा..!
भारत देशातील पहिली औद्योगिक वसाहत "कागजीपुरा"..!
औरंगाबाद गेलं की माझी एक जूनी सवय आहे.ज्या दिवशी मी औरंगाबाद जातो,त्या दिवशी शहरात साहित्य,कला या विषयांना घेऊन कुठे काही कार्यक्रम असेल तर त्यांना शोधून मी त्या कार्यक्रमाला वेळात वेळ काढून किंवा ती तेव्हढी वेळ राखीव ठेवून तिथे हजेरी लावत असतो..!
दोन-तीन दिवसांपूर्वी असच औरंगाबाद येण्याचं ठरलं आणि मग शहरात कुठे काही कार्यक्रम आहे का हे बघण्यासाठी शोधाशोध सुरू झाली.काही वेळात शहरात एक छानसा कार्यक्रम सायंकाळी असणार आहे हे कळले.मग काय सायंकाळ राखीव ठेवून माझी सर्व कामे पूर्ण करून मी त्या कार्यक्रमाला हजेरी लावली..!
साहित्य क्षेत्रात जेव्हापासून लेखन करायला लागलो तेव्हापासून या अश्या अनेक विषयांशी जोडलेली बरीच मान्यवर व्यक्तींची ओळख झाली आहे.त्यामुळं कार्यक्रमात एकटं असं कधी वाटत नाही अन् त्या ठिकाणी जाण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे खूप काही नवीन शिकायला त्या त्या क्षेत्रातील अनुभवी व्यक्तीकडून आपल्याला भेटणे..!
तर पर्वाची सायंकाळ अश्याच एका कार्यक्रमासाठी राखीव ठेवलेली होती.कार्यक्रम होता "इंटाक औरंगाबाद" आणि "कलर्स ऑफ औरंगाबाद" यांच्या सौजन्याने वर्ल्ड फोटोग्राफी दिनाच्या निमित्ताने घेतल्या गेलेल्या "Unseen Ellora" या विषयावरील फोटोग्राफी स्पर्धेच्या बक्षीस वितरणाचा.खूप सुंदर छोटेखानी असा हा कार्यक्रम होता.
कार्यक्रम झाला अन् त्यात मला कागजीपुरा गावाबद्दल कळाले..!
म्हणजे या गावाबद्दल मी यापूर्वी जाणून होतो पण या कार्यक्रमानंतर अजून सविस्तर जाणून घेण्याची इच्छा माझ्या मनात निर्माण झाली.
मग ठरलं असेही दुसऱ्या दिवशी परतीचा प्रवास करत माझ्या गावाला जायचे होतेच,मग का नको कागजीपुरा गावाला जावून तेथे ७०० वर्षांपूर्वीचा असलेला कागद बनवण्याचा एकमेव अन् शेवटचा शेवटच्या घटका मोजणारा कारखाना आपण बघायला हवा असे मनाला वाटून गेले..!
ठरल्याप्रमाणे मी पहाटेच निघालो,औरंगाबादवरून कागजीपुरा पोहचलो गावातल्या ग्रामस्थांकडून पत्ता अन् काही माहिती घेऊन इच्छित स्थळी पोहचलो.हिरवाईने नटलेल्या गवत,बाभळीच्या रानात गुडूप झालेला हा सुंदर असा कारखाना एका छान कोरीव दगडी तलावाच्या जवळच आहे..!
कारखान्याच्या जवळ पोहचलो अन् कळाले की आज तिथे चालणाऱ्या कामाला सुट्टी आहे.तिथे सेक्युरीटी गार्ड खेरीच दुसरे कुणी नव्हते अन् माझ्याकडे कुठली परवानगीसुद्धा नव्हती.अखेर त्यांच्या साहेबांशी मी बोलणे केले अन् मग मला त्यांनी कारखाना बघायला परवानगी दिली..!
कारखाना सातशे वर्षांपूर्वीचा असल्याची साक्ष तेथील प्रत्येक वस्तू देत होती,खूप सुंदर अन् मोजून तीन-चार जुन्या मोडकळीस आलेल्या खोल्यात चालणार हा कारखाना बघून मला सध्याच्या काळात औद्योगिक वसाहतीत असलेल्या कंपन्यांची आठवण झाली कुठे भारत देशातील पहिल्या औद्योगिक वसाहतीत असलेला हा शेवटचा कारखाना.जो शेवटचे श्वास मोजत होता पण आजही अनेकांना त्याच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती होत होती..!
अखेर सेक्युरीटी गार्ड माझे गाईड झाले अन् एक अर्ध्या तासात आम्ही सर्व कारखाना बघितला.कॉटन कापड,चिंध्या अन् अनेक वस्तूंपासून कसा कागद,शोभेच्या वस्तू बनतात हे मी बघितले.
सातशे वर्षांपूर्वी हे सर्व किती प्रगत वाटावं असं तंत्रज्ञान असेल याची जाणीव झाली..!
खूप सुंदर असा हा कारखाना आहे,कारखान्यात गेलो अन् मला एक बोर्ड दिसला त्यावर जे काही लिहले आहे ते खूप हृदयस्पर्शी असे होते..!
पहिले कारखान्याचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न करतो..!
महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी असलेल्या "औरंगाबाद" शहरापासून २४ कि.मी अंतरावर "कागजीपुरा" हे दोन हजार लोकसंख्येचे एक छोटेसे टुमदार गाव नॅशनल महामार्ग २११ वरती वसलेले आहे.
औरंगाबाद जिल्ह्याला खूप सुंदर इतिहास लाभला आहे अन् याचे पैलू आपल्याला औरंगाबाद जिल्ह्यातील प्रत्येक छोटछोट्या गावात पाडलेली दिसतात.मग कुठे पुरातन वास्तू,कुठे बारव,कबरी तर कुठे लेणी,मंदिरे इत्यादी..!
असाच इतिहास लाभला आहे "कागजीपुरा" या गावालासुद्धा "दौलताबाद" येथील ऐतिहासिक किल्ला ताब्यात घेण्यासाठी "मुहम्मद तुघलक" याने आक्रमण केले.त्या काळात तह करण्यासाठी कागदाची गरज भासायची,हे कागद तयार करणारे कारागिर त्यावेळी "दौलताबाद" जवळील "देवगिरी" किल्ल्याजवळ स्थायिक झाले.
परंतु कागद तयार करतांना लगद्याला कुटण्याचा मोठा आवाज सलग रात्रंदिवस होत असत त्यामुळे या किल्ल्यातील मान्यवर व्यक्तींना त्रास होत.या कारणास्तव मग या कारागिरांची वस्ती तिथून हलवून डोंगराच्या पल्ल्याड बसवली गेली.जिथे त्यांच्यासाठी मुहम्मद तुघलकाने बऱ्याच सुविधा उपलब्ध करून दिल्या,सिंचनासाठी पाण्याचा पायऱ्या असलेला एक दगडी तलाव त्या ठिकाणी बांधला..!
हळू हळू कागद तयार करण्याच्या कामामुळे त्या वस्तीला "कागजीपुरा" हे नाव पडले १३२७ पासून कागजीपुरा येथे कागद तयार केला जातो..!
कागजीपुरा येथे ज्या कागदाची निर्मिती केली जाते ती पूर्णतः नैसर्गिक पद्धतीची आहे.१३२७ दरम्यान गावातील प्रत्येक घरात कागद निर्मिती होत असत,त्यामुळे ही एक छोटीशी औद्योगिक वसाहत होती.पुढे काळाच्या ओघात आधुनिकीकरण होत गेले मोठ्या प्रमाणात यांत्रिक क्रांती होत गेली अन् हे कारखाने हळूहळू बंद पडू लागले..!
आज फक्त एकच कारखाना आज घडीला कागजीपुरा या ठिकाणी आपला शेवटचा श्वास घेत आहे.आजदेखील या गावात अनेक कारागीर हस्तगत कागद निर्मिती करतात.आजही हा कारखाना अन् तेथील यंत्र हे सुस्थितीत आहे.याठिकाणी निर्माण होणारा कागद हा अव्वल दर्जाचा मानला जातो अन् अवघ्या भारत भरातून त्याला मागणी असते.हा कागद पूर्णपणे हाताने तयार केला जातो.यामध्ये जुने कापड कापून त्याचे बारीक तुकडे करून त्याचा लगदा तयार केला जातो यामध्ये कापूस,काही वनस्पती अन् रद्दी यांचा वापर केला जातो.या सर्वांचे मिश्रण करून पारंपरिक पद्धतीने कापूस तयार केला जातो..!
मै कागजीपुरा बोल रहा हुॅं...!
दौलताबाद से एलोरा जाते समय रास्ते मे कागजीपुरा नाम से मुकाम है मै सैकडों पर्यटकों की रोज आते-जाते देखता हुॅं और सोचता हुॅं की दिल्ली से दौलताबाद और पुनः दिल्ली वापसी का फरमान हमारे ही पूर्वजो द्वारा बनाये गए कागजों पर ही जारी किया गया था..!
और उसके बाद भी न जाने कितने प्रेम पत्र,सजद,इनामो- इकराम के कागज भी मेरी ही मिठ्ठी की खुशबू से बने थे..!
वह भी क्या दौर था जब दिल्ली की सुल्तान मुहम्मद तुगलक के काफिले का हिस्सा होकर हम दिल्ली से चले थे और देवगिरी किले के समीप ही हमारी बस्ती कागजीपूरा के नाम से आबाद हो गई और हाथों से कागज बनाने का कारखाना चल निकला..!
तब से लेकर कुछ दशक पहले तक तो सब ठीक था... लेकीन अब लगभग ७०० साल पुरानी कागज बनाने की हमारी कला दम तोड रही है...
हम कागजी हैं... तोपची से ज्यादा ताकतवर... लेकीन अब ये ताकत भी नहीं बची... क्योकी इस विरासत की आश्रय देनेवाला कोई नहीं बचा...
अगर कुछ नही कर सकते हो... तो कमसे कम आकर इन खंडहरो का ही दीदार कर लो...थोडा सुकून मिलेगा की कोई हालचाल पूछने तो आया...
(लेखक, डॉ.शिवकांत बाजपाई)
Written by,
Bharat Sonwane.
MBA-(Production & Operations Management.)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा