मुख्य सामग्रीवर वगळा

"Aurangabad Industrial Hub"

"Aurangabad Industrial Hub"

"औरंगाबाद शहर अन् औद्योगिक वसाहतींचे जुळून आलेले समीकरण"

"ऑटोमोबाईल इंडस्ट्रीयल हब सिटी" नंतर फार्मा क्षेत्रातील कंपन्यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेला
 रोजगार अन् आयटी क्षेत्रात बाळसं धरू बघणारे शहर..!

औरंगाबाद शहर अन् औद्योगिक वसाहतीबद्दल यापूर्वी मी अनेक लेख लिहले,जे औरंगाबाद शहर सोबतीने त्याचा इतिहास अन् साधारण पाच दशकांपूर्वी काळानुरूप ऑटोमोबाईल क्षेत्रात औरंगाबाद शहराने धरलेलं बाळसं आता याच क्षेत्रात संपूर्ण जगतात ऑटोमोबाईल क्षेत्रातील आशिया खंडातील एक महत्त्वाचं शहर म्हणून झालेली शहराची ओळख हा औरंगाबाद शहराचा चढता आलेख मी माझ्या लेखणीतून नेहमीच आपल्या समोर लिखित स्वरूपात उपलब्ध करून देत आलो आहे.

एकीकडे औरंगाबादमध्ये उज्ज्वल भविष्याचा विचार करून,नव्याने डीएमआयसी अंतर्गत निर्माण होणारे नवीन प्रकल्प,अलिकडेच काही वर्षांपूर्वी पूर्णत्वास आलेली ऑरिक औद्योगिक वसाहत आणि शहराला जोडुन असलेल्या चिकलठाणा एमआयडीसी,शेंद्रा एमआयडीसी,वाळूज एमआयडीसी,चितेगाव परिसरात असलेली जुनी एमआयडीसी यांच्या माध्यमातून औरंगाबाद शहराला "ऑटोमोबाईल इंडस्ट्रीयल हब" सिटी ही मिळालेली नवी ओळख आहे...

औरंगाबाद शहरात उपलब्ध झालेला रोजगार आणि एकीकडे कोरोनोत्तर काळात उद्योग विश्वात झालेला बदल,नवीन रुजु झालेल्या संकल्पना अन् पुन्हा एकदा आता औरंगाबाद शहराजवळील औद्योगिक वसाहती नव्यानं येणाऱ्या कंपन्यांचा चढता आलेख,कोरोनाच्या वाईट काळातील दिवसांना अनुभवत पुन्हा पुर्ववत औद्योगिक वसाहतींमध्ये चालु झालेला कारभार या सर्व गोष्टी औरंगाबाद शहर हे आशिया खंडातच नव्हे तर जगतात औद्योगिक क्षेत्रात किती उंचीवरील अन् महत्त्वपूर्ण शहर आहे हे दाखवून देत आहे...

औरंगाबाद हे ऐतिहासिक आणि औद्योगिक शहर म्हणून जगाच्या नकाशावर आधीपासून ओळखले जातेच,त्यामध्ये "दिल्ली-मुबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरम" मुळे त्यात ऑरिकची नव्याने भर पडली आहे.त्यामुळेच येथे उद्योग वाढीला एक मोठे व्यासपीठ उपलब्ध झालेले आहे अन् सोबतच अनेक नवीन कंपन्या,ग्रहनिर्माण प्रकल्प या ठिकाणी उभारल्या जात आहे जाणार आहे...

इंडस्ट्रीयल कॉरिडॉर आल्याने औरंगाबादचा औद्योगिक विकासाचा आलेख हा पुढील पंधरा वर्षात कायम वाढत राहणारा असेल.ऑरिकमध्ये येत्या काळात ३,३०,००० लोकांना रोजगार उपलब्ध होवू शकतो असा अंदाज प्राथमिक माहितीनुसार देता येतो,या सर्व बाबींचा एकत्रित परिणाम म्हणजे औद्योगिक उत्पादनाच्या बाबतीत शहर मोठी झेप घेऊ बघत आहे..!

नवीन निर्माण होणारा रोजगार लक्षात घेता आगामी काळात येथे मोठ्या प्रमाणावर रहिवासी प्रकल्पाची गरज भासणार आहे.अलिकडच्या काळात मोठ्या प्रमाणात निर्माण झालेले रहिवासी प्रकल्प 'रिअल इस्टेट'च्या जगतात सुगीचे दिवस आणु बघत आहे,एकुण शहराचा विकास औद्योगिक क्षेत्राच्या आधारावर भरभराटीस येऊ बघत आहे...

सोबतच काही अंशी का होईना परंतु आता नव्याने काही नवीन प्रकल्प उभे राहण्यासाठी स्थानिक उद्योजक असो किंवा परदेशी उद्योग विश्वातून उद्योजक भारत देशात आपले प्रकल्प या ठिकाणी स्थायिक करण्याचा प्रयत्न करत आहे,औरंगाबाद शहरात आपले पावलं रोवू बघत आहे.दिवसेंदिवस आधुनिक टेक्नॉलॉजी मुळे होणारे बदल स्वीकारत शहरात एमआयडीसी मधील प्रकल्पा अंतर्गत औद्योगिकविश्वात होणाऱ्या घडामोडी हे सर्व बघण्यासारखे आहे...

एकीकडे शहरात इतक्या मोठ्या प्रमाणात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीयल क्षेत्रात आपले मुळं रूजवून आहे तर सोबतच,फार्मा क्षेत्रात चालू असलेल्या घडामोडी बघता फार्मा क्षेत्रातील औरंगाबाद शहरालगत औद्योगिक वसाहतीत असलेल्या कंपन्या बघता आॅटोमोबाईल क्षेत्रानंतर सर्वाधिक कंपन्या असलेलं फार्मा क्षेत्र ठरत आहे.

आजमितीला या कंपन्यांच्या माध्यमातुन खूप मोठ्या प्रमाणात रोजगार हा औरंगाबाद शहर अन् जवळपास असलेल्या छोट्या शहरातील नागरिकांना उपलब्ध झालेला आहे.
औरंगाबाद शहरालगत असलेल्या औद्योगिक वसाहतीत अनेक जगप्रसिद्ध नामांकित कंपन्यांनी आपलं प्रोडक्शन हाऊस उभारले आहे,ज्या माध्यमातून सर्व विश्वात मेडीसिन पुरवण्याचे कार्य या कंपन्या करत आहेत.कोरोना ज्यावेळी मोठ्या प्रमाणात पसरलेला होता,त्यावेळी रात्रंदिवस या कंपन्यानी प्रोडक्शन चालू ठेवून आपली कामगिरी पूर्ण केली आहे अन् खूप मदत प्रशासनाला केली आहे .!

औरंगाबाद शहरालगत असलेल्या पाच औद्योगिक वसाहतीत आज घडीला अनेक देश विदेशी फार्मा कंपन्यांनी आपले पाय रोवले आहे.यातील काही कंपन्यानी जवळ जवळ दोन दशकांपूर्वी येथील औद्योगिक वसाहतीत आपले प्रोडक्शन हाऊस चालू केले आहे..!
यात खालील फार्मा कंपन्या मोठ्या प्रमाणात रोजगार उपलबध करून देत आहेत..!

1) Wockhardt Pharma,Wockhardt Research Center.
2) Lupin Limited.
3) Maylan Laboratories. 
4) Glenmark Pharma.
5) Harman Finochem Limited.
6) Ajanta Pharma.
7) Sun Pharma Limited.
8) ATRA Pharmaceutical Company.
9) Midas Care Pharmaceutical.
अश्या अन् अनेक छोट्या मोठ्या विविध कंपन्या या ठिकाणी कार्यरत आहेत...

औरंगाबादसह मराठवाड्यासाठी भूषण असलेल्या दिल्ली मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉरच्या (डीएमआयसी) औरंगाबाद इंडस्ट्रिअल सिटी (ऑरिक) शेंद्रा टप्प्यात साधारण जानेवारी २०२१ मध्ये आणखी पाच नवीन कंपन्यांची भर पडली आहे.या कंपन्यांना भूखंडांचे वितरण नुकतेच करण्यात आली.या कंपन्यांमधून १६० कोटींची गुंतवणूक झाली असून जवळजवळ २५० जणांना रोजगार मिळणार आहे. 

दरम्यान,Covid-19 परिस्थितीनंतर प्रथमच 'ऑरिक' व्यवस्थापनाकडे मागणी केलेल्या उद्योगांपैकी पाच उद्योगांना प्लॉट हस्तांतरित करण्यात आले.यामध्ये "Sindhiya Pharma",यासह औषधनिर्मितीतील आणखी एक कंपनी,लिक्विड ऑक्सिजनसह ऑक्सिजन प्रॉडक्टस् तयार करणारी "Inox Air Products Private Limited",फूड प्रोसेसिंगमधील एक आणि सॅनिटरी नॅपकिन बनविणाऱ्या एका उद्योगाचा समावेश आहे..!
त्यामुळे फार्मा विश्वातसुद्धा औरंगाबाद शहर आपले स्थान निर्माण करत आहे..!

त्यानंतर २०२२ मध्येसुद्धा काही दिवसांपूर्वी दिल्ली- मुंबई औद्योगिक पट्ट्यातील बिडकीन येथील औद्योगिक वसाहतीमध्ये दोन कंपन्यांनी १५२० कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून त्यांना ३११ एकर जमीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. "Cosmofilm" व "Piramal Pharma Private Limited." असे या दोन कंपन्यांची नावे असून या दोन्ही कंपन्या सुरू झाल्यानंतर २ हजार ७०० जणांची प्रत्यक्ष रोजगार निर्मिती होईल असा औद्योगिक विभागातील अधिकाऱ्यांचा अंदाज आहे.

औरंगाबाद इंडस्ट्रीयल सिटीमध्ये (ऑरिक) शेंद्रा येथील ३३३ भूखंड उद्योगांना देण्यात आले असून येथून उत्पादनही सुरू झाले आहे. मात्र, बिडकीन येथील क्षेत्रात अद्याप गुंतवणूक झाली नव्हती. दोन कंपन्यांनी आता गुंतवणूक केली आहे. कॉस्मोफिल्मसाठी १७३ एकर जमीन देण्यात आली असून ही कंपनी १०२० कोटी रुपयांची तर पिरामल फार्मा या कंपनीस १३८ एकर जागेत ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. कॉस्मोफिल्मचा प्रकल्प २०२४ पर्यंत सुरू होईल तर पिरामलचे उत्पादन २०२३ मध्ये सुरू होईल असे सांगितले जात आहे.

औरंगाबाद सोबतच शेजारचे परभणी,बीड,जालना,या आसपासच्या जिल्ह्यातील बरेच तरुणांना रोजगार निर्माण झाला आहे.ऐतिहासिक औरंगाबाद शहराच्यालगत शेंद्रा-बिडकीन येथे आशिया खंडातील बऱ्यापैकी मोठा प्रोजेक्ट असलेली ऑरीक ही आधुनिक औद्योगिक वसाहत निर्मानाचे पूर्ण होवून हजारो हाताना रोजगार मिळाला आहे.

औरंगाबाद शहरात ज्याप्रमाणात ऑटोमोबाईल,फार्मा सेक्टरशी निगडित कंपन्यांना येण्यास प्राधान्य देण्यात आले दिले जात आहे त्याच,तेव्हढ्या प्रमाणात कुठेतरी आयटी क्षेत्रात असणाय्रा कंपन्यांना,प्रकल्पांना प्राधान्य दिलेले दिसत नाही ही एक खंत कायम वाटते.या क्षेत्रातील कंपन्यांना जर औरंगाबाद शहरात स्थान दिले किंवा ते आणण्यासाठी प्रयत्न केले तर बराच सुशिक्षित बेरोजगार तरुण आपले कौशल्य दाखवून रोजगार मिळवू शकतो असे वाटते...

अलीकडे आयटी क्षेत्रातही औरंगाबाद शहर हळू हळू का होईना बाळसे धरू बघत आहे अन् IT,BPO,KPO,TRANSCRIPTION या क्षेत्रात काम करणाऱ्या MNC (Multi National companies) औरंगाबाद शहरात नव्याने उभ्या रहात आहे..!

सोबतीने औद्योगिक वसाहतीत निर्माण झालेला कच्चा माल असो किंवा तयार झालेली पार्टस यांना दुसऱ्या राज्यात,देश विदेशात निर्यात करण्यासाठी किंवा तेथील काही गोष्टी कंपन्यांत ज्या महत्त्वाच्या आहेत त्यांना आयात करण्यासाठी दळणवळणाची साधने निर्माण झालेली आहे..!

औरंगाबाद शहराच्या जवळून जाणारा समृध्दी महामार्ग असो किंवा NH 211 त्यानंतर शहरातून अनेक पर्यायी मार्ग यामुळे हा प्रवास सहज झाला आहे,त्यानंतर आंतरराष्ट्रीय एअरपोर्टच्या माध्यमातून सुरू असलेली "कार्गो सेवा" आणि त्या माध्यमातून होणारे दळणवळण..!

औरंगाबाद शहर आॅरीक सिटीच्या माध्यमातून एकीकडे देश-जगतातील उद्योगविश्वात महत्त्वाचे शहर म्हणून नावारूपास येण्याचा प्रयत्न करत आहे.आॅरीक सिटीच्या माध्यमातून मोठया प्रमाणावर तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध झालेली आहे,औरंगाबाद शहराच्या भूमीवर येणारे विविध मोठाले देश विदेशातील प्रकल्प यामुळे भविष्यात औरंगाबाद शहराचे नाव उद्योग विश्वात देशातीलच नव्हे तर जगातील महत्वाचे शहर म्हणून नावारूपास येणारे शहर ठरणार आहे,त्यामुळे नक्कीच पुढील काळ हा औरंगाबाद येथील नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण असणार आहे..!

Written by,

Bharat Sonwane.
MBA-(Production & Operations Management.)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड